मनोरंजन

अभिनेत्रीचा धक्कादायक खुलासा, लहानपणी आजोबांनीच केले होते लैंगिक शोषण

अभिनेत्री शेरॉन स्टोन ही हॉलिवूडमधील लोकप्रिय अभिनेत्रींपैकी एक आहे. ती नेहमीच सोशल मीडियाच्या माध्यमातून किंवा मुलाखतींच्या माध्यमातून तिच्या जीवनात घडलेल्या वाईट प्रसंगांचा खुलासा करताना दिसते. नुकत्याच प्रकाशित झालेल्या तिच्या पुस्तकात शेरॉनने एक धक्का दायक खूलासा केला आहे.  ‘द ब्यूटी ऑफ लिव्हिंग ट्वाइस‘ या पुस्तकात शेरॉनने तिच्यावर झालेल्या लैंगिक शोषणाबद्दल लिहीले आहे.

शेरॉनने लिहले की, तिचा आणि तिच्या लहान बहिणीचे लैंगिक शोषण हे तिच्या आजोबांकडूनच झाले आहे. शेरॉन तेव्हा फक्त ११ वर्षांची होती, जेव्हा तिच्या आजोबांनी तिचे लैंगिक शोषण केले. धक्कादायक गोष्ट म्हणजे, या सगळ्यात शेरॉनची आजी तिच्या आजोबांना मदत करत होती. शेरॉन आणि तिच्या बहिणीला त्यांची आजी आजोबांसोबत एका खोलीत बंद करून ठेवायची आणि बाहेरून दार लावून घ्यायची. त्यानंतर आजोबा त्यांचे शोषण करायचे. शेरॉन १४ वर्षांची असताना तिच्या आजोबांचे निधन झाले.

ती आजोबाच्या निधनाबद्दल लिहताने म्हणते कि, मी त्या कॉफिनमध्ये डोकावून पाहिले, मी त्यांना हलवून पाहिले आणि शेवटी त्यांचा मृत्यु झाल्याची मला खात्री झाली, शेरॉनचं ‘द ब्यूटी ऑफ लिव्हिंग ट्वाइस’ हे पुस्तक ३० मार्च रोजी प्रकाशित झालं आहे. या पुस्तकात शेरॉनने तिच्या आयुष्यातील चांगल्या आणि वाईट दोन्ही गोष्टींचा खुलासा केला आहे.

Share this :
थोडक्यात घडामोडी टीम

कमीत कमी शब्दांमध्ये बातम्या देणारे, आजच्या घडीला थोडक्यात घडामोडी हे मराठीतलं सर्वात वेगानं वाढणारं न्यूजपोर्टल - थोडक्यात घडामोडी

Recent Posts

स्वातंत्र्यदिनानिमित्त डॉ. सोमनाथ गिते यांचा महापौरांच्या हस्ते गौरव

पुणे : स्वातंत्र्यदिनाच्या निमित्ताने पुणे महानगरपालिकेच्या वतीने आयोजित विशेष सत्कार समारंभात व्यसनमुक्ती अभ्यासक व सामाजिक…

1 दिवस ago

लग्न ठरलेल्या प्रियकरासोबत तरुणीचा संशयास्पद मृत्यू; आईचा गंभीर आरोप

बारामती : पुणे जिल्ह्यातील बारामती शहरात तरुणीचा अकस्मात आणि संशयास्पद मृत्यू झाल्याप्रकरणी तिच्या आईने दिलेल्या…

6 दिवस ago

चार महिन्यांपूर्वीचा नवाकोरा रस्ता ऑप्टिकल फायबरसाठी फोडला; राष्ट्रवादी काँग्रेसच्या नगरसेविका डॉ. हेमलता पाटील यांचा संताप; काम बंद पाडून अधिकाऱ्यांना जाब

नाशिक : शनिवारी (दि. ८) झालेल्या महासभेत स्मार्टसिटी कंपनी आणि ‘एमएनजीएल’मुळे शहरातील रस्त्यांची झालेली दुरवस्था…

1 आठवडा ago

‘उघडलेले पुस्तक’ पॅनेलचा दणदणीत विजय; सर्व १५ उमेदवार विजयी; सर्व प्रवर्गांत परिवर्तन आणि सुशासन पॅनेलला यश

पुणे : पारी टॉवर्स सहकारी गृहरचना संस्था मर्यादित, नऱ्हेच्या संचालक मंडळाच्या पंचवार्षिक निवडणुकीत ‘उघडलेले पुस्तक’…

1 आठवडा ago

हिंगोलीत धक्कादायक प्रकार! डिझेलअभावी रुग्णवाहिका न मिळाल्याने गर्भातील बाळाचा दुर्दैवी मृत्यू

हिंगोली : हिंगोली जिल्ह्यात घडलेल्या एका गंभीर घटनेने सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेवरील विश्वास पुन्हा एकदा डळमळीत…

3 महिने ago

भाविकांसाठी आनंदाची बातमी; धार्मिक स्थळांवर मिळणार दर्जेदार आणि पौष्टिक अन्न सेवा सुविधा

बुलढाणा : केंद्र सरकारच्या फुड स्ट्रीट योजने अंतर्गत विदर्भातील शेगांव आणि मराठवाडा विभागातील शिर्डी येथे…

3 महिने ago