शैक्षणिक

पुण्यातील शाळा १ फेब्रुवारीपासून होणार सुरू

पुणे : पुणे महापालिका हद्दीतील इयत्ता पाचवी ते आठवीचे वर्ग 1 फेब्रुवारीपासून सुरू करण्याचा निर्णय महापालिकेने घेतला आहे. पालकमंत्री अजित पवार यांच्या आढावा बैठकीत झालेल्या चर्चेनुसार याबाबत उच्चपदस्थ सूत्रांनी सांगितले.

राज्यातील पाचवी ते आठवीचे वर्ग सुरू करण्यासाठी शालेय शिक्षण विभाग आणि सार्वजनिक आरोग्य विभागाने मान्यता दिली आहे. त्यामुळे स्थानिक स्वराज्य संस्थांनी कोरोनाबाबतच्या नियमांचे पालन करून शाळा सुरू करण्याची दक्षता घ्यावी, अशी सूचना राज्य सरकारने केली आहे.

राज्यातील करोना रुग्णांची संख्याही कमी झाली असून, सध्या स्थिती नियंत्रणाखाली आल्याचे अध्यादेशात म्हटले आहे. त्यामुळे शाळांमध्ये कोरोना प्रतिबंधात्मक उपाययोजना करून विद्यार्थ्यांचे शैक्षणिक वर्ष वाया जाऊ नये, यासाठी शाळा सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यानुसार पाचवी ते आठवीचे वर्ग २७ जानेवारीपासून सुरू करण्याला सरकारने मान्यता दिली आहे. याबाबत केंद्र आणि राज्य सरकारच्या सूचनांचे पालन करण्यात यावे. तसेच, जिल्हा परिषदा, नगरपालिका, महानगरपालिकांनी शाळांचे वर्ग सुरक्षितपणे सुरू होतील, याची दक्षता घ्यावी असेही अध्यादेशात म्हटले आहे.

Share this :
थोडक्यात घडामोडी टीम

कमीत कमी शब्दांमध्ये बातम्या देणारे, आजच्या घडीला थोडक्यात घडामोडी हे मराठीतलं सर्वात वेगानं वाढणारं न्यूजपोर्टल - थोडक्यात घडामोडी

Recent Posts

हिंगोलीत धक्कादायक प्रकार! डिझेलअभावी रुग्णवाहिका न मिळाल्याने गर्भातील बाळाचा दुर्दैवी मृत्यू

हिंगोली : हिंगोली जिल्ह्यात घडलेल्या एका गंभीर घटनेने सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेवरील विश्वास पुन्हा एकदा डळमळीत…

4 दिवस ago

भाविकांसाठी आनंदाची बातमी; धार्मिक स्थळांवर मिळणार दर्जेदार आणि पौष्टिक अन्न सेवा सुविधा

बुलढाणा : केंद्र सरकारच्या फुड स्ट्रीट योजने अंतर्गत विदर्भातील शेगांव आणि मराठवाडा विभागातील शिर्डी येथे…

4 दिवस ago

पुण्यात विषारी दारू प्यायल्याने १२ जणांचा मृत्यू, दोषींवर कठोर कारवाईचे आदेश

मुंबई : पुणे शहरातील हडपसर आणि पिंपरी-चिंचवडमधील दापोडी-फुगेवाडी परिसरात विषारी दारू प्यायल्याने १२ नागरिकांचा मृत्यू…

4 दिवस ago

व्यसनमुक्ती क्षेत्रातील अविरत समाजकार्याची दखल; डॉ. सोमनाथ गिते यांचा मा. माधुरीताई मिसाळ यांच्या हस्ते सत्कार

पुणे : महाराष्ट्र शासनाच्या सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागामार्फत प्रदान करण्यात आलेल्या “राष्ट्रपिता महात्मा…

1 आठवडा ago

भरतीच्या बोगस जाहिरातींपासून सावध राहण्याचे आवाहन

मुंबई : ‘महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना’अंतर्गत महाराष्ट्रात विविध पदांसाठी तात्काळ भरती सुरू…

2 आठवडे ago

पुण्यात उष्णतेचा कहर! IMD चा यलो अलर्ट जारी; नागरिकांना काळजी घेण्याचे आवाहन

पुणे : पुणे शहर आणि जिल्ह्यात उष्णतेची तीव्रता दिवसेंदिवस वाढत असून भारतीय हवामान विभागाने (IMD)…

3 आठवडे ago