chinese developer builds 10 storey building in just over 28 hrs
बीजिंग : चीनमधील नव-नवीन तंत्रज्ञानाची नेहमीच चर्चा होत असते. आतादेखील अशीच एक घटना समोर आली आहे, ज्यामुळे आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे. चीनमध्ये तंत्रज्ञानाचा वापर करून १० मजली इमारत फक्त २८ तास आणि ४५ मिनिटांत बांधण्यात आली आहे. ऐकून विश्वास बसत नाही, पण हे खरे आहे. चीनच्या अभियंत्यांनी हे शक्य करून दाखवलं आहे.
चीनच्या चांग्शा शहरात २८ तास आणि ४५ मिनिटांमध्ये १० मजली इमारत उभारून तयार करण्यात आली. इतक्या कमी वेळेत इमारत तयार करणाऱ्या विकासकांनी याचा पाच मिनिटांचा व्हिडिओ शेयर केला आहे. यामध्ये पूर्ण इमारत तयार करण्याची माहिती देण्यात आली आहे. त्यांनी सांगितले आहे की, हे तंत्रज्ञान अतिशय सुलभ असून कमी खर्चात दर्जेदार काम करण्यात येऊ शकते. त्यात भूकंप व वादळांचा प्रतिकार करण्याची क्षमता आहे आणि कार्बन स्टीलच्या इमारतीच्या तुलनेत त्याची किंमत कमी आहे. त्यांच्या म्हणण्यानुसार, या प्रणालीमध्ये ज्या स्टील स्लॅबचा वापर स्ट्रक्चरल घटक म्हणून केला जातो, तो पारंपारिक स्लॅबपेक्षा 10 पट हलका आणि 100 पट अधिक मजबूत आहे.
कंपनीने असा दावा केला आहे की या स्लॅबची ताकद व हलकेपणामुळे 200 मजल्यांच्या इमारती तसेच गगनचुंबी टॉवर्स याच मॉड्यूल्सचा वापर करून बांधले जाऊ शकतात.
पुणे : स्वातंत्र्यदिनाच्या निमित्ताने पुणे महानगरपालिकेच्या वतीने आयोजित विशेष सत्कार समारंभात व्यसनमुक्ती अभ्यासक व सामाजिक…
बारामती : पुणे जिल्ह्यातील बारामती शहरात तरुणीचा अकस्मात आणि संशयास्पद मृत्यू झाल्याप्रकरणी तिच्या आईने दिलेल्या…
नाशिक : शनिवारी (दि. ८) झालेल्या महासभेत स्मार्टसिटी कंपनी आणि ‘एमएनजीएल’मुळे शहरातील रस्त्यांची झालेली दुरवस्था…
पुणे : पारी टॉवर्स सहकारी गृहरचना संस्था मर्यादित, नऱ्हेच्या संचालक मंडळाच्या पंचवार्षिक निवडणुकीत ‘उघडलेले पुस्तक’…
हिंगोली : हिंगोली जिल्ह्यात घडलेल्या एका गंभीर घटनेने सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेवरील विश्वास पुन्हा एकदा डळमळीत…
बुलढाणा : केंद्र सरकारच्या फुड स्ट्रीट योजने अंतर्गत विदर्भातील शेगांव आणि मराठवाडा विभागातील शिर्डी येथे…