मनोरंजन

अभिनेते रवींद्र महाजनी यांचे निधन, पुण्यातील घरात आढळला मृतदेह

पुणे : मराठी चित्रपटसृष्टीत ७०-८०च्या दशकात हँडसम हंक म्हणून ओळखले जाणारे अभिनेते रवींद्र महाजनी यांचं निधन झालं आहे. त्यांच्या निधनाने सिनेसृष्टीवर शोककळा पसरली असून चाहतेही धक्क्यात आहेत. शुक्रवारी तळेगाव दाभाडे इथल्या राहत्या घरात ते मृतावस्थेत आढळले. त्यांचा मृत्यू २-३ दिवस आधीच झाल्याची माहिती मिळाली आहे.

अभिनेते रवींद्र महाजनी गेल्या काही महिन्यांपासून तळेगाव दाभाडे इथल्या एका फ्लॅटमध्ये भाडेतत्त्वावर राहत होते. ते राहत असलेल्या फ्लॅटमधून अचानक दुर्गंधी येऊ लागल्याने शेजारील रहिवाशांनी पोलिसांना माहिती दिली. पोलिसांनी घराचा दरवाजा तोडला तेव्हा रवींद्र महाजनी मृतावस्थेत आढळले. त्यांच्या मृतदेहाची ही अवस्था पाहून ते त्या घरात भाड्याने का राहत होते असा प्रश्न आता चाहते विचारत आहेत.

रवींद्र महाजनी यांचा जीवनप्रवास :
रवींद्र महाजनी यांचा जन्म १९४९ साली पुण्यात झाला होता. त्यांचे वडील स्वांतत्र्यसैनिक व पत्रकार होते. रवींद्र शाळेत असल्यापासून त्यांना अभिनयाची आवड होती, मोठं झाल्यावर नाटक व सिनेमात काम करायचं हे त्यांचं स्वप्न होतं. रवींद्र यांनी खालसा कॉलेजमध्ये बीएसाठी प्रवेश घेतला होता. दरम्यान, वडिलांचं निधन झालं आणि रवींद्र यांच्यावर कुटुंबाची जबाबदारी आली. सर्वांचा सांभाळ करण्यासाठी काम करणं, पैसे कमावणं गरजेचं होतं. म्हणून रवींद्र यांनी टॅक्सी चालवायला सुरुवात केली. ते दिवसा निर्मात्यांना भेटायचे आणि रात्री टॅक्सी चालवायचे. तीन वर्षे हाच त्यांचा दिनक्रम होता.

रवींद्र यांनी ‘गोंधळात गोंधळ’ सिनेमातून मराठी चित्रपटसृष्टीत पदार्पण केलं. ‘जाणता अजाणता’ नाटकातील त्यांची भूमिका विशेष गाजली होती. त्यांनी ‘झुंज’, ‘आराम हराम आहे’, ‘देवता’, ‘मुंबईचा फौजदार’, ‘लक्ष्मीची पाऊले’ यामध्ये काम केलं. मराठी शिवाय त्यांनी हिंदी, मराठी व गुजराती चित्रपटांमध्ये काम केलं. ‘सत्तेसाठी काहीही’ या चित्रपटातून त्यांनी निर्मिती व दिग्दर्शन क्षेत्रात पाऊल ठेवलं. रवींद्र यांचा मुलगा गश्मीर महाजनी उत्तम डान्सर व अभिनेता आहे, त्याने वयाच्या १५ व्या वर्षी स्वतःची डान्स अकॅडमी सुरू केली होती. या बापलेकाच्या जोडीने ‘पानीपत’ व ‘देऊळबंद’ चित्रपटात एकत्र काम केलं होतं. मुलाच्या ‘कॅरीऑन’ चित्रपटात त्यांनी कॅमिओ केला होता.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केलं दुःख :
दरम्यान, ज्येष्ठ अभिनेते रवींद्र महाजनी यांच्या निधनावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दुःख व्यक्त केले आहे. तसेच त्यांना मुख्यमंत्र्यांनी भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली आहे. ‘रवींद्र महाजनी यांनी आपला दमदार अभिनय, देखणेपण, रुबाबदार व्यक्तिमत्त्वाच्या जोरावर मराठी चित्रपटसृष्टी गाजवली. नाटकांमधून सुरुवात करून महाजनी यांनी चित्रपटात केलेली आपली कारकीर्द मराठी रसिकांच्या निश्चितच लक्षात राहण्यासारखी आहे. त्यांच्या निधनाने एक गुणी अभिनेता आपल्यातून निघून गेला. ज्येष्ठ अभिनेते रवींद्र महाजनी यांना भावपूर्ण श्रद्धांजली’, असेही मुख्यमंत्र्यांनी शोकसंदेशात म्हटले आहे.

Share this :
थोडक्यात घडामोडी टीम

कमीत कमी शब्दांमध्ये बातम्या देणारे, आजच्या घडीला थोडक्यात घडामोडी हे मराठीतलं सर्वात वेगानं वाढणारं न्यूजपोर्टल - थोडक्यात घडामोडी

Recent Posts

हिंगोलीत धक्कादायक प्रकार! डिझेलअभावी रुग्णवाहिका न मिळाल्याने गर्भातील बाळाचा दुर्दैवी मृत्यू

हिंगोली : हिंगोली जिल्ह्यात घडलेल्या एका गंभीर घटनेने सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेवरील विश्वास पुन्हा एकदा डळमळीत…

1 आठवडा ago

भाविकांसाठी आनंदाची बातमी; धार्मिक स्थळांवर मिळणार दर्जेदार आणि पौष्टिक अन्न सेवा सुविधा

बुलढाणा : केंद्र सरकारच्या फुड स्ट्रीट योजने अंतर्गत विदर्भातील शेगांव आणि मराठवाडा विभागातील शिर्डी येथे…

1 आठवडा ago

पुण्यात विषारी दारू प्यायल्याने १२ जणांचा मृत्यू, दोषींवर कठोर कारवाईचे आदेश

मुंबई : पुणे शहरातील हडपसर आणि पिंपरी-चिंचवडमधील दापोडी-फुगेवाडी परिसरात विषारी दारू प्यायल्याने १२ नागरिकांचा मृत्यू…

1 आठवडा ago

व्यसनमुक्ती क्षेत्रातील अविरत समाजकार्याची दखल; डॉ. सोमनाथ गिते यांचा मा. माधुरीताई मिसाळ यांच्या हस्ते सत्कार

पुणे : महाराष्ट्र शासनाच्या सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागामार्फत प्रदान करण्यात आलेल्या “राष्ट्रपिता महात्मा…

2 आठवडे ago

भरतीच्या बोगस जाहिरातींपासून सावध राहण्याचे आवाहन

मुंबई : ‘महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना’अंतर्गत महाराष्ट्रात विविध पदांसाठी तात्काळ भरती सुरू…

3 आठवडे ago

पुण्यात उष्णतेचा कहर! IMD चा यलो अलर्ट जारी; नागरिकांना काळजी घेण्याचे आवाहन

पुणे : पुणे शहर आणि जिल्ह्यात उष्णतेची तीव्रता दिवसेंदिवस वाढत असून भारतीय हवामान विभागाने (IMD)…

4 आठवडे ago