मनोरंजन

कलादिग्दर्शक राजू सापते यांची आत्महत्या, आत्महत्येपूर्वी व्हिडिओतून सांगितलं कारण…

पुणे : कलादिग्दर्शक राजू सापते यांनी शुक्रवारी रात्री राहत्या घरी आत्महत्या केली. आत्महत्या करण्यापूर्वी एक व्हिडिओ बनवून त्यांनी आत्महत्येचं कारण सांगितलं. मनोरंजनसृष्टीत काम करणाऱ्या मजदूर युनियन्सचे अधिकारी राकेश मौर्य आपल्याला पैशावरून वारंवार धमकावत आहेत, त्यामुळे आपल्या समोर आता काहीच पर्याय उरला नसल्याने आपण आत्महत्या करत असल्याचं त्यांनी सांगितलं. या घटनेमुळे मराठी मनोरंजनसृष्टीत खळबळ उडाली आहे.

राजू सापते हे गेल्या 22 वर्षांपासून राजू या विश्वात आपलं काम करत आहेत. ते त्यांच्या अत्यंत शांत आणि मनमिळावू स्वभावामुळे ओळखले जात असत. सध्या लॉकडाऊन नंतरच्या काळात राजू यांच्याकडे तब्बल पाच मालिकांचे काम होते. परंतु युनियनच्या दहशतीमुळे त्यातलं एक काम आपण सोडून दिल्याचं त्यांनी या व्हिडिओमध्ये सांगितलं आहे. या व्हिडिओमध्ये त्यांनी सांगितलं कि, गेल्या काही दिवसांपासून मला राकेश मौर्य वारंवार पैशावरून त्रास देत आहेत. मी काही कामगारांचे पैसे देणे लागतो असं सांगून मला त्रास दिला जातोय. वास्तविक मी सर्वांचे पैसे वेळेवर दिेले आहेत. पण असं असूनही त्रास दिला जातो. कामगार दिले जात नाही. म्हणून मी एक झीचा प्रोजेक्ट सोडला. दशमी क्रिएशन्सचं कामही मी करतो आहे. पण या त्रासामुळे आता आत्महत्या करण्यावाचून दुसरा कोणताही पर्याय माझ्यासमोर उरलेला नाही.

राजू सापते यांनी हा व्हिडिओ पुण्याच्या राहत्या घरातून केला. हा व्हिडिओ पाहिल्यानंतर मनोरंजनसृष्टीतल्या अनेकांनी त्यांना फोन केला. पण त्यांनी कुणाचेच फोन घेतले नाहीत. त्यानंतर त्यांची पत्नी मुंबईहून शुक्रवारी रात्री पुण्यातल्या घरी गेल्या. त्यावेळी घरचा दरवाजा उघडल्यानंतर राजू यांनी आत्महत्या केल्याचं त्यांनी बघितलं.

अगोबाई सूनबाई, काय घडलं त्या रात्री, मन्या द वंडर बॉय, साटंलोटं, राजधानी एक्स्प्रेस आदी चित्रकृतींचे ते कलादिग्दर्शक होते. राजू यांच्या आत्महत्येनंतर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष अमेय खोपकर यांनीही फेसबुक पोस्ट करून अशी दडपशाही करणाऱ्यांची आपण गय करणार नाही, असं सांगितलं आहे.

Share this :
थोडक्यात घडामोडी टीम

कमीत कमी शब्दांमध्ये बातम्या देणारे, आजच्या घडीला थोडक्यात घडामोडी हे मराठीतलं सर्वात वेगानं वाढणारं न्यूजपोर्टल - थोडक्यात घडामोडी

Recent Posts

स्वातंत्र्यदिनानिमित्त डॉ. सोमनाथ गिते यांचा महापौरांच्या हस्ते गौरव

पुणे : स्वातंत्र्यदिनाच्या निमित्ताने पुणे महानगरपालिकेच्या वतीने आयोजित विशेष सत्कार समारंभात व्यसनमुक्ती अभ्यासक व सामाजिक…

4 आठवडे ago

लग्न ठरलेल्या प्रियकरासोबत तरुणीचा संशयास्पद मृत्यू; आईचा गंभीर आरोप

बारामती : पुणे जिल्ह्यातील बारामती शहरात तरुणीचा अकस्मात आणि संशयास्पद मृत्यू झाल्याप्रकरणी तिच्या आईने दिलेल्या…

1 महिना ago

चार महिन्यांपूर्वीचा नवाकोरा रस्ता ऑप्टिकल फायबरसाठी फोडला; राष्ट्रवादी काँग्रेसच्या नगरसेविका डॉ. हेमलता पाटील यांचा संताप; काम बंद पाडून अधिकाऱ्यांना जाब

नाशिक : शनिवारी (दि. ८) झालेल्या महासभेत स्मार्टसिटी कंपनी आणि ‘एमएनजीएल’मुळे शहरातील रस्त्यांची झालेली दुरवस्था…

1 महिना ago

‘उघडलेले पुस्तक’ पॅनेलचा दणदणीत विजय; सर्व १५ उमेदवार विजयी; सर्व प्रवर्गांत परिवर्तन आणि सुशासन पॅनेलला यश

पुणे : पारी टॉवर्स सहकारी गृहरचना संस्था मर्यादित, नऱ्हेच्या संचालक मंडळाच्या पंचवार्षिक निवडणुकीत ‘उघडलेले पुस्तक’…

1 महिना ago

हिंगोलीत धक्कादायक प्रकार! डिझेलअभावी रुग्णवाहिका न मिळाल्याने गर्भातील बाळाचा दुर्दैवी मृत्यू

हिंगोली : हिंगोली जिल्ह्यात घडलेल्या एका गंभीर घटनेने सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेवरील विश्वास पुन्हा एकदा डळमळीत…

4 महिने ago

भाविकांसाठी आनंदाची बातमी; धार्मिक स्थळांवर मिळणार दर्जेदार आणि पौष्टिक अन्न सेवा सुविधा

बुलढाणा : केंद्र सरकारच्या फुड स्ट्रीट योजने अंतर्गत विदर्भातील शेगांव आणि मराठवाडा विभागातील शिर्डी येथे…

4 महिने ago