ग्लोबल

अमेरिकेत हिमवादळामुळे जनजीवन विस्कळीत, जीवनावश्यक वस्तूंचा तुटवडा, २१ जणांचा मृ्त्यू

जोरदार बर्फवृष्टी आणि हिमवादळामुळे अमेरिकेतील मध्य आणि दक्षिण भागात जनजीवन विस्कळीत झाले आहे. मुसळधार बर्फवृष्टीमुळे डॅलस आणि ह्युस्टनजवळील तापमान शून्य अंश सेल्सिअस खाली गेले होते.

सोमवारी तापमान आणखी घसरल्याने वीज पुरवठा खंडीत करण्यात आला. टेक्सासमधील वीज विभागाने टप्प्याटप्प्याने वीज पुरवठा खंडीत करण्यास सुरुवात केली होती. त्यामुळे काही तासांसाठी ब्लॅक आउटची स्थिती निर्माण झाली होती. वीज पुरवठा खंडीत झालेल्या भागात जीवनाश्यक वस्तू आणि इतर साहित्यांचा पुरवठा करण्यात येत असल्याचे राज्यपाल ग्रेग एबॉट यांनी सांगितले. खराब हवामानाचा फटका वीज निर्मितीवर झाला असून भारनियमन, ब्लॅक आउटचा सामना नागरिकांना करावा लागत आहे. राज्यपालांनी सांगितले की, ERCOT आणि PUC कडून विद्युत पुरवठा सुरळीत करण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत.

टेक्सासमधील नागरिकांना सर्वप्रकारची मदत पोहचवण्याचा प्रयत्न करण्यात येत असून वीज कमी प्रमाणात वापरण्याचे आवाहन करण्यात आले आहे. राज्य प्रशासन वीज निर्मिती करणाऱ्या खासगी कंपन्यांसोबत काम करत असून लवकरच वीज पुरवठा सुरळीत करण्याचा प्रयत्न असल्याचे त्यांनी सांगितले. Electric Reliability Council of Texas (ERCOT)ने नागरिकांना अनावश्यक उपकरणे अनप्लग करण्यास सांगितले आहे.

प्रशासनाने नागरिकांना काही दिवस कपडे न धुण्याचे आवाहन केले आहे. त्याशिवाय थंडीपासून बचाव करण्यासाठी स्वेटरसारखे कपडे घालण्याचे आवाहन केले आहे. खराब हवामानामुळे हवाई वाहतूकदेखील विस्कळीत झाली आहे. दरम्यान, हिमवृष्टीमुळे आतापर्यंत २१ जणांचा मृ्त्यू झाल्याची देखील माहिती मिळाली आहे. जीवनावश्यक गोष्टींचा तुटवडा जाणवत आहे.

Share this :
थोडक्यात घडामोडी टीम

कमीत कमी शब्दांमध्ये बातम्या देणारे, आजच्या घडीला थोडक्यात घडामोडी हे मराठीतलं सर्वात वेगानं वाढणारं न्यूजपोर्टल - थोडक्यात घडामोडी

Recent Posts

हिंगोलीत धक्कादायक प्रकार! डिझेलअभावी रुग्णवाहिका न मिळाल्याने गर्भातील बाळाचा दुर्दैवी मृत्यू

हिंगोली : हिंगोली जिल्ह्यात घडलेल्या एका गंभीर घटनेने सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेवरील विश्वास पुन्हा एकदा डळमळीत…

4 दिवस ago

भाविकांसाठी आनंदाची बातमी; धार्मिक स्थळांवर मिळणार दर्जेदार आणि पौष्टिक अन्न सेवा सुविधा

बुलढाणा : केंद्र सरकारच्या फुड स्ट्रीट योजने अंतर्गत विदर्भातील शेगांव आणि मराठवाडा विभागातील शिर्डी येथे…

4 दिवस ago

पुण्यात विषारी दारू प्यायल्याने १२ जणांचा मृत्यू, दोषींवर कठोर कारवाईचे आदेश

मुंबई : पुणे शहरातील हडपसर आणि पिंपरी-चिंचवडमधील दापोडी-फुगेवाडी परिसरात विषारी दारू प्यायल्याने १२ नागरिकांचा मृत्यू…

4 दिवस ago

व्यसनमुक्ती क्षेत्रातील अविरत समाजकार्याची दखल; डॉ. सोमनाथ गिते यांचा मा. माधुरीताई मिसाळ यांच्या हस्ते सत्कार

पुणे : महाराष्ट्र शासनाच्या सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागामार्फत प्रदान करण्यात आलेल्या “राष्ट्रपिता महात्मा…

1 आठवडा ago

भरतीच्या बोगस जाहिरातींपासून सावध राहण्याचे आवाहन

मुंबई : ‘महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना’अंतर्गत महाराष्ट्रात विविध पदांसाठी तात्काळ भरती सुरू…

2 आठवडे ago

पुण्यात उष्णतेचा कहर! IMD चा यलो अलर्ट जारी; नागरिकांना काळजी घेण्याचे आवाहन

पुणे : पुणे शहर आणि जिल्ह्यात उष्णतेची तीव्रता दिवसेंदिवस वाढत असून भारतीय हवामान विभागाने (IMD)…

3 आठवडे ago