Salman Khan
मुंबई : मुंबई पोलिसांनी अभिनेता सलमान खानला बंदुकीचा परवाना मंजूर केला आहे. 22 जुलै रोजी सलमानने मुंबई पोलीस आयुक्त विवेक फणसाळकर यांची भेट घेतली होती. जीवे मारण्याची धमकी देणारे पत्र मिळाल्यानंतर त्याने बंदुक परवान्यासाठी अर्ज केला होता. सलमान खानला जीवे मारण्याच्या धमक्या मिळाल्यानंतर त्याने तशी विनंती केल्यानंतर त्याला शस्त्र परवाना जारी करण्यात आला आहे, असे मुंबई पोलिसांनी सांगितले आहे.
सलमानच्या विनंतीनंतर, पोलिसांनी ते डीसीपी झोन 9 कडे पाठवले ज्यांच्या अधिकारक्षेत्रात सलमान राहतो. झोनल डीसीपीकडून पुढे गेल्यानंतर सलमान खानला परवाना देण्यात आला. मुंबई पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार त्याला एका बंदुकीसाठी परवाना देण्यात आला आहे.
सलमानने पोलिस सहआयुक्त (कायदा व सुव्यवस्था) विश्वास नांगरे-पाटील यांचीही आयुक्त कार्यालयात भेट घेतली होती. या भेटीबद्दल पत्रकारांनी विचारले असता, सलमानने सांगितले कि, “ते माझे जुने मित्र आहेत.”
सलमान खान आणि त्याचे वडील, पटकथा लेखक सलीम खान यांना जूनमध्ये एक पत्र प्राप्त झाले, ज्यामध्ये त्यांना जीवे मारण्याची धमकी देण्यात आली होती. पंजाबच्या मानसा जिल्ह्यात 29 मे रोजी पंजाबी गायक सिद्धू मूसेवाला यांची हत्या करण्यात आली होती, त्याचा संदर्भ देत, “तुम्हारा मूसवाला कर देंगे” असे धमकीच्या चिठ्ठीत म्हटले होते.
पुणे : स्वातंत्र्यदिनाच्या निमित्ताने पुणे महानगरपालिकेच्या वतीने आयोजित विशेष सत्कार समारंभात व्यसनमुक्ती अभ्यासक व सामाजिक…
बारामती : पुणे जिल्ह्यातील बारामती शहरात तरुणीचा अकस्मात आणि संशयास्पद मृत्यू झाल्याप्रकरणी तिच्या आईने दिलेल्या…
नाशिक : शनिवारी (दि. ८) झालेल्या महासभेत स्मार्टसिटी कंपनी आणि ‘एमएनजीएल’मुळे शहरातील रस्त्यांची झालेली दुरवस्था…
पुणे : पारी टॉवर्स सहकारी गृहरचना संस्था मर्यादित, नऱ्हेच्या संचालक मंडळाच्या पंचवार्षिक निवडणुकीत ‘उघडलेले पुस्तक’…
हिंगोली : हिंगोली जिल्ह्यात घडलेल्या एका गंभीर घटनेने सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेवरील विश्वास पुन्हा एकदा डळमळीत…
बुलढाणा : केंद्र सरकारच्या फुड स्ट्रीट योजने अंतर्गत विदर्भातील शेगांव आणि मराठवाडा विभागातील शिर्डी येथे…