मनोरंजन

ज्येष्ठ अभिनेते धर्मेंद्र यांच्या निधनाचे वृत्त खोटे…

मुंबई : बॉलिवूडचा ‘ही-मॅन’ म्हणून ओळखले जाणारे ज्येष्ठ अभिनेते धर्मेंद्र यांचे वयाच्या ८९व्या वर्षी निधन झाल्याचे वृत्त सर्वत्र व्हायरल होत आहे. मात्र धर्मेंद्र यांची मुलगी, अभिनेत्री इशा देओल हिने इन्स्टाग्रामवर पोस्ट शेअर करत वडिलांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती दिली आहे.

सोमवारी धर्मेंद्र यांना श्वसनाचा त्रास झाल्याने मुंबईतील ब्रीच कँडी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते. रुग्णालयात दाखल झाल्याची बातमी समजताच इंडस्ट्रीतील अनेक कलाकारांनी त्यांच्या प्रकृतीबद्दल चिंता व्यक्त केली. शाहरुख खान, सलमान खान आणि गोविंदा यांनी रुग्णालयात जाऊन त्यांच्या प्रकृतीची विचारपूस केली. संपूर्ण देओल कुटुंब यावेळी रुग्णालयात उपस्थित होते.

१० नोव्हेंबरच्या संध्याकाळी धर्मेंद्र यांच्या पत्नी हेमा मालिनी यांनी त्यांच्या सोशल मीडिया अकाउंटवर अभिनेत्याचा एक हसरा फोटो शेअर करत लिहिले – “धरमजींबद्दल काळजी दाखवणाऱ्या सर्वांचे मी आभार मानते. ते सध्या डॉक्टरांच्या देखरेखीखाली आहेत आणि त्यांच्यावर बारकाईने लक्ष ठेवले जात आहे. आम्ही सर्व त्यांच्यासोबत आहोत. कृपया त्यांच्या लवकर बरे होण्यासाठी प्रार्थना करा.”

सात दशकांची कारकीर्द आणि ३०० हून अधिक चित्रपट
धर्मेंद्र हे हिंदी चित्रपटसृष्टीतील सर्वात आदरणीय आणि लोकप्रिय स्टार आहेत. त्यांच्या सात दशकांहून अधिकच्या चमकदार कारकिर्दीत त्यांनी ३०० हून अधिक चित्रपटांमध्ये काम केले. त्यांच्या सुपरहिट चित्रपटांमध्ये “शोले”, “चुपके चुपके”, “सीता और गीता”, “धरम वीर” यांचा समावेश आहे. ‘शोले’मधील त्यांचा प्रसिद्ध संवाद “बसंती, इन कुत्तों के सामने मत नाचना” आजही प्रेक्षकांच्या मनात जिवंत आहे.

वयाच्या ८९व्या वर्षीही धर्मेंद्र इंडस्ट्रीत सक्रिय आहेत. अलीकडेच ते “रॉकी और रानी की प्रेम कहानी” आणि “तेरी बातें में ऐसा उलझा जिया” या चित्रपटांमध्ये झळकले होते. त्यांचा शेवटचा चित्रपट “इक्किस” असून तो २५ डिसेंबर रोजी प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटात अगस्त्य नंदा प्रमुख भूमिकेत दिसणार आहे.

Share this :
थोडक्यात घडामोडी टीम

कमीत कमी शब्दांमध्ये बातम्या देणारे, आजच्या घडीला थोडक्यात घडामोडी हे मराठीतलं सर्वात वेगानं वाढणारं न्यूजपोर्टल - थोडक्यात घडामोडी

Recent Posts

स्वातंत्र्यदिनानिमित्त डॉ. सोमनाथ गिते यांचा महापौरांच्या हस्ते गौरव

पुणे : स्वातंत्र्यदिनाच्या निमित्ताने पुणे महानगरपालिकेच्या वतीने आयोजित विशेष सत्कार समारंभात व्यसनमुक्ती अभ्यासक व सामाजिक…

1 आठवडा ago

लग्न ठरलेल्या प्रियकरासोबत तरुणीचा संशयास्पद मृत्यू; आईचा गंभीर आरोप

बारामती : पुणे जिल्ह्यातील बारामती शहरात तरुणीचा अकस्मात आणि संशयास्पद मृत्यू झाल्याप्रकरणी तिच्या आईने दिलेल्या…

2 आठवडे ago

चार महिन्यांपूर्वीचा नवाकोरा रस्ता ऑप्टिकल फायबरसाठी फोडला; राष्ट्रवादी काँग्रेसच्या नगरसेविका डॉ. हेमलता पाटील यांचा संताप; काम बंद पाडून अधिकाऱ्यांना जाब

नाशिक : शनिवारी (दि. ८) झालेल्या महासभेत स्मार्टसिटी कंपनी आणि ‘एमएनजीएल’मुळे शहरातील रस्त्यांची झालेली दुरवस्था…

2 आठवडे ago

‘उघडलेले पुस्तक’ पॅनेलचा दणदणीत विजय; सर्व १५ उमेदवार विजयी; सर्व प्रवर्गांत परिवर्तन आणि सुशासन पॅनेलला यश

पुणे : पारी टॉवर्स सहकारी गृहरचना संस्था मर्यादित, नऱ्हेच्या संचालक मंडळाच्या पंचवार्षिक निवडणुकीत ‘उघडलेले पुस्तक’…

3 आठवडे ago

हिंगोलीत धक्कादायक प्रकार! डिझेलअभावी रुग्णवाहिका न मिळाल्याने गर्भातील बाळाचा दुर्दैवी मृत्यू

हिंगोली : हिंगोली जिल्ह्यात घडलेल्या एका गंभीर घटनेने सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेवरील विश्वास पुन्हा एकदा डळमळीत…

3 महिने ago

भाविकांसाठी आनंदाची बातमी; धार्मिक स्थळांवर मिळणार दर्जेदार आणि पौष्टिक अन्न सेवा सुविधा

बुलढाणा : केंद्र सरकारच्या फुड स्ट्रीट योजने अंतर्गत विदर्भातील शेगांव आणि मराठवाडा विभागातील शिर्डी येथे…

3 महिने ago