NCB issues summons to Karan Johar
नारकोटिक्स कंट्रोल ब्यूरोने (NCB) चित्रपट निर्माता करण जोहर यांना समन्स बजावले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, एनसीबी करण जोहरची बॉलीवूडमध्ये पसरलेल्या ड्रग्सच्या जाळ्याबद्दल चौकशी करणार आहे. परंतु, एनसीबी कार्यालयात करण यांना कधी चौकशीसाठी हजर राहायचे हे अद्याप समजू शकलेले नाही.
काही दिवसांपूर्वी करण जोहरच्या घरी झालेल्या पार्टीच्या व्हायरल व्हिडिओचा दुसरा फॉरेन्सिक अहवालही नकारात्मक आला. या व्हिडिओबद्दल असे सांगितले जात होते की त्याच्या घरात ड्रग पार्टी होती. गुजरातमधील गांधी नगरच्या एफएसएलने व्हिडिओमध्ये पाहिलेली पांढऱ्या रंगाची प्रतिमा प्रकाशाचे प्रतिबिंब होती, असं सांगितलं आहे. व्हिडिओमध्ये कोणत्याही प्रकारच्या सामग्रीची उपस्थिती नाकारली गेली आहे. अहवालात असे स्पष्ट केले आहे की व्हिडिओमध्ये कोणतीही सामग्री किंवा ड्रग्ज सारखी इतर सामग्री दिसत नाही.
व्हिडिओचा पहिला फॉरेन्सिक अहवाल एनसीबीला सप्टेंबरच्या शेवटच्या आठवड्यात प्राप्त झाला. या अहवालात, व्हिडिओ पूर्णपणे वास्तविक म्हणून वर्णन केले गेले होते. तसेच यात कोणतेही एडिटिंग नाकारले गेले.
ही पार्टी करण जोहर यांनी 28 जुलै 2019 रोजी दिली होती. यात दीपिका पादुकोण, मलायका अरोरा, अर्जुन कपूर, शाहिद कपूर, वरुण धवन, जोया अख्तर, विक्की कौशल, अयान मुखर्जी आणि रणबीर कपूर आदी उपस्थित होते. या पार्टीचा व्हिडिओ करण जोहरने स्वत: शूट करून सोशल मीडियावर टाकला होता. व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर या पार्टीमध्ये ड्रग्स वापरल्याचा आरोप करण्यात आला.
हिंगोली : हिंगोली जिल्ह्यात घडलेल्या एका गंभीर घटनेने सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेवरील विश्वास पुन्हा एकदा डळमळीत…
बुलढाणा : केंद्र सरकारच्या फुड स्ट्रीट योजने अंतर्गत विदर्भातील शेगांव आणि मराठवाडा विभागातील शिर्डी येथे…
मुंबई : पुणे शहरातील हडपसर आणि पिंपरी-चिंचवडमधील दापोडी-फुगेवाडी परिसरात विषारी दारू प्यायल्याने १२ नागरिकांचा मृत्यू…
पुणे : महाराष्ट्र शासनाच्या सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागामार्फत प्रदान करण्यात आलेल्या “राष्ट्रपिता महात्मा…
मुंबई : ‘महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना’अंतर्गत महाराष्ट्रात विविध पदांसाठी तात्काळ भरती सुरू…
पुणे : पुणे शहर आणि जिल्ह्यात उष्णतेची तीव्रता दिवसेंदिवस वाढत असून भारतीय हवामान विभागाने (IMD)…