child Falls From 14th Floor Of Tower Block While His Parents Were Drinking Wine In Russia
रशिया : एका जोडप्याला मद्यपान करताना दाखवलेला बेजबाबदारपणा चांगलाच महागात पडला. या जोडप्याने आपल्या 21 महिन्यांच्या मुलाच्या पलंगालगतची खिडकी उघडी ठेवली होती आणि ते दोघे मद्यपान करत होते. यादरम्यान, हे बाळ बेडवर खेळता-खेळता थेट 14 व्या मजल्यावरून खाली कोसळलं. विशेष म्हणजे या जोडप्याला बाळाचा खाली पडून मृत्यू झाल्याचं देखील समजलं नाही. पोलिसांनी दाराची बेल वाजवून बाळाचा मृतदेह त्यांच्या हातात सोपविला, तेव्हा त्यांना मुलाच्या खाली पडल्याची माहिती मिळाली.
रशियन मीडियाच्या वृत्तानुसार, रशियाची राजधानी मॉस्को येथील अलेक्झांडर आणि तैसिया अकिमोव्ह यांना त्यांच्या निष्काळजीपणामुळे त्यांचा मुलगा टिमोफे याच्या झालेल्या मृत्यूच्या आरोपाखाली अटक करण्यात आली आहे. दोषी ठरल्यास या जोडप्याला किमान दोन वर्षे तुरुंगवासाची शिक्षा होऊ शकते.
दरम्यान, रस्त्यावरून जाणाऱ्या लोकांना मार्शल झाखारोव स्ट्रीटवरील निवासी टॉवर ब्लॉकखाली निरागस टिमोफेचा मृतदेह आढळला होता. त्यानंतर त्यांनी तात्काळ घटनेची माहिती पोलिसांना दिली आणि बोलावून घेतले. रशियन अन्वेषण समितीच्या प्रवक्त्या युलिया इव्हानोव्हा म्हणाल्या की अपघाताच्या वेळी मुलाची आई अपार्टमेंटमध्ये होती हे सिद्ध झालं आहे. दारू पिताना या जोडप्याने आपल्या मुलाचा पलंग खिडकीपासून हलविला नाही. या मुलाच्या पालकांचे वय 21 आणि 23 वर्षे आहे. त्यांचा मुलगा खिडकीतून खाली पडला, तेव्हा ते दोघे मद्यपान करीत असल्याचा पुरावा असल्याचे अन्वेषकांनी सांगितले आहे.
गंभीर प्रकरणांची चौकशी करणार्या रशियन अन्वेषण समितीने या घटनेनंतर गाईडलाईन्स जारी केल्या असून, उंच उंच फ्लॅटमध्ये राहणाऱ्या पालकांना मुलांशी संबंधित असलेल्या धोक्यांबाबत चेतावणी देण्यात आली आहे.
रशियाचे मुलांसाठी नियुक्त करण्यात आलेले लोकपाल अण्णा कुझनेत्सोव्हा यांनी खुलासा केला की रशियामध्ये गेल्या वर्षी उंच फ्लॅटमधून खाली पडलेल्या मुलांची एकूण 1,339 प्रकरणे नोंदवली गेली. अशा प्रकारच्या अपघातात 145 मुले मरण पावली आहेत, तर बाकीच्यांना गंभीर आणि किरकोळ जखमा झाल्या. ते पुढे म्हणाले की ‘खिडक्यांमधून मुलांचं पडणं’ ही आमच्यासाठी मोठी वेदनादायी समस्या बनत चालली आहे.
हिंगोली : हिंगोली जिल्ह्यात घडलेल्या एका गंभीर घटनेने सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेवरील विश्वास पुन्हा एकदा डळमळीत…
बुलढाणा : केंद्र सरकारच्या फुड स्ट्रीट योजने अंतर्गत विदर्भातील शेगांव आणि मराठवाडा विभागातील शिर्डी येथे…
मुंबई : पुणे शहरातील हडपसर आणि पिंपरी-चिंचवडमधील दापोडी-फुगेवाडी परिसरात विषारी दारू प्यायल्याने १२ नागरिकांचा मृत्यू…
पुणे : महाराष्ट्र शासनाच्या सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागामार्फत प्रदान करण्यात आलेल्या “राष्ट्रपिता महात्मा…
मुंबई : ‘महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना’अंतर्गत महाराष्ट्रात विविध पदांसाठी तात्काळ भरती सुरू…
पुणे : पुणे शहर आणि जिल्ह्यात उष्णतेची तीव्रता दिवसेंदिवस वाढत असून भारतीय हवामान विभागाने (IMD)…