क्राईम

मुंबईत पीएचडीधारकाचा मैत्रिणीच्या घरी संशयास्पद मृत्यू, पंख्याला लटकलेल्या अवस्थेत मृतदेह

मुंबई : मुंबईतील गोरेगाव येथे एका ४९ वर्षीय पीएचडी धारकाचा मृत्यू झाला आहे. पंख्याला लटकलेल्या अवस्थेत त्यांचा मृतदेह सापडला. प्राथमिक अंदाजानुसार त्यांनी आत्महत्या केल्याचं म्हटलं जातंय. रवी यादव असे मृताचे नाव अून ते मुळचे डोंबिवलीचे आहेत. एका बहुराष्ट्रीय औषध कंपनीत कामाला होते. त्यांच्या मृत्यूमागचे नेमके कारण अद्याप समोर आलेले नसल्याचे पोलिसांनी सांगितले.

गोरेगाव पश्चिम येथील प्रेमनगर सोसायटी, म्हाडा कॉलनी येथे २४ जून रोजी यादव यांचा मृतदेह त्यांच्या मैत्रिणीच्या फ्लॅटमध्ये आढळून आला होता. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तो या मैत्रिणीबरोबर कधीतरी राहत असे. तिने दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, तो नेहमीप्रमाणे राहण्यासाठी तिच्या फ्लॅटवर आला. रात्री ११ वाजेपर्यंत ती दुसऱ्या खोलीत होती. नंतर हॉलमध्ये प्रवेश केल्यावर तिला यादव ओढणीच्या सहाय्याने पंख्याला लटकलेल्या अवस्थेत दिसले. तिने पोलिसांना सांगितले की तिने शेजारी राहणाऱ्या महिलेच्या मदतीने मृतदेह बाहेर काढण्याचा प्रयत्न केला. मात्र, ओढणीचा दोर सैल झाल्याने मृतदेह जमिनीवर पडला, त्यामुळे रक्तस्त्राव झाला. दरम्यान, दुसऱ्या शेजाऱ्याने सोसायटीच्या चेअरमनला याची माहिती दिली, त्यांनी पोलिसांकडे तक्रार केली.

पोलिसांना यादवच्या शरीरावर लटकलेला फास सापडला आहे. हा फास पोस्टमॉर्टम तपासणीसाठी जेजे हॉस्पिटलमध्ये पाठवण्यात आला. मंगळवारी अपघाती मृत्यूची नोंद करण्यात आली असून पोलिसांनी सांगितले की, तपास सुरू असून आत्महत्येचे कारण अद्याप समोर आलेले नाही.

Share this :
थोडक्यात घडामोडी टीम

कमीत कमी शब्दांमध्ये बातम्या देणारे, आजच्या घडीला थोडक्यात घडामोडी हे मराठीतलं सर्वात वेगानं वाढणारं न्यूजपोर्टल - थोडक्यात घडामोडी

Recent Posts

हिंगोलीत धक्कादायक प्रकार! डिझेलअभावी रुग्णवाहिका न मिळाल्याने गर्भातील बाळाचा दुर्दैवी मृत्यू

हिंगोली : हिंगोली जिल्ह्यात घडलेल्या एका गंभीर घटनेने सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेवरील विश्वास पुन्हा एकदा डळमळीत…

2 आठवडे ago

भाविकांसाठी आनंदाची बातमी; धार्मिक स्थळांवर मिळणार दर्जेदार आणि पौष्टिक अन्न सेवा सुविधा

बुलढाणा : केंद्र सरकारच्या फुड स्ट्रीट योजने अंतर्गत विदर्भातील शेगांव आणि मराठवाडा विभागातील शिर्डी येथे…

2 आठवडे ago

पुण्यात विषारी दारू प्यायल्याने १२ जणांचा मृत्यू, दोषींवर कठोर कारवाईचे आदेश

मुंबई : पुणे शहरातील हडपसर आणि पिंपरी-चिंचवडमधील दापोडी-फुगेवाडी परिसरात विषारी दारू प्यायल्याने १२ नागरिकांचा मृत्यू…

2 आठवडे ago

व्यसनमुक्ती क्षेत्रातील अविरत समाजकार्याची दखल; डॉ. सोमनाथ गिते यांचा मा. माधुरीताई मिसाळ यांच्या हस्ते सत्कार

पुणे : महाराष्ट्र शासनाच्या सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागामार्फत प्रदान करण्यात आलेल्या “राष्ट्रपिता महात्मा…

2 आठवडे ago

भरतीच्या बोगस जाहिरातींपासून सावध राहण्याचे आवाहन

मुंबई : ‘महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना’अंतर्गत महाराष्ट्रात विविध पदांसाठी तात्काळ भरती सुरू…

3 आठवडे ago

पुण्यात उष्णतेचा कहर! IMD चा यलो अलर्ट जारी; नागरिकांना काळजी घेण्याचे आवाहन

पुणे : पुणे शहर आणि जिल्ह्यात उष्णतेची तीव्रता दिवसेंदिवस वाढत असून भारतीय हवामान विभागाने (IMD)…

4 आठवडे ago