Sushant Singh Rajput death case: NCB squad raids in Pune
मुंबई : बॉलीवूड अभिनेता दिवंगत सुशांत सिंग राजपूतचा माजी रूममेट सिद्धार्थ पिठाणी याला सोमवारी मुंबई उच्च न्यायालयाने अंमली पदार्थ आणि सायकोट्रॉपिक सबस्टन्स ऍक्ट (NDPS कायदा) अंतर्गत दाखल केलेल्या गुन्ह्यात जामीन मंजूर केला. न्यायमूर्ती भारती डांगरे यांनी पिठाणीला 50,000 रुपयांच्या वैयक्तिक जातमुचलक्यावर जामीन मंजूर केला.
मुंबईतील विशेष न्यायालयाने त्यांचा जामीन अर्ज फेटाळल्यानंतर पिठाणीने उच्च न्यायालयात धाव घेतली होती. अधिवक्ता अद्वैत ताम्हणकर यांच्यामार्फत दाखल करण्यात आलेल्या अपीलात पिठाणीचा अवैध अमली पदार्थांच्या तस्करीत सहभाग असल्याचा कोणताही पुरावा नसल्याचा दावा करण्यात आला आहे. दुसरीकडे, नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोच्या वतीने विशेष सरकारी वकील श्रीराम सिरसाट यांनी युक्तिवाद केला की, पिठणीच्या लॅपटॉप आणि फोनवर व्हिडिओ तसेच सुशांतच्या खात्यातून अंमली पदार्थांच्या खरेदीशी संबंधित बँक व्यवहारही होते.
या प्रकरणातील प्रमुख संशयित पिठाणी हा बऱ्याच दिवसांपासून फरार होता. त्याने सुशांतसोबत एक फ्लॅट शेअर केला होता आणि सुशांतच्या मृत्यूवेळी तिथेच होता. 26 मे 2021 रोजी हैदराबादमधून त्याला पकडण्यापूर्वी त्याला तीनदा समन्स बजावण्यात आले होते. NDPS कायद्याच्या कलम 8(c), 20(b)(ii), 22, 27A, 28, 29 आणि 30 अंतर्गत शिक्षापात्र गुन्ह्यांसाठी त्याच्यावर आरोप ठेवण्यात आले होते.
हैदराबाद न्यायालयाकडून ट्रान्झिट वॉरंट मिळाल्यानंतर, त्याला एस्प्लानेड, मुंबई येथील मुख्य महानगर दंडाधिकारी यांच्यासमोर हजर करण्यात आले, त्यांनी त्याला पोलीस कोठडी आणि नंतर न्यायालयीन कोठडी सुनावली. पिठाणीला त्याच्या लग्नात सहभागी होण्यासाठी जूनमध्ये 15 दिवसांच्या कालावधीसाठी तात्पुरता जामीन मंजूर करण्यात आला होता.
पुणे : स्वातंत्र्यदिनाच्या निमित्ताने पुणे महानगरपालिकेच्या वतीने आयोजित विशेष सत्कार समारंभात व्यसनमुक्ती अभ्यासक व सामाजिक…
बारामती : पुणे जिल्ह्यातील बारामती शहरात तरुणीचा अकस्मात आणि संशयास्पद मृत्यू झाल्याप्रकरणी तिच्या आईने दिलेल्या…
नाशिक : शनिवारी (दि. ८) झालेल्या महासभेत स्मार्टसिटी कंपनी आणि ‘एमएनजीएल’मुळे शहरातील रस्त्यांची झालेली दुरवस्था…
पुणे : पारी टॉवर्स सहकारी गृहरचना संस्था मर्यादित, नऱ्हेच्या संचालक मंडळाच्या पंचवार्षिक निवडणुकीत ‘उघडलेले पुस्तक’…
हिंगोली : हिंगोली जिल्ह्यात घडलेल्या एका गंभीर घटनेने सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेवरील विश्वास पुन्हा एकदा डळमळीत…
बुलढाणा : केंद्र सरकारच्या फुड स्ट्रीट योजने अंतर्गत विदर्भातील शेगांव आणि मराठवाडा विभागातील शिर्डी येथे…