A bomb blast near the University of Karachi in Pakistan
पाकिस्तानची आर्थिक राजधानी असलेल्या कराची शहरात भीषण स्फोट झाला आहे. हा स्फोट कराची विद्यापीठाजवळील एका इमारतीत झाला आहे. या स्फोटात तीन जण ठार झाले असून १५ जण जखमी झाले आहेत. मदत व बचाव कार्य सुरू करण्यात आले असून जखमींना उपचारासाठी पटेल रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
कराचीतील गुलशन-ए-इक्बाल या भागातील चार मजली इमारतीमधील दुसऱ्या मजल्यावर हा स्फोट झाला. हा सिलेंडरचा स्फोट असल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. स्फोटामुळे इमारतीचे मोठे नुकसान झाले असून घराचा भाग कोसळला आहे. त्याशिवाय या इमारतीच्या जवळपास असणाऱ्या इमारतींच्या काचा तुटल्या आहेत. बॉम्ब शोधक पथकही घटनास्थळी दाखल झाले. संबंधित परिसर सील करण्यात आला असून चौकशी सुरू करण्यात आली आहे. सिंध प्रांताचे मुख्यमंत्री मुराद अली शहा यांनी कराची आयुक्तांकडून या स्फोटाप्रकरणी अहवाल मागितला आहे.
हिंगोली : हिंगोली जिल्ह्यात घडलेल्या एका गंभीर घटनेने सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेवरील विश्वास पुन्हा एकदा डळमळीत…
बुलढाणा : केंद्र सरकारच्या फुड स्ट्रीट योजने अंतर्गत विदर्भातील शेगांव आणि मराठवाडा विभागातील शिर्डी येथे…
मुंबई : पुणे शहरातील हडपसर आणि पिंपरी-चिंचवडमधील दापोडी-फुगेवाडी परिसरात विषारी दारू प्यायल्याने १२ नागरिकांचा मृत्यू…
पुणे : महाराष्ट्र शासनाच्या सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागामार्फत प्रदान करण्यात आलेल्या “राष्ट्रपिता महात्मा…
मुंबई : ‘महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना’अंतर्गत महाराष्ट्रात विविध पदांसाठी तात्काळ भरती सुरू…
पुणे : पुणे शहर आणि जिल्ह्यात उष्णतेची तीव्रता दिवसेंदिवस वाढत असून भारतीय हवामान विभागाने (IMD)…