ग्लोबल

चीनमध्ये पुन्हा कोरोना विषाणूचा शिरकाव, अचानक नवीन रुग्णांची वाढ झाल्याने काही भागांत लॉकडाउन

बीजिंग : एकीकडे कोरोनाच्या उत्पत्तीविषयी प्रश्न निर्माण झाले असून दुसरीकडे चीनमध्ये कोरोना विषाणू पुन्हा एकदा डोके वर काढताना दिसत आहे. चीनच्या ग्वांगडोंग (Guangdong) प्रांतात अचानक कोरोना संसर्ग वाढायला सुरुवात झाली आहे. चीनमध्ये दक्षिणेकडील भागात अचानक कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव वाढत असल्याची माहिती देण्यात आली आहे.

काल (30 मे) कोरोनाची 20 नवीन प्रकरणे समोर आल्यानंतर अधिकाऱ्यांनी ग्वांगडोंग प्रांताची राजधानी असलेल्या गुआंगझू (Guangzhou) भागात लॉकडाउन लावले. परंतु, आज चीनच्या ग्वांगडोंग प्रांतात अचानक कोरोना विषाणूची 27 नवीन प्रकरणे समोर आली. नवीन प्रकरणे समोर आल्यानंतर तातडीने पाऊले उचलत शहरातील काही भागात नाकाबंदी करण्यात आली. लोकांना घरातच राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

वृत्तानुसार, दीड कोटी लोकसंख्या असलेल्या गुआंगझू या भागात कोरोना संसर्ग झपाट्याने पसरत आहे. शहरातील लिवान जिल्ह्यात राहणाऱ्या लोकांची तपासणी करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. बाजारपेठा, बाल देखभाल केंद्रे (child care centre) आणि करमणुकीची ठिकाणं बंद करण्यास सांगितले आहे. रेस्टॉरंट्स आणि शाळा देखील बंद करण्यात आल्या आहेत. लिवानच्या लगतच्या चार जिल्ह्यांत लोकांच्या बाहेर फिरण्यावर मर्यादा आणण्यात आल्या आहेत.

गौप्यस्फोट : कोरोना विषाणूचा कुठलाही नैसर्गिक पूर्वज नाही, कोरोना ही चीनचीच निर्मिती…

Share this :
थोडक्यात घडामोडी टीम

कमीत कमी शब्दांमध्ये बातम्या देणारे, आजच्या घडीला थोडक्यात घडामोडी हे मराठीतलं सर्वात वेगानं वाढणारं न्यूजपोर्टल - थोडक्यात घडामोडी

Recent Posts

स्वातंत्र्यदिनानिमित्त डॉ. सोमनाथ गिते यांचा महापौरांच्या हस्ते गौरव

पुणे : स्वातंत्र्यदिनाच्या निमित्ताने पुणे महानगरपालिकेच्या वतीने आयोजित विशेष सत्कार समारंभात व्यसनमुक्ती अभ्यासक व सामाजिक…

2 आठवडे ago

लग्न ठरलेल्या प्रियकरासोबत तरुणीचा संशयास्पद मृत्यू; आईचा गंभीर आरोप

बारामती : पुणे जिल्ह्यातील बारामती शहरात तरुणीचा अकस्मात आणि संशयास्पद मृत्यू झाल्याप्रकरणी तिच्या आईने दिलेल्या…

2 आठवडे ago

चार महिन्यांपूर्वीचा नवाकोरा रस्ता ऑप्टिकल फायबरसाठी फोडला; राष्ट्रवादी काँग्रेसच्या नगरसेविका डॉ. हेमलता पाटील यांचा संताप; काम बंद पाडून अधिकाऱ्यांना जाब

नाशिक : शनिवारी (दि. ८) झालेल्या महासभेत स्मार्टसिटी कंपनी आणि ‘एमएनजीएल’मुळे शहरातील रस्त्यांची झालेली दुरवस्था…

2 आठवडे ago

‘उघडलेले पुस्तक’ पॅनेलचा दणदणीत विजय; सर्व १५ उमेदवार विजयी; सर्व प्रवर्गांत परिवर्तन आणि सुशासन पॅनेलला यश

पुणे : पारी टॉवर्स सहकारी गृहरचना संस्था मर्यादित, नऱ्हेच्या संचालक मंडळाच्या पंचवार्षिक निवडणुकीत ‘उघडलेले पुस्तक’…

3 आठवडे ago

हिंगोलीत धक्कादायक प्रकार! डिझेलअभावी रुग्णवाहिका न मिळाल्याने गर्भातील बाळाचा दुर्दैवी मृत्यू

हिंगोली : हिंगोली जिल्ह्यात घडलेल्या एका गंभीर घटनेने सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेवरील विश्वास पुन्हा एकदा डळमळीत…

3 महिने ago

भाविकांसाठी आनंदाची बातमी; धार्मिक स्थळांवर मिळणार दर्जेदार आणि पौष्टिक अन्न सेवा सुविधा

बुलढाणा : केंद्र सरकारच्या फुड स्ट्रीट योजने अंतर्गत विदर्भातील शेगांव आणि मराठवाडा विभागातील शिर्डी येथे…

3 महिने ago