chef killed by snake bite 20 minutes after chopping its head off
चीन : दक्षिण चीनमध्ये एक अतिशय आश्चर्यकारक घटना घडली आहे. येथे एका रेस्टॉरंटमध्ये एका शेफने कोब्रा सापाचा फणा (डोके) कापून बाजूला ठेवले. यानंतर शेफने त्या सापाचे सूप बनवण्याची तयारी सुरू केली, सुमारे 20 मिनिटांनंतर, या शेफने सापाचे कट केलेले डोके फेकण्यासाठी उचलताच त्याला जोरदार धक्का बसला. कट केलेल्या सापाच्या फ़ण्याने त्याला दंश केला होता, ज्यामुळे त्या शेफचा मृत्यू झाला.
दक्षिण चीनच्या ग्वांगडोंग प्रांतातील फोशान शहरात राहणारा शेफ पेंग फॅन हा इंडोचायनीज स्पिटिंग कोब्रा सापापासून बनवलेले सूप तयार करत होता. शेफ पेंग फॅनने स्पिटिंग कोब्राचा फणा कापून बाजूला ठेवला. त्यानंतर, सापाचे सूप बनवण्यासाठी शेफला 20 मिनिटे लागली. यानंतर शेफने किचन स्वच्छ करायला सुरुवात केली. त्यासाठी शेफने सापाचा कापलेला फणा कचरापेटीत फेकण्यासाठी उचलला, यावेळी शेफला सापाच्या कापलेल्या फ़ण्याने चावा घेतला. दरम्यान, शेफला विषारी साप चावल्याने रेस्टॉरंटमध्ये एकच खळबळ उडाली. आरडाओरडा सुरु झाला. डॉक्टरांना बोलावण्यात आले, पण डॉक्टरांची टीम मदतीसाठी येण्याअगोदरच शेफचा मृत्यू झाला होता.
विषारी कोब्रा सापापासून बनवलेले सूप चीनमध्ये खूप पसंत केले जाते. हे सूप बहुतेक रेस्टॉरंट्समध्ये उपलब्ध असते. तथापि, या प्रकरणातील तज्ञांचे म्हणणे आहे की साप आणि इतर सरपटणारे प्राणी मारल्यानंतरही तासभर प्रतिक्रियाशील हालचाली करू शकतात. कोब्राच्या थुंकीचे विष विशेषतः अतिशय वाईट असते. त्यात न्यूरोटॉक्सिन्स असतात, ज्यामुळे 30 मिनिटांच्या आत मरण येते किंवा अपंगत्व येऊ शकते.
हिंगोली : हिंगोली जिल्ह्यात घडलेल्या एका गंभीर घटनेने सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेवरील विश्वास पुन्हा एकदा डळमळीत…
बुलढाणा : केंद्र सरकारच्या फुड स्ट्रीट योजने अंतर्गत विदर्भातील शेगांव आणि मराठवाडा विभागातील शिर्डी येथे…
मुंबई : पुणे शहरातील हडपसर आणि पिंपरी-चिंचवडमधील दापोडी-फुगेवाडी परिसरात विषारी दारू प्यायल्याने १२ नागरिकांचा मृत्यू…
पुणे : महाराष्ट्र शासनाच्या सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागामार्फत प्रदान करण्यात आलेल्या “राष्ट्रपिता महात्मा…
मुंबई : ‘महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना’अंतर्गत महाराष्ट्रात विविध पदांसाठी तात्काळ भरती सुरू…
पुणे : पुणे शहर आणि जिल्ह्यात उष्णतेची तीव्रता दिवसेंदिवस वाढत असून भारतीय हवामान विभागाने (IMD)…