People laughed over Disha's bag at the screening of Heropanti 2
मुंबई : टायगर श्रॉफ आज त्याचा नवा चित्रपट घेऊन येत आहे. आज त्याचा हिरोपंती 2 हा चित्रपट थिएटरमध्ये झळकणार आहे. या चित्रपटाच्या पहिल्या भागासह टायगर श्रॉफने इंडस्ट्रीत पाऊल ठेवले होते. हा चित्रपट चाहत्यांना खूप आवडला होता. तारा सुतारिया आणि नवाजुद्दीन सिद्दीकी यांना हिरोपंती २ मध्ये पाहण्यासाठी लोक आतुर झाले आहेत. काल रात्री मुंबईत हिरोपंती २ चे स्पेशल स्क्रिनिंग आयोजित करण्यात आले होते आणि यावेळी टायगर श्रॉफचा चित्रपट पाहण्यासाठी बॉलिवूडचे सर्व सेलिब्रिटी आले होते. दरम्यान, टायगर श्रॉफची खास मैत्रीण दिशा पाटणीही दिसली.
स्क्रिनिंगमधील दिशा पाटणीचा एक व्हिडिओ समोर आला आहे, जो सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत आहे. हिरोपंती 2 च्या स्क्रिनिंगमध्ये दिशा पाटणी फिकट जांभळ्या रंगाच्या सुंदर ड्रेसमध्ये दिसली. या ड्रेसमध्ये ती खूप सुंदर दिसत आहे. स्क्रीनिंगपूर्वी दिशा मीडिया पापाराझींसमोर पोज देताना दिसत आहे. मात्र, हा व्हिडिओ पाहताच लोकांचे लक्ष दिशा पाटणीच्या हँडबॅगकडे गेले आणि तेव्हापासून दिशा सतत ट्रोल होत आहे.
व्हिडिओमध्ये दिसतेय की, दिशा पाटणीने खूप लहान हँडबॅग कॅरी केली आहे आणि आता दिशाच्या बॅगच्या आकाराची खूप चर्चा सुरु आहे. व्हिडिओ पाहिल्यानंतर एका यूजरने लिहिले की, ‘आश्चर्य वाटत आहे की दिशाने या बॅगमध्ये काय ठेवले असेल?’ तर दुसऱ्या यूजरने लिहिले की, ‘या बॅगेत काय ठेवले असावे?’ अशा प्रतिक्रिया अनेकांनी दिल्या आहेत.
हिंगोली : हिंगोली जिल्ह्यात घडलेल्या एका गंभीर घटनेने सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेवरील विश्वास पुन्हा एकदा डळमळीत…
बुलढाणा : केंद्र सरकारच्या फुड स्ट्रीट योजने अंतर्गत विदर्भातील शेगांव आणि मराठवाडा विभागातील शिर्डी येथे…
मुंबई : पुणे शहरातील हडपसर आणि पिंपरी-चिंचवडमधील दापोडी-फुगेवाडी परिसरात विषारी दारू प्यायल्याने १२ नागरिकांचा मृत्यू…
पुणे : महाराष्ट्र शासनाच्या सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागामार्फत प्रदान करण्यात आलेल्या “राष्ट्रपिता महात्मा…
मुंबई : ‘महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना’अंतर्गत महाराष्ट्रात विविध पदांसाठी तात्काळ भरती सुरू…
पुणे : पुणे शहर आणि जिल्ह्यात उष्णतेची तीव्रता दिवसेंदिवस वाढत असून भारतीय हवामान विभागाने (IMD)…