मनोरंजन

गायक आणि संगीतकार पंडित संजय राम मराठे यांचे निधन, ६८ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

ठाणे : शास्त्रीय गायक आणि हार्मोनियम वादक पंडित संजय राम मराठे यांचे १६ डिसेंबर २०२४ रोजी निधन झाले. ते ६८ वर्षांचे होते. सोमवारी त्यांच्या कुटुंबीयांनी याबाबत माहिती दिली. त्यांच्या कुटुंबीयांनी सांगितले की, त्यांना हृदयविकाराचा तीव्र झटका आला होता आणि त्यांना ठाण्यातील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र, रविवारी रात्री त्यांचे निधन झाले. प्रसिद्ध संगीतकार पंडित राम मराठे यांचे ते ज्येष्ठ पुत्र होते.

पंडित संजय मराठे यांनी भारतीय शास्त्रीय संगीत आणि रंगभूमीवर महत्वाचा ठसा उमटवला. त्यांनी हार्मोनियम वादन आणि गायनात प्राविण्य मिळवले होते. यावर्षी त्यांच्या वडिलांच्या शंभराव्या जयंतीनिमित्त आयोजित कार्यक्रमांमध्ये त्यांनी सक्रिय सहभाग घेतला होता. पंडित संजय मराठे यांनी त्यांचे धाकटे बंधू मुकुंद मराठे यांच्या मदतीने त्यांच्या वडिलांच्या शंभरव्या जयंतीनिमित्त प्रसिद्ध मराठी संगीत नाटक ‘संगीत मंदारमाला’ पुन्हा सादर केले. पारंपारिक मराठी संगीत नाटकाचे मर्म जपत नाविन्यपूर्ण प्रयोगांसाठी या निर्मितीला सर्वत्र कौतुक मिळाले. या प्रयोगाला अत्यंत सकारात्मक प्रतिसाद मिळाला होता.

पंडित संजय मराठे यांच्या पश्चात पत्नी, एक मुलगा आणि नात असा परिवार आहे.

Share this :
थोडक्यात घडामोडी टीम

कमीत कमी शब्दांमध्ये बातम्या देणारे, आजच्या घडीला थोडक्यात घडामोडी हे मराठीतलं सर्वात वेगानं वाढणारं न्यूजपोर्टल - थोडक्यात घडामोडी

Share
Published by
थोडक्यात घडामोडी टीम

Recent Posts

स्वातंत्र्यदिनानिमित्त डॉ. सोमनाथ गिते यांचा महापौरांच्या हस्ते गौरव

पुणे : स्वातंत्र्यदिनाच्या निमित्ताने पुणे महानगरपालिकेच्या वतीने आयोजित विशेष सत्कार समारंभात व्यसनमुक्ती अभ्यासक व सामाजिक…

4 दिवस ago

लग्न ठरलेल्या प्रियकरासोबत तरुणीचा संशयास्पद मृत्यू; आईचा गंभीर आरोप

बारामती : पुणे जिल्ह्यातील बारामती शहरात तरुणीचा अकस्मात आणि संशयास्पद मृत्यू झाल्याप्रकरणी तिच्या आईने दिलेल्या…

1 आठवडा ago

चार महिन्यांपूर्वीचा नवाकोरा रस्ता ऑप्टिकल फायबरसाठी फोडला; राष्ट्रवादी काँग्रेसच्या नगरसेविका डॉ. हेमलता पाटील यांचा संताप; काम बंद पाडून अधिकाऱ्यांना जाब

नाशिक : शनिवारी (दि. ८) झालेल्या महासभेत स्मार्टसिटी कंपनी आणि ‘एमएनजीएल’मुळे शहरातील रस्त्यांची झालेली दुरवस्था…

1 आठवडा ago

‘उघडलेले पुस्तक’ पॅनेलचा दणदणीत विजय; सर्व १५ उमेदवार विजयी; सर्व प्रवर्गांत परिवर्तन आणि सुशासन पॅनेलला यश

पुणे : पारी टॉवर्स सहकारी गृहरचना संस्था मर्यादित, नऱ्हेच्या संचालक मंडळाच्या पंचवार्षिक निवडणुकीत ‘उघडलेले पुस्तक’…

2 आठवडे ago

हिंगोलीत धक्कादायक प्रकार! डिझेलअभावी रुग्णवाहिका न मिळाल्याने गर्भातील बाळाचा दुर्दैवी मृत्यू

हिंगोली : हिंगोली जिल्ह्यात घडलेल्या एका गंभीर घटनेने सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेवरील विश्वास पुन्हा एकदा डळमळीत…

3 महिने ago

भाविकांसाठी आनंदाची बातमी; धार्मिक स्थळांवर मिळणार दर्जेदार आणि पौष्टिक अन्न सेवा सुविधा

बुलढाणा : केंद्र सरकारच्या फुड स्ट्रीट योजने अंतर्गत विदर्भातील शेगांव आणि मराठवाडा विभागातील शिर्डी येथे…

3 महिने ago