ग्लोबल

आमच्यावर खरोखरच विनाशकारी संकट ओढवले आहे- लेबनॉनचे पंतप्रधान हसन दियाब

लेबनॉनची राजधानी बैरुतला हादरवणारा प्रचंड स्फोट फटाके आणि अमोनियम नायट्रेटचा साठा पेटल्याने झाला असल्याचे मत तज्ज्ञांनी व्यक्त केले. या स्फोटात किमान १३५ लोक ठार, तर चार हजाराहून अधिक लोक जखमी झाल्याची माहिती समोर आली आहे. दरम्यान, या स्फोटांनंतर सरकारनं दोन आठवड्यांच्या आणीबाणीची घोषणा केली आहे. तसंच यादरम्यान लष्करालाही अनेक अधिकार देण्यात आले आहे. तसंच या प्रकरणाचा तपास होईपर्यंत बैरुत बंदराच्या अधिकाऱ्यांना नजरकैदेत ठेवण्याचेही आदेश देण्यात आले आहेत.

नागरी युद्ध, इस्रायलसोबतचे संघर्ष आणि दहशतवादी हल्ले सोसणाऱ्या या शहरातील हा आतापर्यंतचा सर्वात शक्तिशाली स्फोट होता. शहराच्या मध्य भागातील प्रमुख रस्त्यांवर दगडमाती आणि उद्ध्वस्त झालेली वाहने विखुरली होती. दरम्यान, स्फोटानंतरच्या काही सॅटलाईट इमेजेसही समोर आल्या आहेत. त्यामुळे या स्फोटाची भीषणता किती होती याचाही अंदाज येतो. या स्फोटाची व्याप्ती इतकी होती, की इमारतींच्या खिडक्या स्फोटाचे केंद्र असलेल्या बैरुतच्या बंदरापासून कित्येक किलोमीटर दूर जाऊन पडल्या.

बेरूत स्फोट: लेबनॉनच्या बंदर क्षेत्रात झालेल्या स्फोटात 25 जण ठार तर 2,500 हून अधिक जखमी

बंदरात साठवलेल्या फटाक्यांना लागलेल्या आगीमुळे हे घडून आले असावे अशी शक्यता वर्तवण्यात आली आहे. एखाद्या स्फोटाची तीव्रता तज्ज्ञमंडळी स्फोटामुळे निर्माण झालेल्या खड्डय़ावरून निश्चित करतात. बुधवारी सकाळी विमानातून घेण्यात आलेल्या छायाचित्रात हे भगदाड प्रचंड असल्याचे दिसून आले. हा खड्डा आणि दूर उडालेल्या खिडक्यांचे अंतर, यावरून हा स्फोट किमान २.२ किलोटन टीएनटीच्या स्फोटाइतका असल्याचे शस्त्रविषयक तज्ज्ञ सिम टॅक म्हणाले.

२०१४ साली एका मालवाहतूक जहाजातून जप्त करण्यात आल्यानंतर बंदरावरील एका गोदामात साठवण्यात आलेल्या २७०० टनहून अधिक अमोनियम नायट्रेटमुळे हा स्फोट झाला असावा, असे लेबनॉनचे अंतर्गत मंत्री मोहम्मद फहमी यांनी सांगितले.

लेबनॉनचे पंतप्रधान हसन दियाब यांनी भाषणात सर्व देशांना, तसेच लेबनॉनच्या मित्रांना या लहान देशाला मदत करण्याचे आवाहन केले. आमच्यावर खरोखरच विनाशकारी संकट ओढवले आहे, असे ते म्हणाले.

Share this :
थोडक्यात घडामोडी टीम

कमीत कमी शब्दांमध्ये बातम्या देणारे, आजच्या घडीला थोडक्यात घडामोडी हे मराठीतलं सर्वात वेगानं वाढणारं न्यूजपोर्टल - थोडक्यात घडामोडी

Recent Posts

स्वातंत्र्यदिनानिमित्त डॉ. सोमनाथ गिते यांचा महापौरांच्या हस्ते गौरव

पुणे : स्वातंत्र्यदिनाच्या निमित्ताने पुणे महानगरपालिकेच्या वतीने आयोजित विशेष सत्कार समारंभात व्यसनमुक्ती अभ्यासक व सामाजिक…

2 आठवडे ago

लग्न ठरलेल्या प्रियकरासोबत तरुणीचा संशयास्पद मृत्यू; आईचा गंभीर आरोप

बारामती : पुणे जिल्ह्यातील बारामती शहरात तरुणीचा अकस्मात आणि संशयास्पद मृत्यू झाल्याप्रकरणी तिच्या आईने दिलेल्या…

3 आठवडे ago

चार महिन्यांपूर्वीचा नवाकोरा रस्ता ऑप्टिकल फायबरसाठी फोडला; राष्ट्रवादी काँग्रेसच्या नगरसेविका डॉ. हेमलता पाटील यांचा संताप; काम बंद पाडून अधिकाऱ्यांना जाब

नाशिक : शनिवारी (दि. ८) झालेल्या महासभेत स्मार्टसिटी कंपनी आणि ‘एमएनजीएल’मुळे शहरातील रस्त्यांची झालेली दुरवस्था…

3 आठवडे ago

‘उघडलेले पुस्तक’ पॅनेलचा दणदणीत विजय; सर्व १५ उमेदवार विजयी; सर्व प्रवर्गांत परिवर्तन आणि सुशासन पॅनेलला यश

पुणे : पारी टॉवर्स सहकारी गृहरचना संस्था मर्यादित, नऱ्हेच्या संचालक मंडळाच्या पंचवार्षिक निवडणुकीत ‘उघडलेले पुस्तक’…

3 आठवडे ago

हिंगोलीत धक्कादायक प्रकार! डिझेलअभावी रुग्णवाहिका न मिळाल्याने गर्भातील बाळाचा दुर्दैवी मृत्यू

हिंगोली : हिंगोली जिल्ह्यात घडलेल्या एका गंभीर घटनेने सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेवरील विश्वास पुन्हा एकदा डळमळीत…

3 महिने ago

भाविकांसाठी आनंदाची बातमी; धार्मिक स्थळांवर मिळणार दर्जेदार आणि पौष्टिक अन्न सेवा सुविधा

बुलढाणा : केंद्र सरकारच्या फुड स्ट्रीट योजने अंतर्गत विदर्भातील शेगांव आणि मराठवाडा विभागातील शिर्डी येथे…

3 महिने ago