baby girl has died after being attacked by a dog
पनवेल : घरगुती वादादरम्यान 3 वर्षीय चिमुकलीची हत्या झाल्याची संतापजनक घटना घडली आहे. रॅपिड ऍक्शन फोर्स (RAF) अधिकारी आणि त्याची पत्नी यांच्यात वाद सुरु असताना जवानाने 3 वर्षीय मुलीला भिंतीवर आदळल्याने तिचा मृत्यू झाला. खारघर पोलिसांनी 39 वर्षीय आरोपीला आपल्या 3 वर्षांच्या मुलीची हत्या करून तिचा मृतदेह तळोजा येथे ढिगाऱ्यात टाकल्याच्या आरोपाखाली अटक केली.
मिळालेल्या माहितीनुसार, तळोजा येथील सेक्टर 39 मध्ये राहणारा आरोपी परशुराम तिपन्ना याचे 5 एप्रिल रोजी पहाटे 1 वाजण्याच्या सुमारास पत्नीशी भांडण झाले, त्यानंतर त्याने पत्नीला मारहाण केली. नंतर रागाच्या भरात त्याने आपल्या मुलीच्या डोक्यावर वार केले व पोटावर बुक्की मारली. चिमुकली काही काळ बेशुद्ध पडली आणि नंतर तिचा मृत्यू झाला. त्यानंतर पहाटे तिपन्ना याने आपल्या मुलीचा मृतदेह लुंगीमध्ये गुंडाळला आणि तळोजा येथील एका मोकळ्या जागेत डेंब्रिजमध्ये टाकला. त्याने तिच्या शरीराचा काही भाग मातीने झाकून टाकला.
5 एप्रिल रोजी सकाळी 10 च्या सुमारास पोलिसांना रस्त्याने जाणाऱ्यांकडून मुलीच्या मृतदेहाबाबत फोन आला. पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत मृतदेह रुग्णालयात नेला. मात्र, तिला मृत घोषित करण्यात आले. पोस्टमॉर्टम रिपोर्टमध्ये डोक्याला अनेक अंतर्गत जखमांसह दुखापत झाल्याचे दिसून आले. त्यानंतर पोलिसांनी तळोजा गाव, पापडीचा पाडा गाव परिसरात मृत मुलीच्या नातेवाईकांचा शोध सुरू केला. अखेर मयत युवती तळोजा येथील चैतन्य सोसायटी पापडीचा पाडा गाव येथील रहिवासी असल्याचे त्यांना समजले. इमारतीत गेल्यावर त्यांना समजले की ती सोसायटीतील २०४ क्रमांकाच्या खोलीत राहणाऱ्या आरएएफ पोलिस कर्मचाऱ्याची मुलगी आहे.
दरम्यान, पोलिसांना आरएएफच्या गणवेशातील एक व्यक्ती पळून जात असल्याचे दिसले. त्याला चौकशीसाठी ताब्यात घेण्यात आले. सुरुवातीला त्याने खुलासा करण्यास नकार दिला. नंतर त्याने गुन्हा केल्याची कबुली दिली. त्याच्याविरुद्ध भादंवि कलम ३०२ अन्वये खारघर पोलिस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता.
हिंगोली : हिंगोली जिल्ह्यात घडलेल्या एका गंभीर घटनेने सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेवरील विश्वास पुन्हा एकदा डळमळीत…
बुलढाणा : केंद्र सरकारच्या फुड स्ट्रीट योजने अंतर्गत विदर्भातील शेगांव आणि मराठवाडा विभागातील शिर्डी येथे…
मुंबई : पुणे शहरातील हडपसर आणि पिंपरी-चिंचवडमधील दापोडी-फुगेवाडी परिसरात विषारी दारू प्यायल्याने १२ नागरिकांचा मृत्यू…
पुणे : महाराष्ट्र शासनाच्या सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागामार्फत प्रदान करण्यात आलेल्या “राष्ट्रपिता महात्मा…
मुंबई : ‘महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना’अंतर्गत महाराष्ट्रात विविध पदांसाठी तात्काळ भरती सुरू…
पुणे : पुणे शहर आणि जिल्ह्यात उष्णतेची तीव्रता दिवसेंदिवस वाढत असून भारतीय हवामान विभागाने (IMD)…