शैक्षणिक

२ मेपासून उन्हाळी सुटी जाहीर करणार, शिक्षण विभागाने केले नियोजन

मुंबई : शालेय शिक्षण विभागाने राज्यातील इयत्ता पहिली ते नववी आणि ११ वीच्या शाळा एप्रिल महिन्यात सुरू ठेवण्याचा निर्णय घेतला, त्यानंतर वेगवेगळ्या चर्चा सुरु होत्या. दरम्यान, आता शिक्षण संचालनालयाने २०२२ ची उन्हाळी सुटी २ मेपासून जाहीर करून नव्या शैक्षणिक वर्षातील शाळा १३ जूनपासून सुरू करण्यात याव्यात, अशी विनंती शालेय शिक्षण विभागाच्या प्रधान सचिवांकडे केली आहे.

दरवर्षी एप्रिलमध्ये परीक्षा संपल्यानंतर विद्यार्थ्यांना सुटी लागते. मात्र, यंदा शैक्षणिक नुकसान भरून काढण्यासाठी एप्रिल महिन्यात शाळा सुरू ठेवण्याच्या सूचना करण्यात आल्या. यावरून राज्यभरातून नाराजीचा सूर उमटत आहे. यामुळे संपूर्ण राज्यातील शाळांच्या कालावधीमध्ये एकवाक्यता आणण्यासाठी २०२२ ची उन्हाळी सुटी व आगामी शैक्षणिक वर्ष २०२२-२३ मध्ये शाळा सुरू करण्याबाबतचा प्रस्ताव शिक्षण संचालनालयाकडून शालेय शिक्षण विभागाकडे करण्यात आले आहे. त्यामध्ये म्हटले आहे की २ मेपासून उन्हाळी सुटी लागू करावी, ही सुटी १२ जूनपर्यंत असावी.

काय आहे प्रस्ताव?

शैक्षणिक वर्ष २०२२-२३ मध्ये शाळा जूनच्या दुसऱ्या सोमवारपासून तर विदर्भामध्ये जूनच्या चौथ्या सोमवारपासून सुरू करण्यात याव्यात. जूनच्या दुसऱ्या सोमवारी म्हणजे १३ जून रोजी विदर्भ वगळता राज्यातील सर्व शाळा सुरू होतील. तर विदर्भातील जूनमधील तापमान विचारात घेता तेथील शाळा चौथ्या सोमवारी म्हणजेच २७ जून २०२२ रोजी सुरू होतील, अशा सूचना प्राथमिक शिक्षण संचालक दिनकर टेमकर आणि माध्यमिक शिक्षण संचालक महेश पालकर यांनी पाठवलेल्या प्रस्तावामध्ये मांडल्या आहेत. उन्हाळ्याची व दिवाळीची दीर्घ सुट्टी कमी करून त्याऐवजी गणेशोत्सव किंवा नाताळसारख्या सणांच्या सुट्ट्यांचे नियोजन शिक्षणाधिकाऱ्यांच्या परवानगीने करण्यात यावे. मात्र, माध्यमिक शाळा संहिता नियम ५२.२ नुसार शैक्षणिक वर्षातील सर्व प्रकारच्या एकूण सुट्ट्या ७६ दिवसांपेक्षा जास्त होणार नाहीत, याची दक्षता घेण्यात यावी, असेही शिक्षण संचालनालयाने या प्रस्तावामध्ये म्हटले आहे.

Share this :
थोडक्यात घडामोडी टीम

कमीत कमी शब्दांमध्ये बातम्या देणारे, आजच्या घडीला थोडक्यात घडामोडी हे मराठीतलं सर्वात वेगानं वाढणारं न्यूजपोर्टल - थोडक्यात घडामोडी

Recent Posts

स्वातंत्र्यदिनानिमित्त डॉ. सोमनाथ गिते यांचा महापौरांच्या हस्ते गौरव

पुणे : स्वातंत्र्यदिनाच्या निमित्ताने पुणे महानगरपालिकेच्या वतीने आयोजित विशेष सत्कार समारंभात व्यसनमुक्ती अभ्यासक व सामाजिक…

5 दिवस ago

लग्न ठरलेल्या प्रियकरासोबत तरुणीचा संशयास्पद मृत्यू; आईचा गंभीर आरोप

बारामती : पुणे जिल्ह्यातील बारामती शहरात तरुणीचा अकस्मात आणि संशयास्पद मृत्यू झाल्याप्रकरणी तिच्या आईने दिलेल्या…

1 आठवडा ago

चार महिन्यांपूर्वीचा नवाकोरा रस्ता ऑप्टिकल फायबरसाठी फोडला; राष्ट्रवादी काँग्रेसच्या नगरसेविका डॉ. हेमलता पाटील यांचा संताप; काम बंद पाडून अधिकाऱ्यांना जाब

नाशिक : शनिवारी (दि. ८) झालेल्या महासभेत स्मार्टसिटी कंपनी आणि ‘एमएनजीएल’मुळे शहरातील रस्त्यांची झालेली दुरवस्था…

2 आठवडे ago

‘उघडलेले पुस्तक’ पॅनेलचा दणदणीत विजय; सर्व १५ उमेदवार विजयी; सर्व प्रवर्गांत परिवर्तन आणि सुशासन पॅनेलला यश

पुणे : पारी टॉवर्स सहकारी गृहरचना संस्था मर्यादित, नऱ्हेच्या संचालक मंडळाच्या पंचवार्षिक निवडणुकीत ‘उघडलेले पुस्तक’…

2 आठवडे ago

हिंगोलीत धक्कादायक प्रकार! डिझेलअभावी रुग्णवाहिका न मिळाल्याने गर्भातील बाळाचा दुर्दैवी मृत्यू

हिंगोली : हिंगोली जिल्ह्यात घडलेल्या एका गंभीर घटनेने सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेवरील विश्वास पुन्हा एकदा डळमळीत…

3 महिने ago

भाविकांसाठी आनंदाची बातमी; धार्मिक स्थळांवर मिळणार दर्जेदार आणि पौष्टिक अन्न सेवा सुविधा

बुलढाणा : केंद्र सरकारच्या फुड स्ट्रीट योजने अंतर्गत विदर्भातील शेगांव आणि मराठवाडा विभागातील शिर्डी येथे…

3 महिने ago