मनोरंजन

डॉ. काशिनाथ घाणेकर चित्रपट पाहून राज ठाकरे म्हणाले…एकदम कडक…

मराठी रंगभूमीवरील पहिले सुपरस्टार अशी ओळख असलेल्या डॉ. काशिनाथ घाणेकर यांच्या आयुष्यावरील सिनेमा दोन वर्षांपूर्वी प्रदर्शित झाला होता. काही दिवसांपूर्वी हा सिनेमा ‘नेटफ्लिक्स’ ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित झाला. हा सिनेमा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी बघितला आणि त्यांनाही सिनेमाचं कौतुक करण्याचा मोह आवरला नाही. सिनेमा बघून भारावून गेलेल्या राज ठाकरे यांनी पोस्ट ट्विट करून सिनेमा आणि कलाकारांचं तोंड भरून कौतुक केलं.

राज ठाकरे यांनी घरीच हा सिनेमा बघितल्यानंतर पोस्ट ट्विट केली आहे. डॉ. काशिनाथ घाणेकर सिनेमा जरी २०१८ ला रिलीज झाला होता, तरी माझा पहायचा राहुन गेला होता. पण बाहेर प्रचंड पाऊस पडत असल्यामुळे बाहेर पडणं शक्यच नाही, त्यामुळे नेटफ्लिक्सवर मराठी सिनेमे बघताना हा सिनेमा समोर आला आणि एका बैठकीत तो बघून संपवला,” असं राज ठाकरे यांनी सांगितलं.

“एका शब्दात सांगायचं तर अप्रतिम सिनेमा. कमालीची उत्तम बांधलेली स्क्रिप्ट, स्क्रिनप्ले आणि अर्थात दिग्दर्शन पण. भालजी पेंढारकर सोडले, तर डॉ. काशिनाथ घाणेकर, वसंत कानेटकर ते प्रभाकर पणशीकरांपर्यंत प्रत्येकाला भेटण्याचा मला योग आला होता आणि व्यंगचित्रकार असल्यामुळे प्रत्येकाच्या लकबी मी तेव्हा हेरल्या होत्या. आज सिनेमात प्रत्येक नटाचं काम पाहताना जाणवलं की या सगळ्यांनी काय जबरदस्त ही सगळी पात्र उभी केली आहेत. सुबोध भावे, सुमित राघवन, सोनाली कुलकर्णी, आनंद इंगळे, प्रसाद ओके, मोहन जोशी, नंदिता धुरी, वैदेही परशुरामी खरंच सगळ्यांचे अभिनय, कडक!

सिनेमात दाखवलेला काळ मराठी रंगभूमीचा सुवर्णकाळ होता. करोनोत्तर काळात पुन्हा मराठी रंगभूमी अशीच बहरू दे… आणि … नटांच्या, संहितेच्या जोरावर तसंच सिनेमात म्हटल्याप्रमाणे नाट्यवेड्या मराठी माणसाच्या प्रतिसादावर पुन्हा नाट्यगृहाच्या बाहेर ‘हाऊसफुल्ल’चे फलक कायमचे लागू देत,” अशा शब्दात राज ठाकरे यांनी या सिनेमाविषयी भावना व्यक्त केल्या आहेत.

Share this :
थोडक्यात घडामोडी टीम

कमीत कमी शब्दांमध्ये बातम्या देणारे, आजच्या घडीला थोडक्यात घडामोडी हे मराठीतलं सर्वात वेगानं वाढणारं न्यूजपोर्टल - थोडक्यात घडामोडी

Recent Posts

हिंगोलीत धक्कादायक प्रकार! डिझेलअभावी रुग्णवाहिका न मिळाल्याने गर्भातील बाळाचा दुर्दैवी मृत्यू

हिंगोली : हिंगोली जिल्ह्यात घडलेल्या एका गंभीर घटनेने सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेवरील विश्वास पुन्हा एकदा डळमळीत…

6 दिवस ago

भाविकांसाठी आनंदाची बातमी; धार्मिक स्थळांवर मिळणार दर्जेदार आणि पौष्टिक अन्न सेवा सुविधा

बुलढाणा : केंद्र सरकारच्या फुड स्ट्रीट योजने अंतर्गत विदर्भातील शेगांव आणि मराठवाडा विभागातील शिर्डी येथे…

6 दिवस ago

पुण्यात विषारी दारू प्यायल्याने १२ जणांचा मृत्यू, दोषींवर कठोर कारवाईचे आदेश

मुंबई : पुणे शहरातील हडपसर आणि पिंपरी-चिंचवडमधील दापोडी-फुगेवाडी परिसरात विषारी दारू प्यायल्याने १२ नागरिकांचा मृत्यू…

6 दिवस ago

व्यसनमुक्ती क्षेत्रातील अविरत समाजकार्याची दखल; डॉ. सोमनाथ गिते यांचा मा. माधुरीताई मिसाळ यांच्या हस्ते सत्कार

पुणे : महाराष्ट्र शासनाच्या सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागामार्फत प्रदान करण्यात आलेल्या “राष्ट्रपिता महात्मा…

2 आठवडे ago

भरतीच्या बोगस जाहिरातींपासून सावध राहण्याचे आवाहन

मुंबई : ‘महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना’अंतर्गत महाराष्ट्रात विविध पदांसाठी तात्काळ भरती सुरू…

2 आठवडे ago

पुण्यात उष्णतेचा कहर! IMD चा यलो अलर्ट जारी; नागरिकांना काळजी घेण्याचे आवाहन

पुणे : पुणे शहर आणि जिल्ह्यात उष्णतेची तीव्रता दिवसेंदिवस वाढत असून भारतीय हवामान विभागाने (IMD)…

3 आठवडे ago