ग्लोबल

हुकुमशाह किम जोंग उनचे कृत्य, कोरोनाचे नियम मोडल्यामुळे एका व्यक्तीला सार्वजनिक ठिकाणी घातल्या गोळ्या

उत्तर कोरियाचे हुकुमशाह किम जोंग उन यांनी उत्तर कोरियात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू नये यासाठी कडक निर्बंध लादले आहेत. तसंच हे नियम मोडणाऱ्यांना कठोर शिक्षाही केली जात आहे. माध्यमांमध्ये प्रसिद्ध झालेल्या वृत्तानुसार उत्तर कोरियात किम जोंग उन यांनी कोरोनाबाबत घालून दिलेले नियम मोडल्यामुळे एका व्यक्तीला आपला जीव गमवावा लागला आहे.

किम जोंग उन यांनी संबंधित व्यक्तीला फायरिंग स्क्वाडच्या हाती सोपवलं. त्यानंतर त्या व्यक्तीला सार्वजनिक ठिकाणी गोळ्या घालण्यात आल्या. इतकंच नाही तर माध्यमांमध्ये आलेल्या वृत्तांनुसार किम जोंग उन यांनी नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण व्हावं यासाठी चीनच्या सीमेवर अँटी एअरक्राफ्ट बंदुकाही तैनात केल्या आहेत. त्याद्वारे एका किलोमीटरपर्यंतही कोणालाही गोळ्या घालता येऊ शकतात.

वृत्तानुसार किम जोंग उन यांनी २८ नोव्हेंबर रोजी एका व्यक्तीला कोरोनाच्या नियमांचं उल्लंघन केल्याप्रकरणी सार्वजनिक ठिकाणी गोळ्या घालण्याचे आदेश दिले होते. त्या व्यक्तीनं चिनी सामानाची तस्करी केल्याचा आरोप ठेवण्यात आला होता. त्या व्यक्तीला स्थानिक सुरक्षा दलानं ताब्यात घेतलं. त्यानंतर त्या व्यक्तीला सार्वजनिक ठिकाणी गोळ्या घालण्यात आल्या.

Share this :
थोडक्यात घडामोडी टीम

कमीत कमी शब्दांमध्ये बातम्या देणारे, आजच्या घडीला थोडक्यात घडामोडी हे मराठीतलं सर्वात वेगानं वाढणारं न्यूजपोर्टल - थोडक्यात घडामोडी

Recent Posts

स्वातंत्र्यदिनानिमित्त डॉ. सोमनाथ गिते यांचा महापौरांच्या हस्ते गौरव

पुणे : स्वातंत्र्यदिनाच्या निमित्ताने पुणे महानगरपालिकेच्या वतीने आयोजित विशेष सत्कार समारंभात व्यसनमुक्ती अभ्यासक व सामाजिक…

14 तास ago

लग्न ठरलेल्या प्रियकरासोबत तरुणीचा संशयास्पद मृत्यू; आईचा गंभीर आरोप

बारामती : पुणे जिल्ह्यातील बारामती शहरात तरुणीचा अकस्मात आणि संशयास्पद मृत्यू झाल्याप्रकरणी तिच्या आईने दिलेल्या…

5 दिवस ago

चार महिन्यांपूर्वीचा नवाकोरा रस्ता ऑप्टिकल फायबरसाठी फोडला; राष्ट्रवादी काँग्रेसच्या नगरसेविका डॉ. हेमलता पाटील यांचा संताप; काम बंद पाडून अधिकाऱ्यांना जाब

नाशिक : शनिवारी (दि. ८) झालेल्या महासभेत स्मार्टसिटी कंपनी आणि ‘एमएनजीएल’मुळे शहरातील रस्त्यांची झालेली दुरवस्था…

7 दिवस ago

‘उघडलेले पुस्तक’ पॅनेलचा दणदणीत विजय; सर्व १५ उमेदवार विजयी; सर्व प्रवर्गांत परिवर्तन आणि सुशासन पॅनेलला यश

पुणे : पारी टॉवर्स सहकारी गृहरचना संस्था मर्यादित, नऱ्हेच्या संचालक मंडळाच्या पंचवार्षिक निवडणुकीत ‘उघडलेले पुस्तक’…

1 आठवडा ago

हिंगोलीत धक्कादायक प्रकार! डिझेलअभावी रुग्णवाहिका न मिळाल्याने गर्भातील बाळाचा दुर्दैवी मृत्यू

हिंगोली : हिंगोली जिल्ह्यात घडलेल्या एका गंभीर घटनेने सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेवरील विश्वास पुन्हा एकदा डळमळीत…

3 महिने ago

भाविकांसाठी आनंदाची बातमी; धार्मिक स्थळांवर मिळणार दर्जेदार आणि पौष्टिक अन्न सेवा सुविधा

बुलढाणा : केंद्र सरकारच्या फुड स्ट्रीट योजने अंतर्गत विदर्भातील शेगांव आणि मराठवाडा विभागातील शिर्डी येथे…

3 महिने ago