मनोरंजन

अभिनेत्री राय देबलीना डे हिचा झोपेच्या गोळ्या खाऊन आत्महत्येचा प्रयत्न, फेसबुक पोस्टने वेधले लक्ष…

मॉडेल आणि अभिनेत्री राय देबलीना डे हिने शुक्रवारी रात्री उशिरा आत्महत्येचा प्रयत्न केला. तिने फेसबुकवर एक पोस्ट शेअर केली होती आणि टोकाचे पाऊल उचलण्याचे संकेत दिले. नंतर ही पोस्ट हटवण्यात आली, मात्र YouTuber आणि अभिनेता सँडी साहा यांच्यासह नेटिझन्सचे लक्ष या पोस्टने वेधून घेतले होते, त्यामुळे त्यांनी तात्काळ अभिनेत्रीला वाचवण्यासाठी इतरांची मदत घेतली. या पोस्टमध्ये तिने तिच्या कुटुंबियांना दोष दिल्याची माहिती आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, तिच्या मित्रांनी तिच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता देबलीनाचा फोन बंद होता. त्यामुळे कोणीतरी मदतीसाठी पूरबा जाधवपूर पोलिस ठाण्यात संपर्क साधला. पोलिसांनी त्वरीत तिच्या घरी धाव घेतली, तेव्हा देबलीना बेशुद्ध अवस्थेत पडलेली आढळली. पोलिस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, अभिनेत्रीने झोपेच्या गोळ्या खाल्ल्याचा आरोप आहे. तिला वैद्यकीय उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले. तिथे तिच्यावर उपचार करण्यात येत आहेत.

पोलीस या प्रकरणाचा तपास करत असून या घटनेमागील कारण शोधण्याचा प्रयत्न करत आहेत. पोलीस अधिकाऱ्यांनी देबलीनाच्या कुटुंबीयांची देखील तिच्या सोशल मीडिया पोस्टमध्ये केलेल्या आरोपांबाबत चौकशी केली.

देबलीनाने मॉडेल म्हणून काम केले आहे आणि चित्रपट आणि टीव्ही शोमध्येही छोट्या भूमिका केल्या आहेत.
या घटनेने देबलीनाच्या मित्रांना धक्का बसला आहे. अलीकडेच, अभिनेत्री पल्लवी डे तिच्या निवासस्थानी गळफास घेतलेल्या अवस्थेत सापडली होती. तिच्या लिव्ह-इन बॉयफ्रेंडला नंतर अटक करण्यात आली असून या घटनेची चौकशी सुरू आहे. काही दिवसांपूर्वी, आणखी तीन मॉडेल-अभिनेत्री रहस्यमय परिस्थितीत मृत सापडल्या होत्या.

Share this :
थोडक्यात घडामोडी टीम

कमीत कमी शब्दांमध्ये बातम्या देणारे, आजच्या घडीला थोडक्यात घडामोडी हे मराठीतलं सर्वात वेगानं वाढणारं न्यूजपोर्टल - थोडक्यात घडामोडी

Recent Posts

स्वातंत्र्यदिनानिमित्त डॉ. सोमनाथ गिते यांचा महापौरांच्या हस्ते गौरव

पुणे : स्वातंत्र्यदिनाच्या निमित्ताने पुणे महानगरपालिकेच्या वतीने आयोजित विशेष सत्कार समारंभात व्यसनमुक्ती अभ्यासक व सामाजिक…

1 आठवडा ago

लग्न ठरलेल्या प्रियकरासोबत तरुणीचा संशयास्पद मृत्यू; आईचा गंभीर आरोप

बारामती : पुणे जिल्ह्यातील बारामती शहरात तरुणीचा अकस्मात आणि संशयास्पद मृत्यू झाल्याप्रकरणी तिच्या आईने दिलेल्या…

2 आठवडे ago

चार महिन्यांपूर्वीचा नवाकोरा रस्ता ऑप्टिकल फायबरसाठी फोडला; राष्ट्रवादी काँग्रेसच्या नगरसेविका डॉ. हेमलता पाटील यांचा संताप; काम बंद पाडून अधिकाऱ्यांना जाब

नाशिक : शनिवारी (दि. ८) झालेल्या महासभेत स्मार्टसिटी कंपनी आणि ‘एमएनजीएल’मुळे शहरातील रस्त्यांची झालेली दुरवस्था…

2 आठवडे ago

‘उघडलेले पुस्तक’ पॅनेलचा दणदणीत विजय; सर्व १५ उमेदवार विजयी; सर्व प्रवर्गांत परिवर्तन आणि सुशासन पॅनेलला यश

पुणे : पारी टॉवर्स सहकारी गृहरचना संस्था मर्यादित, नऱ्हेच्या संचालक मंडळाच्या पंचवार्षिक निवडणुकीत ‘उघडलेले पुस्तक’…

2 आठवडे ago

हिंगोलीत धक्कादायक प्रकार! डिझेलअभावी रुग्णवाहिका न मिळाल्याने गर्भातील बाळाचा दुर्दैवी मृत्यू

हिंगोली : हिंगोली जिल्ह्यात घडलेल्या एका गंभीर घटनेने सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेवरील विश्वास पुन्हा एकदा डळमळीत…

3 महिने ago

भाविकांसाठी आनंदाची बातमी; धार्मिक स्थळांवर मिळणार दर्जेदार आणि पौष्टिक अन्न सेवा सुविधा

बुलढाणा : केंद्र सरकारच्या फुड स्ट्रीट योजने अंतर्गत विदर्भातील शेगांव आणि मराठवाडा विभागातील शिर्डी येथे…

3 महिने ago