man ear treatment by specialist doctor shocked insect in ear
न्यूझीलंड : न्यूझीलंडमधील ऑकलंडमधून एक विचित्र घटना समोर आली आहे. येथील एक व्यक्ती पाण्यात पोहून घरी परतली असता त्या व्यक्तीच्या कानात दुखू लागले. सुरुवातीला या व्यक्तीला हे सामान्य दुखणे वाटले आणि त्याने या दुखण्याकडे दुर्लक्ष केले, पण जेव्हा प्रकृती बिघडू लागली तेव्हा या व्यक्तीने हॉस्पिटल गाठले. तेथे डॉक्टरांनी त्याची तपासणी केली असता त्यांना आश्चर्याचा धक्का बसला. त्या व्यक्तीच्या कानात एक मोठे झुरळ होते.
हे प्रकरण न्यूझीलंडमधील आहे. जिथे झेन वेडिंग नावाची व्यक्ती पोहून घरी परतली, दुसऱ्या दिवशी जेव्हा झेनला जाग आली तेव्हा त्याच्या कानात काहीतरी हालचाल जाणवली. हळूहळू ही हालचाल तीव्र वेदनांमध्ये बदलली आणि नंतर झेनचे एका कानात ऐकणे जवळजवळ बंद झाले. त्यानंतर झेन वेडिंग डॉक्टरांकडे गेला, त्यांनी झेनला काही अँटीबायोटिक्स घेण्याचा आणि कान कोरडे करण्यासाठी हेअर ड्रायर वापरण्याचा सल्ला दिला. डॉक्टरांना वाटले की झेन पोहून आल्यावर त्याच्या कानात पाणी भरले असावे. पण प्रकरण वेगळे होते. दोन दिवस उलटले पण झेनला अजिबात आराम मिळत नव्हता, उलट त्याच्या वेदना वाढत होत्या.
अशा परिस्थितीत झेन वेडिंगने कानाच्या तज्ज्ञ डॉक्टरांकडून उपचार घेण्यासाठी दुसरे हॉस्पिटल गाठले. तेथील डॉक्टरांनी त्याच्या कानाची तपासणी केली असता आत एक मोठा मेलेला झुरळ अडकल्याचे दिसून आले. हे पाहून डॉक्टर आश्चर्यचकित झाले. डॉक्टरांनी झुरळ काढण्याचा प्रयत्न केला, मात्र सुरुवातीला अर्धाच झुरळ बाहेर काढण्यात यश आले. नंतर हळूहळू मशीनच्या साहाय्याने झुरळाच्या शरीराचे उर्वरित भाग कानातून बाहेर काढण्यात आले. डॉक्टरांनी सांगितले की जर हे झुरळ आणखी काही दिवस कानात राहिले असते तर झेन वेडिंगला ट्युमर झाला असता. आता झेन वेडिंग पहिल्यासारखाच व्यवस्थित आहे.
हिंगोली : हिंगोली जिल्ह्यात घडलेल्या एका गंभीर घटनेने सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेवरील विश्वास पुन्हा एकदा डळमळीत…
बुलढाणा : केंद्र सरकारच्या फुड स्ट्रीट योजने अंतर्गत विदर्भातील शेगांव आणि मराठवाडा विभागातील शिर्डी येथे…
मुंबई : पुणे शहरातील हडपसर आणि पिंपरी-चिंचवडमधील दापोडी-फुगेवाडी परिसरात विषारी दारू प्यायल्याने १२ नागरिकांचा मृत्यू…
पुणे : महाराष्ट्र शासनाच्या सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागामार्फत प्रदान करण्यात आलेल्या “राष्ट्रपिता महात्मा…
मुंबई : ‘महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना’अंतर्गत महाराष्ट्रात विविध पदांसाठी तात्काळ भरती सुरू…
पुणे : पुणे शहर आणि जिल्ह्यात उष्णतेची तीव्रता दिवसेंदिवस वाढत असून भारतीय हवामान विभागाने (IMD)…