मनोरंजन

सुशांत मृत्यूप्रकरणात सीबीआयने मागितली एम्समधील फॉरेन्सिक विभागाची मदत

सुप्रीम कोर्टाने सुशांत सिंह मृत्यूचा तपास सीबीआयकडे सोपवल्यानंतर वेगाने हालचाली घडत आहेत. सीबीआयकडून सुशांत सिंहच्या शवविच्छेदन अहवालाची तपासणी करण्यात येणार असून यासाठी एम्स रुग्णालयाची मदत मागण्यात आली आहे.

एम्सकडून पाच डॉक्टरांची टीम गठीत करण्यात आली आहे. एम्सच्या फॉरेन्सिक विभागाचे प्रमुख डॉक्टर सुधीर गुप्ता डॉक्टरांच्या टीमचं नेतृत्त्व करणार आहेत. “हत्येची शक्यता आम्ही पडताळून पाहणार आहोत. मात्र यावेळी इतर सर्व बाबीही तपासल्या जातील,” असं डॉक्टर सुधीर गुप्ता यांनी सांगितलं आहे.

“टीम सुशांतच्या शरीरावर असणाऱ्या जखमा आणि परिस्थितीजन्य पुरावे यांच्यातील साधर्म्य तपासून पाहणार आहे. याशिवाय सुशांत मानसिकरित्या त्रस्त असल्याने घेत असलेल्या औषधांबद्दल जाणून घेण्याचा प्रयत्न असेल,” अशी माहितीही त्यांनी दिली आहे.

सीबीआयने शुक्रवारी सुशांतच्या मृत्यूचं कारण जाणून घेण्यासाठी एम्समधील फॉरेन्सिक विभागाची मदत मागितली. सीबीआयने एम्सला पाठवलेल्या पत्रात वैद्यकीय कागदपत्रं, शवविच्छेदन अहवाल, व्हिडीओ तसंच गरज असणाऱ्या सर्व गोष्टी पुरवल्या जातील असं सांगितलं आहे. एम्सचे डॉक्टर मुंबईत येण्याचीही शक्यता आहे.

सीबीआयची १० सदस्यीय टीम गुरुवारी रात्री मुंबईत दाखल झाली. पोलीस अधीक्षक नुपूर प्रसाद यांच्या नेतृत्त्वाखाली टीम तपास करत आहे. सीबीआय टीमकडून सुशांतच्या स्टाफ कर्मचाऱ्याची चौकशी करण्यात आली आहे. याशिवाय मुंबई पोलिसांकडून सर्व कागदपत्रं घेतली आहेत. यामध्ये सुशांत सिंहच्या शवविच्छेदन अहवालाचाही समावेश आहे. सुशांतच्या स्वयंपाकीचीही सीबीआयकडून चौकशी करण्यात आली आहे.

 

Share this :
थोडक्यात घडामोडी टीम

कमीत कमी शब्दांमध्ये बातम्या देणारे, आजच्या घडीला थोडक्यात घडामोडी हे मराठीतलं सर्वात वेगानं वाढणारं न्यूजपोर्टल - थोडक्यात घडामोडी

Recent Posts

स्वातंत्र्यदिनानिमित्त डॉ. सोमनाथ गिते यांचा महापौरांच्या हस्ते गौरव

पुणे : स्वातंत्र्यदिनाच्या निमित्ताने पुणे महानगरपालिकेच्या वतीने आयोजित विशेष सत्कार समारंभात व्यसनमुक्ती अभ्यासक व सामाजिक…

1 आठवडा ago

लग्न ठरलेल्या प्रियकरासोबत तरुणीचा संशयास्पद मृत्यू; आईचा गंभीर आरोप

बारामती : पुणे जिल्ह्यातील बारामती शहरात तरुणीचा अकस्मात आणि संशयास्पद मृत्यू झाल्याप्रकरणी तिच्या आईने दिलेल्या…

2 आठवडे ago

चार महिन्यांपूर्वीचा नवाकोरा रस्ता ऑप्टिकल फायबरसाठी फोडला; राष्ट्रवादी काँग्रेसच्या नगरसेविका डॉ. हेमलता पाटील यांचा संताप; काम बंद पाडून अधिकाऱ्यांना जाब

नाशिक : शनिवारी (दि. ८) झालेल्या महासभेत स्मार्टसिटी कंपनी आणि ‘एमएनजीएल’मुळे शहरातील रस्त्यांची झालेली दुरवस्था…

2 आठवडे ago

‘उघडलेले पुस्तक’ पॅनेलचा दणदणीत विजय; सर्व १५ उमेदवार विजयी; सर्व प्रवर्गांत परिवर्तन आणि सुशासन पॅनेलला यश

पुणे : पारी टॉवर्स सहकारी गृहरचना संस्था मर्यादित, नऱ्हेच्या संचालक मंडळाच्या पंचवार्षिक निवडणुकीत ‘उघडलेले पुस्तक’…

3 आठवडे ago

हिंगोलीत धक्कादायक प्रकार! डिझेलअभावी रुग्णवाहिका न मिळाल्याने गर्भातील बाळाचा दुर्दैवी मृत्यू

हिंगोली : हिंगोली जिल्ह्यात घडलेल्या एका गंभीर घटनेने सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेवरील विश्वास पुन्हा एकदा डळमळीत…

3 महिने ago

भाविकांसाठी आनंदाची बातमी; धार्मिक स्थळांवर मिळणार दर्जेदार आणि पौष्टिक अन्न सेवा सुविधा

बुलढाणा : केंद्र सरकारच्या फुड स्ट्रीट योजने अंतर्गत विदर्भातील शेगांव आणि मराठवाडा विभागातील शिर्डी येथे…

3 महिने ago