Kannada superstar Puneet Rajkumar dies of heart attack
सुप्रसिद्ध कन्नड सुपरस्टार पुनीत राजकुमार यांचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले आहे. वयाच्या ४६ व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या निधनामुळे कन्नड चित्रपटसृष्टीवर शोककळा पसरली आहे. पुनीत यांना हृदयविकाराचा तीव्र झटका आला होता. त्यानंतर बंगळुरुमधील विक्रम रुग्णालयात त्यांनी अखेरचा श्वास घेतला.
सकाळी 11.30 वाजता छातीत दुखत असल्याच्या तक्रारीवरुन अभिनेता राजकुमार यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. रुग्णालयातील डॉक्टरांनी त्यांना वाचवण्यासाठी बरेच प्रयत्न केले. डॉक्टरांचे एक पथक त्याच्यावर सतत नजर ठेवून होते. मात्र त्यांची प्रकृती खालावत गेली. त्यानंतर त्यांचे निधन झाल्याचे डॉक्टरांनी घोषित केले.
अभिनेते पुनीत राजकुमार यांच्या निधनाची बातमी समजताच अनेकजण बंगळुरुमधील विक्रम रुग्णालयाच्या बाहेर जमा झाले आहेत. त्यांचे चाहते रडत आहेत. त्यांच्या निधनानंतर कन्नड सिनेसृष्टीसह बॉलिवूडमधील अनेक कलाकारांनी हळहळ व्यक्त केली आहे. बॉलिवूडमधील अनेक कलाकार, दिग्दर्शक, क्रिकेटपटू यांच्यासह अनेकांनी त्यांच्या निधनानंतर शोक व्यक्त केला आहे.
पुणे : स्वातंत्र्यदिनाच्या निमित्ताने पुणे महानगरपालिकेच्या वतीने आयोजित विशेष सत्कार समारंभात व्यसनमुक्ती अभ्यासक व सामाजिक…
बारामती : पुणे जिल्ह्यातील बारामती शहरात तरुणीचा अकस्मात आणि संशयास्पद मृत्यू झाल्याप्रकरणी तिच्या आईने दिलेल्या…
नाशिक : शनिवारी (दि. ८) झालेल्या महासभेत स्मार्टसिटी कंपनी आणि ‘एमएनजीएल’मुळे शहरातील रस्त्यांची झालेली दुरवस्था…
पुणे : पारी टॉवर्स सहकारी गृहरचना संस्था मर्यादित, नऱ्हेच्या संचालक मंडळाच्या पंचवार्षिक निवडणुकीत ‘उघडलेले पुस्तक’…
हिंगोली : हिंगोली जिल्ह्यात घडलेल्या एका गंभीर घटनेने सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेवरील विश्वास पुन्हा एकदा डळमळीत…
बुलढाणा : केंद्र सरकारच्या फुड स्ट्रीट योजने अंतर्गत विदर्भातील शेगांव आणि मराठवाडा विभागातील शिर्डी येथे…