preity zinta became mother of twins babies
बॉलिवूड अभिनेत्री प्रीती झिंटाने चाहत्यांसोबत एक आनंदाची बातमी शेयर केली आहे. प्रीती झिंटा दोन जुळ्या मुलांची आई झाली आहे. प्रितीने तिच्या आयुष्यातील हा सर्वात आनंदाचा क्षण सोशल मीडिया पोस्टद्वारे चाहत्यांसोबत शेअर केला आहे. पोस्टमध्ये प्रीतीने तिच्या दोन मुलांची नावेही चाहत्यांना सांगितली आहेत.
प्रिती झिंटाने तिच्या इन्स्टाग्राम हँडलवर तिच्या पतीसोबतच्या फोटोसह एक खास नोट शेअर करून ही आनंदाची बातमी दिली आहे. प्रीतीने तिच्या पोस्टमध्ये लिहिले कि, “मला आज तुम्हा सर्वांसोबत एक बातमी शेअर करायची आहे. मी आणि जीन खूप आनंदी आहोत. आमचे अंतःकरण खूप कृतज्ञता आणि प्रेमाने भरले आहे, कारण आमच्या घरात जुळ्या मुलांनी जय झिंटा गुडनफ आणि जिया झिंटा गुडनफ यांनी जन्म घेतला आहे.
प्रिती झिंटाने तिच्या पोस्टमध्ये पुढे लिहिले कि, “आम्ही आमच्या आयुष्याच्या नवीन टप्प्याबद्दल खूप उत्सुक आहोत. आमच्या अविश्वसनीय प्रवासाचा एक भाग असल्याबद्दल सर्व डॉक्टर, परिचारिका आणि आमच्या सरोगेटचे मनःपूर्वक आभार. सर्वांना खूप खूप प्रेम.
मुंबई : हरियाणवी मनोरंजन क्षेत्रातील उदयोन्मुख अभिनेत्री दिव्यांका सिरोही हिच्या आकस्मिक निधनाने चाहत्यांमध्ये शोककळा पसरली…
मुंबई : महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ (एसटी) व परिवहन विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या ‘रस्ता सुरक्षा…
मुंबई : विद्यार्थ्यांना परदेशात रोजगाराच्या संधी उपलब्ध होण्यासाठी संबंधित देशांची भाषा व संस्कृतीचे ज्ञान अत्यावश्यक…
मुंबई : भारतीय हवामान खात्याच्या (आयएमडी) दिनांक २० एप्रिल २०२६ रोजी जाहीर केलेल्या पाच दिवसीय…
शिबलापूर : समाजहिताची जाणीव जपत आणि शिक्षणाला हातभार लावण्याच्या उद्देशाने, महाराष्ट्र शासनाकडून प्रदान करण्यात आलेल्या…
बीड : बीड जिल्ह्यात एक अत्यंत धक्कादायक आणि संतापजनक घटना समोर आली आहे. परळी तालुक्यातील…