America President Joe Biden
वॉशिंग्टन : अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडन यांच्या सुरक्षेतील त्रुटीचे प्रकरण समोर आले आहे. प्रत्यक्षात अमेरिकन राष्ट्राध्यक्षांच्या घराजवळ एक अज्ञात विमान आकाशात पोहोचले. हा तो भाग आहे, जो नो फ्लाय झोन म्हणून घोषित करण्यात आलेला आहे. या परिसरात विमान दिसल्यानंतर बायडन आणि त्यांच्या पत्नीला सुरक्षित स्थळी नेण्यात आले.
व्हाईट हाऊसच्या अधिकाऱ्यांनी या घटनेबाबत माहिती दिली की, घटनेच्या वेळी राष्ट्राध्यक्ष जो बायडन आणि त्यांची पत्नी त्यांच्या व्हेकेशन होममध्ये होते. दोघेही सुरक्षित आहेत आणि कोणताही हल्ला झालेला नाही. हल्ल्याचा अंदाज घेऊन दोघांनाही तात्काळ सेफ हाऊसमध्ये नेण्यात आले.
सीक्रेट सर्व्हिसचे प्रवक्ते अँथनी गुग्लिएल्मी म्हणाले की पायलट योग्य रेडिओ चॅनेलवर नव्हता. तसेच, तो मार्गदर्शक तत्त्वांचे पालन करत नव्हता. युनायटेड स्टेट्स सीक्रेट सर्व्हिस आता पायलटची चौकशी करणार आहे. मात्र, विमानामुळे त्यांच्या कुटुंबीयांना कोणतीही इजा झाली नाही. सीक्रेट सर्व्हिसने सांगितले की, विमान तात्काळ बाहेर काढण्यात आले. अमेरिकन राष्ट्राध्यक्षांच्या सुरक्षेसाठी सुरक्षा यंत्रणांनी राष्ट्रपतींच्या निवासस्थानाभोवती नो-फ्लाय झोन घोषित केला आहे. हे क्षेत्र सुमारे 30 मैल आहे. सर्व विमानांना नो फ्लाय झोनचे नियम पाळावे लागतात. या भागातून कोणत्याही विमानाला उड्डाण करण्याची परवानगी नाही.
पुणे : स्वातंत्र्यदिनाच्या निमित्ताने पुणे महानगरपालिकेच्या वतीने आयोजित विशेष सत्कार समारंभात व्यसनमुक्ती अभ्यासक व सामाजिक…
बारामती : पुणे जिल्ह्यातील बारामती शहरात तरुणीचा अकस्मात आणि संशयास्पद मृत्यू झाल्याप्रकरणी तिच्या आईने दिलेल्या…
नाशिक : शनिवारी (दि. ८) झालेल्या महासभेत स्मार्टसिटी कंपनी आणि ‘एमएनजीएल’मुळे शहरातील रस्त्यांची झालेली दुरवस्था…
पुणे : पारी टॉवर्स सहकारी गृहरचना संस्था मर्यादित, नऱ्हेच्या संचालक मंडळाच्या पंचवार्षिक निवडणुकीत ‘उघडलेले पुस्तक’…
हिंगोली : हिंगोली जिल्ह्यात घडलेल्या एका गंभीर घटनेने सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेवरील विश्वास पुन्हा एकदा डळमळीत…
बुलढाणा : केंद्र सरकारच्या फुड स्ट्रीट योजने अंतर्गत विदर्भातील शेगांव आणि मराठवाडा विभागातील शिर्डी येथे…