ग्लोबल

जर्मनीमध्ये पिझ्झा डिलिव्हरीचे काम करताय अफगाणिस्तानचे आयटी मंत्री

जर्मनी : अफगाणिस्तानचे आयटी मंत्री सय्यद अहमद शाह सादत जर्मनीमध्ये पिझ्झा डिलिव्हरीचे काम करत आहेत. पिझ्झा कंपनीचा गणवेश परिधान करून ते जर्मनीच्या लीपजिग शहरात सायकलवर पिझ्झा डिलिव्हरीचे काम करत आहेत. तालिबानने अफगाणिस्तान ताब्यात घेतल्यानंतर ते देश सोडून जर्मनीला गेले. आयटी मंत्री असताना त्यांनी अफगाणिस्तानमध्ये सेल फोन नेटवर्कला प्रोत्साहन दिले होते.

सादत यांनी गेल्या वर्षीच माहिती मंत्री पदाचा राजीनामा दिला होता. सादत आणि राष्ट्रपती घनी यांच्यात अनेक मुद्द्यांवर मतभेद होते. राजीनामा दिल्यानंतर, ते काही काळ अफगाणिस्तानमध्येच राहिले, त्यानंतर ते जर्मनीला गेले. सुरुवातीला सर्व काही ठीक होते, पण नंतर पैशाअभावी त्यांनी पिझ्झा डिलिव्हरी बॉय बनण्याचा निर्णय घेतला. डिलिव्हरीचे काम करण्यात कसलीही लाज वाटत नाही, असंदेखील ते म्हणाले.

अफगाणिस्तानच्या महिलेने अमेरिकन लष्कराच्या विमानात दिला बाळाला जन्म

Share this :
थोडक्यात घडामोडी टीम

कमीत कमी शब्दांमध्ये बातम्या देणारे, आजच्या घडीला थोडक्यात घडामोडी हे मराठीतलं सर्वात वेगानं वाढणारं न्यूजपोर्टल - थोडक्यात घडामोडी

Recent Posts

हिंगोलीत धक्कादायक प्रकार! डिझेलअभावी रुग्णवाहिका न मिळाल्याने गर्भातील बाळाचा दुर्दैवी मृत्यू

हिंगोली : हिंगोली जिल्ह्यात घडलेल्या एका गंभीर घटनेने सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेवरील विश्वास पुन्हा एकदा डळमळीत…

2 आठवडे ago

भाविकांसाठी आनंदाची बातमी; धार्मिक स्थळांवर मिळणार दर्जेदार आणि पौष्टिक अन्न सेवा सुविधा

बुलढाणा : केंद्र सरकारच्या फुड स्ट्रीट योजने अंतर्गत विदर्भातील शेगांव आणि मराठवाडा विभागातील शिर्डी येथे…

2 आठवडे ago

पुण्यात विषारी दारू प्यायल्याने १२ जणांचा मृत्यू, दोषींवर कठोर कारवाईचे आदेश

मुंबई : पुणे शहरातील हडपसर आणि पिंपरी-चिंचवडमधील दापोडी-फुगेवाडी परिसरात विषारी दारू प्यायल्याने १२ नागरिकांचा मृत्यू…

2 आठवडे ago

व्यसनमुक्ती क्षेत्रातील अविरत समाजकार्याची दखल; डॉ. सोमनाथ गिते यांचा मा. माधुरीताई मिसाळ यांच्या हस्ते सत्कार

पुणे : महाराष्ट्र शासनाच्या सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागामार्फत प्रदान करण्यात आलेल्या “राष्ट्रपिता महात्मा…

3 आठवडे ago

भरतीच्या बोगस जाहिरातींपासून सावध राहण्याचे आवाहन

मुंबई : ‘महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना’अंतर्गत महाराष्ट्रात विविध पदांसाठी तात्काळ भरती सुरू…

4 आठवडे ago

पुण्यात उष्णतेचा कहर! IMD चा यलो अलर्ट जारी; नागरिकांना काळजी घेण्याचे आवाहन

पुणे : पुणे शहर आणि जिल्ह्यात उष्णतेची तीव्रता दिवसेंदिवस वाढत असून भारतीय हवामान विभागाने (IMD)…

1 महिना ago