मनोरंजन

‘रामायण’ या मालिकेत भूमिका साकारणारे अभिनेते चंद्रकांत पंड्या यांचे निधन

मुंबई : ‘रामायण’ या मालिकेत भूमिका साकारणारे अभिनेते चंद्रकांत पंड्या यांचे निधन झाले आहे. ‘रामायण’ मध्ये सीतेची भूमिका साकारणारी अभिनेत्री दीपिका चिखलियाने त्यांच्या निधनाची बातमी सोशल मीडियावरून चाहत्यांना दिली आहे. ‘रामायण’मध्ये भगवान राम यांचा बालपणीचा मित्र निषाद राजची भूमिका चंद्रकांत यांनी साकारली होती.

दीपिका चिखलियाने इन्स्टाग्राम स्टोरीवर ‘निषाद राज’ अर्थात चंद्रकांत पंड्या यांचा फोटो शेअर केला आणि त्यांच्या मृत्यूबद्दल सांगितले. या बातमीमुळे सर्वत्र हालहाल व्यक्त करण्यात येत आहे. चंद्रकांत पंड्या यांना सर्वजण प्रेमाने ‘बबला’ नावाने हाक मारत असत. चंद्रकांत यांचा जन्म 1 जानेवारी 1946 रोजी गुजरात राज्यातील बनासकांठा जिल्ह्यातील भिलडी गावात झाला. त्यांचे वडील व्यापारी होते. ते गुजरातमधून येऊन मुंबईत स्थायिक झाले होते. चंद्रकांत यांचे बालपण मुंबईत गेले आणि शिक्षणही येथेच पूर्ण झाले.

‘रामायण’ व्यतिरिक्त चंद्रकांत पंड्या यांनी अनेक चित्रपट आणि टीव्ही शोमध्येही काम केले आहे. चंद्रकांत ज्येष्ठ अभिनेते अमजद खान यांचे खूप चांगले मित्र होते. दोघांनी एकत्र महाविद्यालयीन शिक्षण पूर्ण केले. चंद्रकांत यांना लहानपणापासूनच नाटकांमध्ये आणि अभिनयात रुची होती. त्यांना उपेंद्र त्रिवेदी आणि अरविंद त्रिवेदी यांच्यासोबत नाटकांमध्ये काम करण्याची संधी मिळाली. त्यातूनच त्यांनी अभिनयाला सुरुवात केली. त्यांना ‘कडू मकरानी’ या गुजराती चित्रपटात पहिला ब्रेक मिळाला. या चित्रपटात काम केल्यानंतर, चंद्रकांत गुजराती चित्रपटसृष्टीत एक प्रसिद्ध अभिनेते बनले. पण रामायणातील त्यांचे ‘निषाद राज’ हे पात्र अविस्मरणीय ठरले.

Share this :
थोडक्यात घडामोडी टीम

कमीत कमी शब्दांमध्ये बातम्या देणारे, आजच्या घडीला थोडक्यात घडामोडी हे मराठीतलं सर्वात वेगानं वाढणारं न्यूजपोर्टल - थोडक्यात घडामोडी

Recent Posts

हिंगोलीत धक्कादायक प्रकार! डिझेलअभावी रुग्णवाहिका न मिळाल्याने गर्भातील बाळाचा दुर्दैवी मृत्यू

हिंगोली : हिंगोली जिल्ह्यात घडलेल्या एका गंभीर घटनेने सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेवरील विश्वास पुन्हा एकदा डळमळीत…

2 आठवडे ago

भाविकांसाठी आनंदाची बातमी; धार्मिक स्थळांवर मिळणार दर्जेदार आणि पौष्टिक अन्न सेवा सुविधा

बुलढाणा : केंद्र सरकारच्या फुड स्ट्रीट योजने अंतर्गत विदर्भातील शेगांव आणि मराठवाडा विभागातील शिर्डी येथे…

2 आठवडे ago

पुण्यात विषारी दारू प्यायल्याने १२ जणांचा मृत्यू, दोषींवर कठोर कारवाईचे आदेश

मुंबई : पुणे शहरातील हडपसर आणि पिंपरी-चिंचवडमधील दापोडी-फुगेवाडी परिसरात विषारी दारू प्यायल्याने १२ नागरिकांचा मृत्यू…

2 आठवडे ago

व्यसनमुक्ती क्षेत्रातील अविरत समाजकार्याची दखल; डॉ. सोमनाथ गिते यांचा मा. माधुरीताई मिसाळ यांच्या हस्ते सत्कार

पुणे : महाराष्ट्र शासनाच्या सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागामार्फत प्रदान करण्यात आलेल्या “राष्ट्रपिता महात्मा…

2 आठवडे ago

भरतीच्या बोगस जाहिरातींपासून सावध राहण्याचे आवाहन

मुंबई : ‘महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना’अंतर्गत महाराष्ट्रात विविध पदांसाठी तात्काळ भरती सुरू…

3 आठवडे ago

पुण्यात उष्णतेचा कहर! IMD चा यलो अलर्ट जारी; नागरिकांना काळजी घेण्याचे आवाहन

पुणे : पुणे शहर आणि जिल्ह्यात उष्णतेची तीव्रता दिवसेंदिवस वाढत असून भारतीय हवामान विभागाने (IMD)…

4 आठवडे ago