Allergy to the doctor who took the moderna corona vaccine
मॉडर्ना लसीमुळे त्रास झाल्याची पहिलीच घटना समोर आली आहे. मॉडर्नाची कोरोना लस घेतलेल्या डॉक्टरला अॅलर्जीचा त्रास जाणवत आहे. बोस्टन मेडिकल सेंटरमधील जेरीएट्रिक ऑन्कोलॉजी डिपार्टमेंटमध्ये काम करणारे डॉक्टर होसेन यांना मॉडर्नाची कोरोना लस देण्यात आली होती.
करोना प्रतिबंधक लस दिल्यानंतर मला लगेचच त्रास जाणवू लागला. मला गरगरल्यासारखं वाटू लागलं आणि ह्रदयाची धडधडही वाढली होती, असं डॉक्टर होसेन यांनी न्यूयॉर्क टाइम्सला सांगितलं आहे. बोस्टन मेडिकल सेंटरचे प्रवक्ते डेव्हिड यांनी दिलेल्या माहितीनुसार, “डॉक्टर होसेन यांना त्रास जाणवू लागला त्यामुळे त्यांना आपातकालीन विभागात दाखल करण्यात आलं. तिथे त्यांच्यावर उपचार केल्यानंतर काही काळासाठी देखरेखेखाली ठेवण्यात आलं आणि नंतर डिस्चार्ज देण्यात आला”.
अमेरिकेत सध्या कोरोना लस मोहीम सुरु आहे. यामध्ये ब्रिटनच्या फायझर (Pfizer) आणि जर्मनीच्या बायोएनटेक (BioNtech) लसीव्यतिरिक्त मॉडर्ना लसीचाही वापर केला जात आहे. मॉडर्नाची लस ९५ टक्के सुरक्षित असल्याचा दावा केला जात आहे.
पुणे : स्वातंत्र्यदिनाच्या निमित्ताने पुणे महानगरपालिकेच्या वतीने आयोजित विशेष सत्कार समारंभात व्यसनमुक्ती अभ्यासक व सामाजिक…
बारामती : पुणे जिल्ह्यातील बारामती शहरात तरुणीचा अकस्मात आणि संशयास्पद मृत्यू झाल्याप्रकरणी तिच्या आईने दिलेल्या…
नाशिक : शनिवारी (दि. ८) झालेल्या महासभेत स्मार्टसिटी कंपनी आणि ‘एमएनजीएल’मुळे शहरातील रस्त्यांची झालेली दुरवस्था…
पुणे : पारी टॉवर्स सहकारी गृहरचना संस्था मर्यादित, नऱ्हेच्या संचालक मंडळाच्या पंचवार्षिक निवडणुकीत ‘उघडलेले पुस्तक’…
हिंगोली : हिंगोली जिल्ह्यात घडलेल्या एका गंभीर घटनेने सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेवरील विश्वास पुन्हा एकदा डळमळीत…
बुलढाणा : केंद्र सरकारच्या फुड स्ट्रीट योजने अंतर्गत विदर्भातील शेगांव आणि मराठवाडा विभागातील शिर्डी येथे…