क्राईम

धक्कादायक! विषारी इंजेक्शन देऊन वॉर्डबॉयने केली प्रेयसीची हत्या

नवी मुंबई : प्रियकराने केटामाईन इंजेक्शन देऊन प्रेयसीचा खून केल्याची धक्कादायक घटना पनवेलमध्ये घडली आहे. पनवेल शहर पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे. चंद्रकांत गायकर असं आरोपीचं नाव असून तो एका खासगी रुग्णालयात वॉर्डबॉय म्हणून काम करतो. प्रेयसीने लग्नासाठी तगादा लावत धमकी दिल्यामुळे त्याने तिची हत्या केली.

पोलिसांना 29 मे रोजी नियोजित विमानतळाच्या हद्दीत एका महिलेचा मृतदेह सापडला होता. परंतु, तिच्या शरीरावर कोणत्याही जखमा नव्हत्या. पोलिसांनी सुरुवातीला अपघाती मृत्यूची नोंद केली. 30 मे रोजी एका रिक्षाचालकाला आधारकार्ड, पॅनकार्ड, पर्स आणि कपडे असलेली पिवळी पिशवी सापडली. रिक्षाचालकाने ही पिशवी पोलिसांकडे दिली, त्यावरुन मृत महिलेची ओळख पटली. हा मृतदेह आपल्या बहिणीचा असल्याचं महेश ठोंबरे यांनी सांगितलं आणि तिचा खून झाल्याचा संशय व्यक्त केला.

मिळालेल्या माहितीनुसार, या महिलेचे आरोपी व्यक्तीबरोबर प्रेमसंबंध होते. परंतु काही दिवसांपूर्वी दोघांमध्ये भांडण झालं होतं. पोलिसांनी तुरमाळे इथे राहणाऱ्या आरोपी चंद्रकांत गायकरला ताब्यात घेऊन चौकशी केली असता त्याने गुन्ह्याची कबुली दिली. आरोपी एका खाजगी रुग्णालयात वॉर्डबॉय म्हणून काम करतो. त्याचे सहा महिन्यांपासून या महिलेसोबत प्रेमसंबंध होते. मात्र तिने लग्नासाठी तगादा लावला होता. ती त्याला सतत धमकी देत होती. मात्र, त्याला हे लग्न करायचे नव्हते त्यामुळे त्याने महिलेला मारण्याचं ठरवलं. आरोपीने सांगितलं की ही महिला आजारी होती, आजारातून बरं करतो असं सांगून निर्जन स्थळी नेत त्याने महिलेला वेगवेगळे चार इंजेक्शन दिले. यानंतर केटामाईन हे विषारी इंजेक्शन देऊन तिची हत्या केली, अशी कबुली आरोपीने दिली.

Share this :
थोडक्यात घडामोडी टीम

कमीत कमी शब्दांमध्ये बातम्या देणारे, आजच्या घडीला थोडक्यात घडामोडी हे मराठीतलं सर्वात वेगानं वाढणारं न्यूजपोर्टल - थोडक्यात घडामोडी

Recent Posts

हिंगोलीत धक्कादायक प्रकार! डिझेलअभावी रुग्णवाहिका न मिळाल्याने गर्भातील बाळाचा दुर्दैवी मृत्यू

हिंगोली : हिंगोली जिल्ह्यात घडलेल्या एका गंभीर घटनेने सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेवरील विश्वास पुन्हा एकदा डळमळीत…

2 आठवडे ago

भाविकांसाठी आनंदाची बातमी; धार्मिक स्थळांवर मिळणार दर्जेदार आणि पौष्टिक अन्न सेवा सुविधा

बुलढाणा : केंद्र सरकारच्या फुड स्ट्रीट योजने अंतर्गत विदर्भातील शेगांव आणि मराठवाडा विभागातील शिर्डी येथे…

2 आठवडे ago

पुण्यात विषारी दारू प्यायल्याने १२ जणांचा मृत्यू, दोषींवर कठोर कारवाईचे आदेश

मुंबई : पुणे शहरातील हडपसर आणि पिंपरी-चिंचवडमधील दापोडी-फुगेवाडी परिसरात विषारी दारू प्यायल्याने १२ नागरिकांचा मृत्यू…

2 आठवडे ago

व्यसनमुक्ती क्षेत्रातील अविरत समाजकार्याची दखल; डॉ. सोमनाथ गिते यांचा मा. माधुरीताई मिसाळ यांच्या हस्ते सत्कार

पुणे : महाराष्ट्र शासनाच्या सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागामार्फत प्रदान करण्यात आलेल्या “राष्ट्रपिता महात्मा…

2 आठवडे ago

भरतीच्या बोगस जाहिरातींपासून सावध राहण्याचे आवाहन

मुंबई : ‘महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना’अंतर्गत महाराष्ट्रात विविध पदांसाठी तात्काळ भरती सुरू…

3 आठवडे ago

पुण्यात उष्णतेचा कहर! IMD चा यलो अलर्ट जारी; नागरिकांना काळजी घेण्याचे आवाहन

पुणे : पुणे शहर आणि जिल्ह्यात उष्णतेची तीव्रता दिवसेंदिवस वाढत असून भारतीय हवामान विभागाने (IMD)…

4 आठवडे ago