actor shrikant moghe passes away in pune
मुंबई : मराठी रंगभूमी आणि चित्रपटसृष्टीचा रूबाब वागवणारा, चतुरस्र अभिनेता गमावल्याची भावना व्यक्त करून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी ज्येष्ठ अभिनेते श्रीकांत मोघे यांना श्रद्धांजली अर्पण केली आहे. मोघे यांच्या निधनामुळे कला क्षेत्राला मार्गदर्शकाची उणीव भासत राहील, असेही मुख्यमंत्र्यांनी म्हटले आहे.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे शोकसंदेशात म्हणतात, मराठी रंगभूमी आणि चित्रपटसृष्टीत अधिराज्य गाजवणाऱ्या कलाकारांपैकी ज्येष्ठ अभिनेते श्रीकांत मोघे होते. करारी चेहरा, बुलंद आवाज आणि भारदस्त व्यक्तिमत्व यातून मोघे यांनी अजरामर व्यक्तिरेखा साकारल्या. वैविध्यपूर्ण अशा भूमिका ताकदीने निभावतानाच त्यांनी माणूस म्हणूनही वेगळी ओळख निर्माण केली.या दोन्ही क्षेत्रांतील नव्या पिढीसमोर त्यांनी आपल्या अभिनयाचा आदर्श ठेवला. ते दिलखुलास होते. परखड मतांचे आणि सामाजिक बांधिलकीची जाणीव ठेवून काम करणारे कलावंत होते. त्यांच्या निधनामुळे कला क्षेत्राला एक चतुरस्र अभिनेता आणि मार्गदर्शकाची उणीव निश्चितच भासत राहील. ज्येष्ठ अभिनेते श्रीकांत मोघे यांना भावपूर्ण श्रद्धांजली.
पुणे : स्वातंत्र्यदिनाच्या निमित्ताने पुणे महानगरपालिकेच्या वतीने आयोजित विशेष सत्कार समारंभात व्यसनमुक्ती अभ्यासक व सामाजिक…
बारामती : पुणे जिल्ह्यातील बारामती शहरात तरुणीचा अकस्मात आणि संशयास्पद मृत्यू झाल्याप्रकरणी तिच्या आईने दिलेल्या…
नाशिक : शनिवारी (दि. ८) झालेल्या महासभेत स्मार्टसिटी कंपनी आणि ‘एमएनजीएल’मुळे शहरातील रस्त्यांची झालेली दुरवस्था…
पुणे : पारी टॉवर्स सहकारी गृहरचना संस्था मर्यादित, नऱ्हेच्या संचालक मंडळाच्या पंचवार्षिक निवडणुकीत ‘उघडलेले पुस्तक’…
हिंगोली : हिंगोली जिल्ह्यात घडलेल्या एका गंभीर घटनेने सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेवरील विश्वास पुन्हा एकदा डळमळीत…
बुलढाणा : केंद्र सरकारच्या फुड स्ट्रीट योजने अंतर्गत विदर्भातील शेगांव आणि मराठवाडा विभागातील शिर्डी येथे…