मनोरंजन

अभिनेत्री मलायका अरोराचा अपघात, अपोलो रुग्णालयात दाखल

मुंबई : बॉलिवूड अभिनेत्री मलायका अरोरा हिचा शनिवारी संध्याकाळी अपघात झाला. वृत्तानुसार, महाराष्ट्रातील खोपोली येथे एक्स्प्रेस वेवर अभिनेत्रीच्या कारला अपघात झाला. मलायका किरकोळ जखमी झाली असून तिला तातडीने जवळच्या अपोलो रुग्णालयात नेण्यात आले.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवर एक अपघात प्रवण क्षेत्र आहे, तिथे हा अपघात झाला. तीन वाहने एकमेकांवर आदळली असून तीनही वाहनांचे नुकसान झाले आहे. सर्वांना किरकोळ दुखापत झाली आहे, असे खोपोली पोलिस स्टेशनचे पोलिस निरीक्षक शिरीष पवार यांनी सांगितले. पोलीस सध्या या प्रकरणाचा तपास करत आहेत, नंतर एफआयआर दाखल केली जाईल.

पोलिसांनी सांगितले कि, आम्हाला तिन्ही कारचे नोंदणी क्रमांक मिळाले आहेत आणि आता प्रत्यक्षात काय झाले हे समजून घेण्यासाठी आम्ही कारच्या मालकांशी संपर्क साधू. अपघात कसा घडला आणि कोणाची चूक होती याचा तपास केल्यानंतर एफआयआर नोंदविली जाईल.

Share this :
थोडक्यात घडामोडी टीम

कमीत कमी शब्दांमध्ये बातम्या देणारे, आजच्या घडीला थोडक्यात घडामोडी हे मराठीतलं सर्वात वेगानं वाढणारं न्यूजपोर्टल - थोडक्यात घडामोडी

Recent Posts

स्वातंत्र्यदिनानिमित्त डॉ. सोमनाथ गिते यांचा महापौरांच्या हस्ते गौरव

पुणे : स्वातंत्र्यदिनाच्या निमित्ताने पुणे महानगरपालिकेच्या वतीने आयोजित विशेष सत्कार समारंभात व्यसनमुक्ती अभ्यासक व सामाजिक…

1 दिवस ago

लग्न ठरलेल्या प्रियकरासोबत तरुणीचा संशयास्पद मृत्यू; आईचा गंभीर आरोप

बारामती : पुणे जिल्ह्यातील बारामती शहरात तरुणीचा अकस्मात आणि संशयास्पद मृत्यू झाल्याप्रकरणी तिच्या आईने दिलेल्या…

6 दिवस ago

चार महिन्यांपूर्वीचा नवाकोरा रस्ता ऑप्टिकल फायबरसाठी फोडला; राष्ट्रवादी काँग्रेसच्या नगरसेविका डॉ. हेमलता पाटील यांचा संताप; काम बंद पाडून अधिकाऱ्यांना जाब

नाशिक : शनिवारी (दि. ८) झालेल्या महासभेत स्मार्टसिटी कंपनी आणि ‘एमएनजीएल’मुळे शहरातील रस्त्यांची झालेली दुरवस्था…

1 आठवडा ago

‘उघडलेले पुस्तक’ पॅनेलचा दणदणीत विजय; सर्व १५ उमेदवार विजयी; सर्व प्रवर्गांत परिवर्तन आणि सुशासन पॅनेलला यश

पुणे : पारी टॉवर्स सहकारी गृहरचना संस्था मर्यादित, नऱ्हेच्या संचालक मंडळाच्या पंचवार्षिक निवडणुकीत ‘उघडलेले पुस्तक’…

1 आठवडा ago

हिंगोलीत धक्कादायक प्रकार! डिझेलअभावी रुग्णवाहिका न मिळाल्याने गर्भातील बाळाचा दुर्दैवी मृत्यू

हिंगोली : हिंगोली जिल्ह्यात घडलेल्या एका गंभीर घटनेने सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेवरील विश्वास पुन्हा एकदा डळमळीत…

3 महिने ago

भाविकांसाठी आनंदाची बातमी; धार्मिक स्थळांवर मिळणार दर्जेदार आणि पौष्टिक अन्न सेवा सुविधा

बुलढाणा : केंद्र सरकारच्या फुड स्ट्रीट योजने अंतर्गत विदर्भातील शेगांव आणि मराठवाडा विभागातील शिर्डी येथे…

3 महिने ago