मनोरंजन

सुशांतसिंग राजपूत मृत्यूप्रकरण : NCB कडून 30 हजार पानांचे चार्जशीट दाखल, रियासह 33 आरोपींची नावे

अभिनेता सुशांतसिंग राजपूत याच्या मृत्यूप्रकरणी ड्रग्स अँगलचा तपास करणार्‍या नारकोटिक्स कंट्रोल ब्यूरोने (NCB) शुक्रवारी मुंबईतील NDPS न्यायालयात चार्जशीट दाखल केले. हे चार्जशीट 30 हजार पानांचे आहे. आरोपपत्रात सुशांतची मैत्रीण रिया चक्रवर्ती, तिचा भाऊ शोविक चक्रवर्ती यांच्यासह 33 आरोपींची नावे आहेत. 5 फरार असल्याचे सांगितले आहे. अभिनेत्री दीपिका पादुकोण, सारा अली खान आणि श्रद्धा कपूर यांचे जबाबदेखील या कागदपत्रांमध्ये समाविष्ट आहेत.

हे चार्जशीट जप्त केलेले ड्रग्स तसेच इलेक्ट्रॉनिक उपकरणे, फॉरेन्सिक अहवाल आणि साक्षीदारांच्या जबाबांच्या आधारे तयार केले गेले आहे. या डिजिटल पुराव्यांची 50 हजार पाने स्वतंत्रपणे आहेत. आरोपपत्रात सुमारे 200 साक्षीदारांचा जबाब नोंदवलेले आहे.

या प्रकरणात एनसीबीने आतापर्यंत 33 लोकांना अटक केली होती. यामध्ये रिया चक्रवर्ती, तिचा भाऊ शोविक चक्रवर्ती, सुशांतचा मॅनेजर सॅम्युअल मिरांडा, दीपेश सावंत आणि अनेक ड्रग पेडलर्स यांचा समावेश आहे. दुसर्‍या एका प्रकरणात एनसीबीने बॉलिवूडमधील काही नामांकित अभिनेत्रींचीही चौकशी केली होती.

सुशांतच्या मृत्यूच्या दोन महिन्यांनंतर त्याच्या वडिलांनी पाटण्यात गुन्हा दाखल केला. हा खटला सुशांतची मैत्रीण रिया आणि रियाच्या कुटुंबातील सदस्यांसह 5 जणांविरूद्ध होता. या सर्वांवर सुशांतकडून 17 कोटी रुपये हडपल्याचा आरोप होता. यानंतर हे प्रकरण मुंबईत हस्तांतरित करण्याची विनंती रियाने सर्वोच्च न्यायालयात केली. कोर्टाने हा खटला सीबीआयकडे सोपविला. त्यानंतर ईडीने देखील तपास सुरु केला. नंतर रियाच्या व्हॉट्सअॅप चॅटच्या तपासणीत ड्रग्सचा अँगल समोर आला. ड्रग्जसंदर्भात चॅट मिळाल्यानंतर नारकोटिक्स कंट्रोल ब्यूरोने चौकशी सुरु केली आणि बॉलिवूडमध्ये चालणार्‍या मोठ्या ड्रग्स रॅकेटचा भंडाफोड करण्यात आला.

14 जून 2020 रोजी सुशांतचा मृतदेह त्याच्या वांद्रे येथील फ्लॅटमध्ये पंख्याला लटकलेला आढळला. त्याच्या निधनानंतर या प्रकरणाचा तपास मुंबई आणि बिहार पोलिस, सीबीआय, ईडी आणि एनसीबी यांनी केला, परंतु 9 महिने झाले तरी सुशांतचा मृत्यू खून होता की आत्महत्या, हे अद्याप स्पष्ट झालेले नाही.

Share this :
थोडक्यात घडामोडी टीम

कमीत कमी शब्दांमध्ये बातम्या देणारे, आजच्या घडीला थोडक्यात घडामोडी हे मराठीतलं सर्वात वेगानं वाढणारं न्यूजपोर्टल - थोडक्यात घडामोडी

Recent Posts

स्वातंत्र्यदिनानिमित्त डॉ. सोमनाथ गिते यांचा महापौरांच्या हस्ते गौरव

पुणे : स्वातंत्र्यदिनाच्या निमित्ताने पुणे महानगरपालिकेच्या वतीने आयोजित विशेष सत्कार समारंभात व्यसनमुक्ती अभ्यासक व सामाजिक…

2 आठवडे ago

लग्न ठरलेल्या प्रियकरासोबत तरुणीचा संशयास्पद मृत्यू; आईचा गंभीर आरोप

बारामती : पुणे जिल्ह्यातील बारामती शहरात तरुणीचा अकस्मात आणि संशयास्पद मृत्यू झाल्याप्रकरणी तिच्या आईने दिलेल्या…

3 आठवडे ago

चार महिन्यांपूर्वीचा नवाकोरा रस्ता ऑप्टिकल फायबरसाठी फोडला; राष्ट्रवादी काँग्रेसच्या नगरसेविका डॉ. हेमलता पाटील यांचा संताप; काम बंद पाडून अधिकाऱ्यांना जाब

नाशिक : शनिवारी (दि. ८) झालेल्या महासभेत स्मार्टसिटी कंपनी आणि ‘एमएनजीएल’मुळे शहरातील रस्त्यांची झालेली दुरवस्था…

3 आठवडे ago

‘उघडलेले पुस्तक’ पॅनेलचा दणदणीत विजय; सर्व १५ उमेदवार विजयी; सर्व प्रवर्गांत परिवर्तन आणि सुशासन पॅनेलला यश

पुणे : पारी टॉवर्स सहकारी गृहरचना संस्था मर्यादित, नऱ्हेच्या संचालक मंडळाच्या पंचवार्षिक निवडणुकीत ‘उघडलेले पुस्तक’…

4 आठवडे ago

हिंगोलीत धक्कादायक प्रकार! डिझेलअभावी रुग्णवाहिका न मिळाल्याने गर्भातील बाळाचा दुर्दैवी मृत्यू

हिंगोली : हिंगोली जिल्ह्यात घडलेल्या एका गंभीर घटनेने सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेवरील विश्वास पुन्हा एकदा डळमळीत…

3 महिने ago

भाविकांसाठी आनंदाची बातमी; धार्मिक स्थळांवर मिळणार दर्जेदार आणि पौष्टिक अन्न सेवा सुविधा

बुलढाणा : केंद्र सरकारच्या फुड स्ट्रीट योजने अंतर्गत विदर्भातील शेगांव आणि मराठवाडा विभागातील शिर्डी येथे…

3 महिने ago