Actor Anupam Shyam passes away at 63 due to multiple organ failure
मुंबई : अभिनेते अनुपम श्याम ओझा यांचे आज (8 ऑगस्ट) निधन झाले. ते 63 वर्षांचे होते. अभिनेता अनुपम श्याम सुमारे सहा दिवसांपासून रुग्णालयात होते. त्यांचे अनेक अवयव निकामी झाल्याने आज रात्री 8 वाजता निधन झाले.
अनुपम श्याम टीव्ही शो ‘मन की आवाज : प्रतिज्ञा’ मधील त्यांच्या ठाकूर सज्जन सिंह या भूमिकेसाठी ओळखले जातात. त्यांनी स्लमडॉग मिलियनेअर, बँडिट क्वीन सारख्या चित्रपटांमध्येही भूमिका साकारल्या आहेत. ते सध्या मन की आवाज प्रतिज्ञा 2 मध्ये काम करत होते. गेल्या वर्षी, जुलैमध्ये अनुपम श्याम डायलिसिस दरम्यान कोसळले होते, त्यानंतर त्यांना गोरेगावच्या लाईफलाईन हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते. प्रतिज्ञा 2 च्या शूटिंग दरम्यान अनुपम श्याम यांचे आठवड्यातून तीनदा डायलिसिस करण्यात येत होते.
चित्रपट निर्माते अशोक पंडित यांनी ट्विटरवर त्यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त केला. त्यांनी लिहिले कि, “हे ऐकून दुःख झाले की एका उत्कृष्ट अभिनेत्याचे आणि एका महान मनुष्याचे म्हणजेच अनुपम श्याम यांचे अनेक अवयव निकामी झाल्यामुळे निधन झाले. आज कुटुंबाबद्दल माझी मनःपूर्वक संवेदना. हे चित्रपट आणि टीव्ही उद्योगाला झालेले मोठे नुकसान आहे. ओम शांती!”
अभिनेते मनोज जोशी यांनीही ज्येष्ठ अभिनेते अनुपम श्याम यांना अंतिम श्रद्धांजली वाहण्यासाठी ट्विटरचा आधार घेतला. त्यांनी लिहिले, “माझे मित्र आणि अत्यंत प्रतिभावान अभिनेते अनुपम श्याम जी यांच्या निधनाने दु: खी आहे. आम्ही एक महान माणूस गमावला आहे. त्यांचे कुटुंबीय आणि मित्रांबरोबर माझी मनापासून संवेदना आहे. ओम शांती.”
उत्तर प्रदेशातील प्रतापगढ येथील रहिवासी असलेल्या अनुपम श्याम यांनी 1993 मध्ये आपल्या कारकिर्दीला सुरुवात केली. ते लखनौमधील भारतेन्दू नाट्य कला अकादमीचा माजी विद्यार्थी आहेत. ते दस्तक, दिल से…, लगान, गोलमाल आणि मुन्ना मायकेल सारख्या लोकप्रिय बॉलिवूड चित्रपटांचा देखील भाग आहेत.
हिंगोली : हिंगोली जिल्ह्यात घडलेल्या एका गंभीर घटनेने सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेवरील विश्वास पुन्हा एकदा डळमळीत…
बुलढाणा : केंद्र सरकारच्या फुड स्ट्रीट योजने अंतर्गत विदर्भातील शेगांव आणि मराठवाडा विभागातील शिर्डी येथे…
मुंबई : पुणे शहरातील हडपसर आणि पिंपरी-चिंचवडमधील दापोडी-फुगेवाडी परिसरात विषारी दारू प्यायल्याने १२ नागरिकांचा मृत्यू…
पुणे : महाराष्ट्र शासनाच्या सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागामार्फत प्रदान करण्यात आलेल्या “राष्ट्रपिता महात्मा…
मुंबई : ‘महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना’अंतर्गत महाराष्ट्रात विविध पदांसाठी तात्काळ भरती सुरू…
पुणे : पुणे शहर आणि जिल्ह्यात उष्णतेची तीव्रता दिवसेंदिवस वाढत असून भारतीय हवामान विभागाने (IMD)…