China’s ‘out-of-control’ rocket
space alert : रॉकेटवरील नियंत्रण गमावल्याने चिनी शास्त्रज्ञांवर टीका होत आहे, त्यातच आता या अनियंत्रित रॉकेटबाबत अमेरिकेने महत्त्वाची माहिती दिली आहे. हे रॉकेट शनिवारी पृथ्वीच्या वातावरण कक्षेत प्रवेश करू शकते. १०० फूट लांब आणि १६ फूट रुंद असलेला रॉकेट ४ मैल प्रति सेकंद या वेगाने पृथ्वीकडे येत आहे. जवळपास २१ टन वजनाचे हे रॉकेट घनदाट लोकसंख्या असलेल्या शहरांमध्ये कोसळू शकते.
अमेरिकन संरक्षण खात्याचे प्रवक्ते माइक हावर्ड यांनी सांगितले की, अमेरिकेचे स्पेस कमांड चीनच्या लाँग मार्च ५बी रॉकेटवर लक्ष ठेवून आहे. हे रॉकेट नेमकं कुठं कोसळणार याबाबत ठोसपणे आताच सांगता येणार नाही. पृथ्वीच्या वातावरणाच्या कक्षेत आल्यानंतर याबाबत भाष्य करता येईल. हे रॉकेट ८ मे रोजी पृथ्वीवर कोसळणार असल्याचे त्यांनी सांगितले. खगोल शास्त्रज्ञ जोनाथन मॅकडोवल यांनी स्पेस न्यूजला सांगितले की, सॅटलाइटच्या मार्गावर न्यूयॉर्क, माद्रिद, बीजिंग, चिली, न्यूझीलंड आहे. या भागात हे रॉकेट कुठेही कोसळू शकते. नागरी वस्ती असलेल्या भागात रॉकेट कोसळण्याची भीती त्यांनी व्यक्त केली. मात्र, पृथ्वीच्या जवळ आल्यानंतर या रॉकेटचा बराचसा हिस्सा जळून खाक होणार असल्याचे त्यांनी सांगितले.
चीनच्या अंतराळ संशोधन संस्थेने काही दिवसांपूर्वीच हे २१ टन वजनाचे ‘लाँग मार्च ५ बी’ श्रेणीतील रॉकेट लाँच केले होते. अंतराळात चीनकडून अंतराळ स्थानक केंद्र उभारले जात आहे. नियोजनानुसार हे रॉकेट समुद्रात कोसळणार होते. मात्र, त्याआधीच नियंत्रण गमावल्याने चिंता वाढली आहे.
कोर स्टेज पृथ्वीच्या वातावरणात प्रवेश करेल तेव्हा काय होईल?
रॉकेटच्या कोर स्टेजची लांबी 100 फूट आणि रुंदी 16 फूट आहे. जेव्हा ते कक्षा सोडून पृथ्वीच्या वातावरणात प्रवेश करेल, तेव्हा ते जळण्याची शक्यता असते. असे असूनही, कोर टप्प्यातील मोठा भाग मलब्याच्या स्वरूपात जमिनीवर पडू शकतो. पृथ्वीचा एक मोठा भाग समुद्राने वेढलेला आहे, त्यामुळे रॉकेटचे भाग तिथे पडण्याची शक्यता आहे. तरीही ते आसपासच्या भागात धोका निर्माण करू शकतात.
हिंगोली : हिंगोली जिल्ह्यात घडलेल्या एका गंभीर घटनेने सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेवरील विश्वास पुन्हा एकदा डळमळीत…
बुलढाणा : केंद्र सरकारच्या फुड स्ट्रीट योजने अंतर्गत विदर्भातील शेगांव आणि मराठवाडा विभागातील शिर्डी येथे…
मुंबई : पुणे शहरातील हडपसर आणि पिंपरी-चिंचवडमधील दापोडी-फुगेवाडी परिसरात विषारी दारू प्यायल्याने १२ नागरिकांचा मृत्यू…
पुणे : महाराष्ट्र शासनाच्या सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागामार्फत प्रदान करण्यात आलेल्या “राष्ट्रपिता महात्मा…
मुंबई : ‘महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना’अंतर्गत महाराष्ट्रात विविध पदांसाठी तात्काळ भरती सुरू…
पुणे : पुणे शहर आणि जिल्ह्यात उष्णतेची तीव्रता दिवसेंदिवस वाढत असून भारतीय हवामान विभागाने (IMD)…