मनोरंजन

‘छावा’ सिनेमाला शिर्के घराण्याचा विरोध; लक्ष्मण उतेकरांनी वादावर दिलं स्पष्टीकरण, सिनेमाचा हेतू कोणाची भावना दुखवणं नव्हतं

छावा हा चित्रपट छत्रपती संभाजी महाराज यांच्या आयुष्यावर आधारित आहे, आणि सुरुवातीपासूनच तो वादाच्या भोवऱ्यात अडकल्याचं दिसून आलं आहे. सिनेमाच्या सुरुवातीलाच संभाजी महाराजांना लेझीम खेळताना दाखवल्यामुळे संपूर्ण महाराष्ट्रातून संताप व्यक्त करण्यात आला होता. त्यानंतर दिग्दर्शक लक्ष्मण उतेकर यांनी त्या सीनला काढून टाकलं. मात्र, सिनेमा रिलीज झाल्यानंतर आणखी एक वाद समोर आला, ज्यात छावा सिनेमात छत्रपती संभाजी महाराजांना कैद करण्यासाठी मुघलांची मदत घेण्याचा संदर्भ गणोजी आणि कान्होजी शिर्के यांनी दिल्याचं दाखवण्यात आलं होतं. यामुळे शिर्के घराण्याने संताप व्यक्त केला आणि त्यांचा उल्लेख हटवण्याची मागणी केली. शिर्के घराण्याने इतरथा दिग्दर्शकावर गुन्हा दाखल करण्याचा इशाराही दिला.

यावर लक्ष्मण उतेकर यांनी माफी मागितली आहे. त्यांनी म्हटलं, आदरणीय भूषणजी, खूप सॉरी, मी तुमचा फोन उचलला नाही कारण मी रेंज नसलेल्या भागात होतो. तुमची पत्रकार परिषद पाहिली आणि तुमचा मेसेज वाचला. मी तुमची माफी मागतो, जर तुमच्या भावना दुखावल्या असतील. सिनेमाच्या सुरुवातीलाच एक डिस्क्लेमर दिला आहे, ज्यात म्हटलं आहे की, हा सिनेमा छावा कादंबरीवर आधारित आहे, जी शिवाजी सावंत यांनी लिहिली आहे. त्यामुळे, या चित्रपटाची कथा आणि पटकथा छावा कादंबरीवर आधारित आहे आणि आम्ही त्याला रंगवण्याचा प्रयत्न केला आहे.

लक्ष्मण उतेकर यांनी पुढे सांगितलं, कादंबरी म्हणजे शब्दांनी रंगवलेली कथा असते, आणि चित्रपट हा त्या कथेचं दृश्य रुप असतो. तरीही माहिती दोन्ही ठिकाणी एकच असते. मी दिग्दर्शक म्हणून कोणताही ट्वीस्ट टाकलेला नाही. छावा सिनेमात गणोजी आणि कान्होजी शिर्के यांचा उल्लेख आहे आणि त्यांचा कुलदैवतही दाखवला आहे. हे सर्व माहिती पुस्तकात उपलब्ध आहे. यापूर्वी आलेल्या काही टीव्ही सिरियल्समध्येही त्याच प्रकारे दाखवले गेले होते.

त्यांनी सांगितलं, आम्ही सिनेमात शिर्के कुटुंबाच्या गावाचा उल्लेखही केलेला नाही. मला तुमची भावना दुखवायची नव्हती. सिनेमाचा उद्देश मुळात पैसे कमवण्याचा नाही, तर तो ऐतिहासिक धोराड्याचा हिस्सा लोकांपर्यंत पोहोचवण्याचा होता. मला माहीत आहे की, हे एक प्रामाणिक प्रयत्न होते, ज्यात आम्ही रात्रंदिवस मेहनत घेतली. जर काही चुकीचं वाटत असेल, तर मी दिलगिरी व्यक्त करतो. पण सिनेमात शिर्के घराण्याचं नाव कुठेही घेतलेलं नाही. इतर कलाकृतींमध्ये त्यांचा उल्लेख आहे, त्यामुळे तुम्ही माझ्या भावना समजून घेईल, अशी आशा आहे.

Share this :
थोडक्यात घडामोडी टीम

कमीत कमी शब्दांमध्ये बातम्या देणारे, आजच्या घडीला थोडक्यात घडामोडी हे मराठीतलं सर्वात वेगानं वाढणारं न्यूजपोर्टल - थोडक्यात घडामोडी

Recent Posts

स्वातंत्र्यदिनानिमित्त डॉ. सोमनाथ गिते यांचा महापौरांच्या हस्ते गौरव

पुणे : स्वातंत्र्यदिनाच्या निमित्ताने पुणे महानगरपालिकेच्या वतीने आयोजित विशेष सत्कार समारंभात व्यसनमुक्ती अभ्यासक व सामाजिक…

1 आठवडा ago

लग्न ठरलेल्या प्रियकरासोबत तरुणीचा संशयास्पद मृत्यू; आईचा गंभीर आरोप

बारामती : पुणे जिल्ह्यातील बारामती शहरात तरुणीचा अकस्मात आणि संशयास्पद मृत्यू झाल्याप्रकरणी तिच्या आईने दिलेल्या…

2 आठवडे ago

चार महिन्यांपूर्वीचा नवाकोरा रस्ता ऑप्टिकल फायबरसाठी फोडला; राष्ट्रवादी काँग्रेसच्या नगरसेविका डॉ. हेमलता पाटील यांचा संताप; काम बंद पाडून अधिकाऱ्यांना जाब

नाशिक : शनिवारी (दि. ८) झालेल्या महासभेत स्मार्टसिटी कंपनी आणि ‘एमएनजीएल’मुळे शहरातील रस्त्यांची झालेली दुरवस्था…

2 आठवडे ago

‘उघडलेले पुस्तक’ पॅनेलचा दणदणीत विजय; सर्व १५ उमेदवार विजयी; सर्व प्रवर्गांत परिवर्तन आणि सुशासन पॅनेलला यश

पुणे : पारी टॉवर्स सहकारी गृहरचना संस्था मर्यादित, नऱ्हेच्या संचालक मंडळाच्या पंचवार्षिक निवडणुकीत ‘उघडलेले पुस्तक’…

2 आठवडे ago

हिंगोलीत धक्कादायक प्रकार! डिझेलअभावी रुग्णवाहिका न मिळाल्याने गर्भातील बाळाचा दुर्दैवी मृत्यू

हिंगोली : हिंगोली जिल्ह्यात घडलेल्या एका गंभीर घटनेने सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेवरील विश्वास पुन्हा एकदा डळमळीत…

3 महिने ago

भाविकांसाठी आनंदाची बातमी; धार्मिक स्थळांवर मिळणार दर्जेदार आणि पौष्टिक अन्न सेवा सुविधा

बुलढाणा : केंद्र सरकारच्या फुड स्ट्रीट योजने अंतर्गत विदर्भातील शेगांव आणि मराठवाडा विभागातील शिर्डी येथे…

3 महिने ago