मनोरंजन

अभिनेता कार्तिक आर्यनला दुसऱ्यांदा कोरोनाची लागण, IIFA 2022 मध्ये देणार होता परफॉर्मन्स…

मुंबई : अभिनेता कार्तिक आर्यनला कोरोनाची लागण झाली आहे. तो आयफा 2022 मध्ये सहभागी होणार होता, मात्र त्याची कोविड-चाचणी पॉझिटिव्ह झाली आहे. शनिवार, 4 जून रोजी होणाऱ्या IIFA 2022 च्या मुख्य कार्यक्रमासाठी कार्तिकने विशेष तयारी केली होती. मात्र, आता त्याने कोरोना झाल्याची बातमी शेअर केली आहे.

कार्तिक आर्यनचा भूलभुलैया मागील आठवड्यात प्रदर्शित झाला असून चांगले यश मिळवले आहे. तो आयफा २०२२ मध्ये उपस्थित राहणार होता आणि मुख्य कार्यक्रमात परफॉर्मन्स देणार होता. तथापि, आता अभिनेत्याची कोविड-19 चाचणी पॉझिटिव्ह आली आहे. त्याने ही बातमी इन्स्टाग्रामवर शेअर करण्यासाठी त्याच्या स्वतःचा एक फोटो शेअर केला आणि लिहिले, सर्व काही पॉझिटिव्ह सुरु होतं, कोविडला राहावलं नाही.

आयफा व्यवस्थापन कार्तिक आर्यनच्या नुकत्याच रिलीज झालेल्या भूल भुलैया 2 च्या अद्भूत यशानंतर त्याच्यासाठी उत्सुक होते. कार्तिक आर्यन आयफा 2022 च्या मंचावर परफॉर्मन्स देणार होता, जो त्याचा भूल भुलैया 2 शीर्षक ट्रॅकवर पहिला थेट परफॉर्मन्स असणार होता.

अभिनेता कार्तिक आर्यनला याआधीही कोरोनाचा फटका बसला आहे. वास्तविक, ‘भूल भुलैया 2’ चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान कार्तिकचा कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आला होता. मात्र, काही दिवसांनंतर अभिनेता यातून बरा झाला होता. अशा परिस्थितीत कार्तिक आर्यन लवकरच कोरोनाशी लढाई जिंकून पुनरागमन करेल अशी अपेक्षा आहे. भूल भुलैया २ नंतर आता कार्तिक त्याच्या चाहत्यांसाठी शहजादा चित्रपटाची भेट घेऊन येणार असल्याची माहिती आहे.

Share this :
थोडक्यात घडामोडी टीम

कमीत कमी शब्दांमध्ये बातम्या देणारे, आजच्या घडीला थोडक्यात घडामोडी हे मराठीतलं सर्वात वेगानं वाढणारं न्यूजपोर्टल - थोडक्यात घडामोडी

Recent Posts

हिंगोलीत धक्कादायक प्रकार! डिझेलअभावी रुग्णवाहिका न मिळाल्याने गर्भातील बाळाचा दुर्दैवी मृत्यू

हिंगोली : हिंगोली जिल्ह्यात घडलेल्या एका गंभीर घटनेने सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेवरील विश्वास पुन्हा एकदा डळमळीत…

2 आठवडे ago

भाविकांसाठी आनंदाची बातमी; धार्मिक स्थळांवर मिळणार दर्जेदार आणि पौष्टिक अन्न सेवा सुविधा

बुलढाणा : केंद्र सरकारच्या फुड स्ट्रीट योजने अंतर्गत विदर्भातील शेगांव आणि मराठवाडा विभागातील शिर्डी येथे…

2 आठवडे ago

पुण्यात विषारी दारू प्यायल्याने १२ जणांचा मृत्यू, दोषींवर कठोर कारवाईचे आदेश

मुंबई : पुणे शहरातील हडपसर आणि पिंपरी-चिंचवडमधील दापोडी-फुगेवाडी परिसरात विषारी दारू प्यायल्याने १२ नागरिकांचा मृत्यू…

2 आठवडे ago

व्यसनमुक्ती क्षेत्रातील अविरत समाजकार्याची दखल; डॉ. सोमनाथ गिते यांचा मा. माधुरीताई मिसाळ यांच्या हस्ते सत्कार

पुणे : महाराष्ट्र शासनाच्या सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागामार्फत प्रदान करण्यात आलेल्या “राष्ट्रपिता महात्मा…

3 आठवडे ago

भरतीच्या बोगस जाहिरातींपासून सावध राहण्याचे आवाहन

मुंबई : ‘महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना’अंतर्गत महाराष्ट्रात विविध पदांसाठी तात्काळ भरती सुरू…

4 आठवडे ago

पुण्यात उष्णतेचा कहर! IMD चा यलो अलर्ट जारी; नागरिकांना काळजी घेण्याचे आवाहन

पुणे : पुणे शहर आणि जिल्ह्यात उष्णतेची तीव्रता दिवसेंदिवस वाढत असून भारतीय हवामान विभागाने (IMD)…

1 महिना ago