Categories: मनोरंजन

सुशांतने अभिनेत्रीसोबत सेटवर कधीच गैरवर्तन केलं नाही, स्वस्तिका मुखर्जीचा खुलासा

बॉलिवूडचा दिवंगत अभिनेता सुशांत सिंह राजपूतचा ‘दिल बेचारा’ हा चित्रपट अलिकडेच प्रदर्शित झाला. मध्यंतरी सुशांतने ‘दिल बेचारा’च्या सेटवर सहकलाकार संजना सांघीसोबत गैरवर्तन केल्याचं म्हटलं जातं होतं. मात्र याप्रकरणी संजनानंतर अभिनेत्री स्वस्तिका मुखर्जीनेदेखील मौन सोडलं आहे. ‘सुशांतने सेटवर कधीच गैरवर्तन केलं नाही’, असं तिने ‘पिंकव्हिला’सोबत बोलताना सांगितलं आहे.

“सेटवर असताना सुशांतने संजनासोबत कधीच गैरवर्तन केलं नाही. तिला त्याच्यासोबत काम करताना कधीच अवघडल्यासारखं झालं नाही. मी चित्रपटात संजनाच्या आईची भूमिका साकारली आहे. जेव्हा सुशांतविषयी या चर्चा होऊ लागल्या आम्हां सगळ्यांना धक्का बसला. तसंच जर संजनासोबत काही गैरवर्तन झालं असतं, तर सेटवरील लोकांच्या माध्यमातून मला ती गोष्ट पटकन समजली असती. परंतु, असं काहीच झालं नव्हतं”, असं स्वस्तिका म्हणाली.

पुढे ती म्हणते, “आईची भूमिका साकारत असल्यामुळे मी संजना आणि सुशांत यांच्यासोबत जास्त वेळ होते. अनेक वेळा आम्ही तिघं एकत्र जेवलो आहे. मात्र चित्रपटातील कलाकार किंवा सेटवरील अन्य स्त्रियांना सुशांतमुळे कधीच अवघडल्यासारखं वाटलं नाही. उलटपक्षी तो सेटवर असताना सकारात्मक वातावरण असायचं”.

दरम्यान,२०१८ मध्ये सुशांतने ‘दिल बेचारा’च्या सेटवर संजना सांघीसोबत गैरवर्तन केल्याचं आरोप करण्यात आले होते. मात्र या आरोपांवर स्वस्तिकाप्रमाणेच संजनानेदेखील मौन सोडलं. सुशांतने कधीच माझ्यासोबत गैरवर्तन केलं नव्हतं, असं तिने एका मुलाखतीत सांगितलं.

Share this :
थोडक्यात घडामोडी टीम

कमीत कमी शब्दांमध्ये बातम्या देणारे, आजच्या घडीला थोडक्यात घडामोडी हे मराठीतलं सर्वात वेगानं वाढणारं न्यूजपोर्टल - थोडक्यात घडामोडी

Recent Posts

स्वातंत्र्यदिनानिमित्त डॉ. सोमनाथ गिते यांचा महापौरांच्या हस्ते गौरव

पुणे : स्वातंत्र्यदिनाच्या निमित्ताने पुणे महानगरपालिकेच्या वतीने आयोजित विशेष सत्कार समारंभात व्यसनमुक्ती अभ्यासक व सामाजिक…

1 आठवडा ago

लग्न ठरलेल्या प्रियकरासोबत तरुणीचा संशयास्पद मृत्यू; आईचा गंभीर आरोप

बारामती : पुणे जिल्ह्यातील बारामती शहरात तरुणीचा अकस्मात आणि संशयास्पद मृत्यू झाल्याप्रकरणी तिच्या आईने दिलेल्या…

2 आठवडे ago

चार महिन्यांपूर्वीचा नवाकोरा रस्ता ऑप्टिकल फायबरसाठी फोडला; राष्ट्रवादी काँग्रेसच्या नगरसेविका डॉ. हेमलता पाटील यांचा संताप; काम बंद पाडून अधिकाऱ्यांना जाब

नाशिक : शनिवारी (दि. ८) झालेल्या महासभेत स्मार्टसिटी कंपनी आणि ‘एमएनजीएल’मुळे शहरातील रस्त्यांची झालेली दुरवस्था…

2 आठवडे ago

‘उघडलेले पुस्तक’ पॅनेलचा दणदणीत विजय; सर्व १५ उमेदवार विजयी; सर्व प्रवर्गांत परिवर्तन आणि सुशासन पॅनेलला यश

पुणे : पारी टॉवर्स सहकारी गृहरचना संस्था मर्यादित, नऱ्हेच्या संचालक मंडळाच्या पंचवार्षिक निवडणुकीत ‘उघडलेले पुस्तक’…

3 आठवडे ago

हिंगोलीत धक्कादायक प्रकार! डिझेलअभावी रुग्णवाहिका न मिळाल्याने गर्भातील बाळाचा दुर्दैवी मृत्यू

हिंगोली : हिंगोली जिल्ह्यात घडलेल्या एका गंभीर घटनेने सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेवरील विश्वास पुन्हा एकदा डळमळीत…

3 महिने ago

भाविकांसाठी आनंदाची बातमी; धार्मिक स्थळांवर मिळणार दर्जेदार आणि पौष्टिक अन्न सेवा सुविधा

बुलढाणा : केंद्र सरकारच्या फुड स्ट्रीट योजने अंतर्गत विदर्भातील शेगांव आणि मराठवाडा विभागातील शिर्डी येथे…

3 महिने ago