मनोरंजन

अभिनेत्री पूजा सावंतने घुबडाला वाचवलं, व्हिडीओ सोशल मीडियावर वायरल

अभिनेत्री पूजा सावंतने तिच्या अभिनयाने मराठी तसेच हिंदी चित्रपटसृष्टीत देखील नाव कमावलं आहे. तिचे प्राणी व पक्षांवर खूप प्रेम असून ती प्राण्यांना मदत करणाऱ्या संस्थांशी देखील जोडलेली असते. पूजाने नुकताच सोशल मीडियावर एक व्हिडीओ शेअर केला आहे. ज्यात तीने एका घुबडाचे प्राण वाचवले आहेत. तिचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड वायरल होत आहे.

पूजाने तिच्या इन्स्टाग्राम अकाउंटवर हा व्हिडीओ शेअर केला आहे. त्यात तिने सांगितलं कि, “आता उन्हाळा जवळ आला आहे आणि असे बरेच पक्षी आपल्याला दिसतात, जे तहानलेले असतात. पाण्याच्या शोधात पाण्यात पडतात किंवा त्यांच्यासोबत काही अपघात होतात. अशाच एक घुबडाबद्दल आम्हाला फोन आला होता की हे घुबड पाण्याच्या टाकीत पडलं आहे. आम्ही तिथे पोहोचेपर्यंत तिथल्या लोकांनी त्याला टाकीतून बाहेर काढलं होतं. ते जिवंत होतं पण खूप अशक्त होतं. मी त्याच्यावर प्राथमिक उपचार केले आणि त्याला पशुवैद्याकडे घेऊन गेले. त्याच्यावर उपचार झाल्यानंतर ते स्वस्थ दिसू लागलं. त्याच्या तब्येतीत सुधारणा दिसू लागली. आम्हाला जेव्हा वाटलं की हे घुबड आता पूर्णपणे बरं झालं आहे आणि उडू शकेल, तेव्हा आम्ही त्याला सोडून दिलं.”

पूजाने यावेळी घराबाहेर तहानलेल्या पक्षांसाठी पाणी ठेवण्याचं देखील आवाहन केलं आहे.

Share this :
थोडक्यात घडामोडी टीम

कमीत कमी शब्दांमध्ये बातम्या देणारे, आजच्या घडीला थोडक्यात घडामोडी हे मराठीतलं सर्वात वेगानं वाढणारं न्यूजपोर्टल - थोडक्यात घडामोडी

Recent Posts

स्वातंत्र्यदिनानिमित्त डॉ. सोमनाथ गिते यांचा महापौरांच्या हस्ते गौरव

पुणे : स्वातंत्र्यदिनाच्या निमित्ताने पुणे महानगरपालिकेच्या वतीने आयोजित विशेष सत्कार समारंभात व्यसनमुक्ती अभ्यासक व सामाजिक…

1 तास ago

लग्न ठरलेल्या प्रियकरासोबत तरुणीचा संशयास्पद मृत्यू; आईचा गंभीर आरोप

बारामती : पुणे जिल्ह्यातील बारामती शहरात तरुणीचा अकस्मात आणि संशयास्पद मृत्यू झाल्याप्रकरणी तिच्या आईने दिलेल्या…

5 दिवस ago

चार महिन्यांपूर्वीचा नवाकोरा रस्ता ऑप्टिकल फायबरसाठी फोडला; राष्ट्रवादी काँग्रेसच्या नगरसेविका डॉ. हेमलता पाटील यांचा संताप; काम बंद पाडून अधिकाऱ्यांना जाब

नाशिक : शनिवारी (दि. ८) झालेल्या महासभेत स्मार्टसिटी कंपनी आणि ‘एमएनजीएल’मुळे शहरातील रस्त्यांची झालेली दुरवस्था…

6 दिवस ago

‘उघडलेले पुस्तक’ पॅनेलचा दणदणीत विजय; सर्व १५ उमेदवार विजयी; सर्व प्रवर्गांत परिवर्तन आणि सुशासन पॅनेलला यश

पुणे : पारी टॉवर्स सहकारी गृहरचना संस्था मर्यादित, नऱ्हेच्या संचालक मंडळाच्या पंचवार्षिक निवडणुकीत ‘उघडलेले पुस्तक’…

1 आठवडा ago

हिंगोलीत धक्कादायक प्रकार! डिझेलअभावी रुग्णवाहिका न मिळाल्याने गर्भातील बाळाचा दुर्दैवी मृत्यू

हिंगोली : हिंगोली जिल्ह्यात घडलेल्या एका गंभीर घटनेने सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेवरील विश्वास पुन्हा एकदा डळमळीत…

3 महिने ago

भाविकांसाठी आनंदाची बातमी; धार्मिक स्थळांवर मिळणार दर्जेदार आणि पौष्टिक अन्न सेवा सुविधा

बुलढाणा : केंद्र सरकारच्या फुड स्ट्रीट योजने अंतर्गत विदर्भातील शेगांव आणि मराठवाडा विभागातील शिर्डी येथे…

3 महिने ago