मनोरंजन

अभिनेत्री चेतना राजचे निधन, वजन कमी करण्यासाठी केलेली सर्जरी बेतली जीवावर

बेंगळुरू : अधिक सुंदर दिसण्याच्या नादात अनेक अभिनेत्री प्लास्टिक सर्जरी करतात. अशाच एका सर्जरीत कन्नड अभिनेत्री चेतना राज हिने आपला जीव गमावला आहे. कन्नड टेलिव्हिजनची ती लोकप्रिय अभिनेत्री होती. 21 वर्षीय चेतनाने बेंगळुरूच्या एका खासगी रूग्णालयात अखेरचा श्वास घेतला.

मिळालेल्या माहितीनुसार, चेतना राजने अलीकडेच वजन कमी करण्यासाठी बंगळुरूमधील एका खाजगी हॉस्पिटलमध्ये फॅट फ्री सर्जरी करुन घेतली होती. सर्जरीनंतर काही तासांतच तिला अस्वस्थ वाटू लागलं. तिला श्वास घ्यायला त्रास जाणवू लागला. तिच्या फुफ्फुसांत पाणी भरलं. दरम्यान काल 16 मे रोजी तिचं निधन झालं.

चेतनाने सर्जरीबद्दल आपल्या आईवडिलांना काहीही माहिती दिली नव्हती. ती एकटी आपल्या मित्रांसोबत हॉस्पिटलमध्ये गेल्याचं सांगण्यात येत आहे. चेतनाच्या निधनाचं वृत्त ऐकून तिच्या पालकांना मोठा धक्का बसला आहे. त्यांनी डॉक्टरांवर निष्काळजीपणाचा आरोप केला आहे. सध्या अभिनेत्रीचा मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठविण्यात आला आहे. पोलीस पुढील तपास करत आहेत. चेतना कन्नड टीव्हीची लोकप्रिय अभिनेत्री होती. तिने अनेक टीव्ही मालिकामध्ये काम केलं होतं.

Share this :
थोडक्यात घडामोडी टीम

कमीत कमी शब्दांमध्ये बातम्या देणारे, आजच्या घडीला थोडक्यात घडामोडी हे मराठीतलं सर्वात वेगानं वाढणारं न्यूजपोर्टल - थोडक्यात घडामोडी

Recent Posts

स्वातंत्र्यदिनानिमित्त डॉ. सोमनाथ गिते यांचा महापौरांच्या हस्ते गौरव

पुणे : स्वातंत्र्यदिनाच्या निमित्ताने पुणे महानगरपालिकेच्या वतीने आयोजित विशेष सत्कार समारंभात व्यसनमुक्ती अभ्यासक व सामाजिक…

4 आठवडे ago

लग्न ठरलेल्या प्रियकरासोबत तरुणीचा संशयास्पद मृत्यू; आईचा गंभीर आरोप

बारामती : पुणे जिल्ह्यातील बारामती शहरात तरुणीचा अकस्मात आणि संशयास्पद मृत्यू झाल्याप्रकरणी तिच्या आईने दिलेल्या…

4 आठवडे ago

चार महिन्यांपूर्वीचा नवाकोरा रस्ता ऑप्टिकल फायबरसाठी फोडला; राष्ट्रवादी काँग्रेसच्या नगरसेविका डॉ. हेमलता पाटील यांचा संताप; काम बंद पाडून अधिकाऱ्यांना जाब

नाशिक : शनिवारी (दि. ८) झालेल्या महासभेत स्मार्टसिटी कंपनी आणि ‘एमएनजीएल’मुळे शहरातील रस्त्यांची झालेली दुरवस्था…

1 महिना ago

‘उघडलेले पुस्तक’ पॅनेलचा दणदणीत विजय; सर्व १५ उमेदवार विजयी; सर्व प्रवर्गांत परिवर्तन आणि सुशासन पॅनेलला यश

पुणे : पारी टॉवर्स सहकारी गृहरचना संस्था मर्यादित, नऱ्हेच्या संचालक मंडळाच्या पंचवार्षिक निवडणुकीत ‘उघडलेले पुस्तक’…

1 महिना ago

हिंगोलीत धक्कादायक प्रकार! डिझेलअभावी रुग्णवाहिका न मिळाल्याने गर्भातील बाळाचा दुर्दैवी मृत्यू

हिंगोली : हिंगोली जिल्ह्यात घडलेल्या एका गंभीर घटनेने सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेवरील विश्वास पुन्हा एकदा डळमळीत…

3 महिने ago

भाविकांसाठी आनंदाची बातमी; धार्मिक स्थळांवर मिळणार दर्जेदार आणि पौष्टिक अन्न सेवा सुविधा

बुलढाणा : केंद्र सरकारच्या फुड स्ट्रीट योजने अंतर्गत विदर्भातील शेगांव आणि मराठवाडा विभागातील शिर्डी येथे…

3 महिने ago