ग्लोबल

चिंताजनक : कोरोनाची लस घेताच आरोग्य कर्मचाऱ्याला झाली गंभीर ऍलर्जी

जगभरात कोरोना लशींच्या चाचण्या सुरू आहेत. काही लस (कोरोनाव्हायरस व्हॅक्सीन) त्यांचे चांगले परिणाम दाखवत आहेत, तर काही लसींचे दुष्परिणामही आता दिसू लागले आहेत. आता यामध्ये फायझर लसीचे नावही जोडले गेले आहे. अमेरिकेच्या अलास्का शहरातील एका आरोग्य कर्मचाऱ्याला फायझरची लस घेताच त्याला अनेक प्रकारच्या ऍलर्जी होऊ लागल्या. ही ऍलर्जी अतिशय गंभीर होती.

या आरोग्य कर्मचार्‍यासारखीच समस्या गेल्या आठवड्यात ब्रिटनमधील दोन जणांना झाली होती. यूकेचे वैद्यकीय रेग्युलेटर म्हणाले की ज्या लोकांना अ‍ॅनाफिलेक्सिस आहे किंवा ज्यांना कोणत्याही औषधाची किंवा एखाद्या खाद्यपदार्थाची ऍलर्जी असेल तर त्यांनी फाइजर-बायोएनटेक ची COVID-19 लस घेऊ नये. अमेरिकेच्या फूड अ‍ॅण्ड ड्रग ऍडमिनिस्ट्रेशनने म्हटले आहे की, ऍलर्जी असलेल्या लोकांनी लस घेण्यापूर्वी संपूर्ण काळजी घेतली पाहिजे. ज्यांना यापूर्वी ऍलर्जी रिअ‍ॅक्शन झालेली आहे त्यांनी लस घेणं टाळा.

अलास्का येथील आरोग्य कर्मचा्याला जूने च्या आपत्कालीन विभागात दाखल करण्यात आले. आपत्कालीन विभागाचे संचालक लिंडी जोन्स यांनी सांगितले कि, रुग्णाला यापूर्वी ऍलर्जी ची कोणतीही समस्या नव्हती. तथापि, आता रुग्णाची प्रकृती स्थिर आहे. या रुग्णावर ऍलर्जी चा उपचार केला गेला, त्यानंतर त्याची प्रकृती सुधारली.

फायझर म्हणाले की आमची लस स्पष्ट चेतावणीसह दिली जात आहे की ज्या लोकांना अ‍ॅनाफिलेक्सिस किंवा ऍलर्जी ची समस्या आहे अशा लोकांनी उपचारांसाठी तयार राहावे. फायझर म्हणाले की गरज भासल्यास लसीची लेबलिंग भाषादेखील बदलली जाऊ शकते.

या आठवड्यापासून अमेरिकेत लसीकरण सुरू करण्यात आले आहे आणि प्रथम हे आरोग्यसेवा आणि परिचारिकांना दिले जात आहे. एफडीएचे माजी मुख्य शास्त्रज्ञ जेसी गुडमन यांनी ऍलर्जी बद्दल प्रतिक्रिया व्यक्त करत सांगितले की ही लस घेण्याचे असे धोके असू शकतात आणि हे जास्तीत जास्त समजून घेण्याची गरज आहे.

Share this :
थोडक्यात घडामोडी टीम

कमीत कमी शब्दांमध्ये बातम्या देणारे, आजच्या घडीला थोडक्यात घडामोडी हे मराठीतलं सर्वात वेगानं वाढणारं न्यूजपोर्टल - थोडक्यात घडामोडी

Recent Posts

उष्माघातापासून बचावासाठी नागरिकांनी सतर्क राहावे – विभागीय आयुक्त डॉ. निधी पाण्डेय

अमरावती, दि. 8 : जिल्ह्याचे तापमान 40 अंशाच्या वर असून तापमानात आणखी वाढ होण्याची शक्यता…

1 आठवडा ago

राज्य उत्पादन शुल्क विभागाची कारवाई; २३.५५ लाख किंमतीचा मुद्देमाल जप्त

मुंबई, दि. 8 : उत्पादन शुल्क विभागाच्या भरारी पथकाने ठाणे जिल्ह्यातील विविध ठिकाणी 7 मे…

1 आठवडा ago

मतदारांना पाय दाबून देण्यासाठी फूट मसाजर मशीनची सुविधा

सोलापूर : जिल्ह्यातील सोलापूर व माढा लोकसभा मतदारसंघासाठी 7 मे 2024 रोजी सकाळी सात ते…

1 आठवडा ago

आदर्श आचारसंहितेचे काटेकोरपणे पालन करून राजकीय पक्षांनी प्रशासनाला सहकार्य करावे – निवडणूक निर्णय अधिकारी

मुंबई : लोकसभा निवडणुकीसाठी आदर्श आचारसंहितेची अंमलबजावणी सुरू झाली आहे. राजकीय पक्षांनीही आदर्श आचारसंहितेचे काटेकोरपणे…

1 आठवडा ago

निवडणूक प्रचारासाठी सर्व प्रकारच्या परवानग्या घेणेकामी एक खिडकी योजना कार्यान्वित

ठाणे : भिवंडी लोकसभा मतदार संघांतर्गत निवडणुकी करता उभे राहिलेले सर्व उमेदवार अंतिम झाल्यावर सर्व…

1 आठवडा ago

पाचव्या टप्प्यात राज्यात २६४ उमेदवार निवडणूक रिंगणात

मुंबई : लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीच्या पाचव्या टप्प्यात राज्यातील 13 मतदारसंघात नामनिर्देशन पत्र दाखल करण्याची प्रक्रिया…

1 आठवडा ago