क्राईम

पुणे : 27 वर्षीय महिलेवर अज्ञात व्यक्तीकडून बलात्कार, आरोपी पोलिसांच्या ताब्यात

पुणे : रात्रपाळीसाठी कामावर निघालेल्या 27 वर्षीय महिलेवर अज्ञात व्यक्तीने बलात्कार केल्याची घटना समोर आली आहे. खेड तालुक्यातील मेदनकरवाडी परिसरात हा धक्कादायक प्रकार घडला. तसेच याबाबत कुणाला काही सांगितल्यास जीवे ठार मारण्याची धमकीही आरोपीने पीडितेला दिली. पोलिसांनी याप्रकरणी तात्काळ तपास करत अवघ्या काही तासात आरोपीच्या मुसक्या आवळल्या आहेत. प्रकाश तुकाराम भांगरे (रा. मेदनकरवाडी, मूळ रा. अकोले, जि. अहमदनगर) असे आरोपीचे नाव आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, पीडित महिला मंगळवारी रात्री साडेअकरा वाजता नाइट शिफ्टसाठी कंपनीत निघाली होती. अज्ञात व्यक्तीने तिचा पाठलाग करून खंडोबा मंदिराजवळ तिचा रस्ता अडवला. त्यानंतर अंधाराचा फायदा घेत जबरदस्तीने ओढत निर्जनस्थळी नेऊन या महिलेवर बलात्कार केल्याची घटना चाकण येथील मेदनकरवाडी येथे घडली. त्यानंतर आरोपीने पळ काढला.

पोलिसांनी सांगितले की, चाकण पोलीस ठाण्याच्या हद्दीत 13 मे रोजी रात्री 11:15 ते 11:45 वाजताच्या सुमारास, खेड तालुक्यातील मेदनकरवाडी, मुटकेवाडी येथील भुरुक कॉम्प्लेक्सच्या मागे एक 27 वर्षीय महिला रात्रपाळीतील कामासाठी कंपनीत जात होती. यावेळी आरोपीने तिला जबरदस्तीने शाळेच्या मागील बाजूस ओढून नेले. घटनास्थळी कोणीही दिसत नसल्याने महिला घाबरली होती. तिने आरडाओरडा करण्याचा प्रयत्न केला, तसेच सुटका करून घेण्यासाठी तिने आरोपीचा चावाही घेतला. मात्र, आरोपीने तिच्यावर बलात्कार करून मारहाण केली आणि याबाबत कोणाला सांगितल्यास जीवे मारण्याची धमकी दिली. त्यानंतर आरोपीने पळ काढला. दरम्यान, या प्रकारानंतर एक कामगार महिला आणि पुरुष तेथून जात होते. त्यांच्या मदतीने शंभर नंबरवर फोन करून पीडित महिलेने पोलिसांना बोलावून घेतले. महिलेला तातडीने ‘वायसीएम रुग्णालयात दाखल करण्यात आले.

या घटनेची माहिती मिळताच चाकण पोलिसांनी तातडीने कारवाईला सुरुवात केली. पिंपरी-चिंचवड गुन्हे शाखेच्या सहकार्याने सहा विशेष पथके स्थापन करण्यात आली. पोलिसांनी परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासले आणि तांत्रिक माहितीच्या आधारे तपास पुढे नेला. या तपासादरम्यान आरोपीची ओळख पटली. पोलिसांनी त्याला ताब्यात घेऊन चौकशी केली असता, त्याने गुन्ह्याची कबुली दिली. चाकण पोलिसांनी विविध कलमाच्या अन्वये गुन्हा दाखल करून आरोपीला अटक केली असून, पुढील तपास सुरू आहे. मात्र, अशा घटनांना आळा घालण्यासाठी कठोर उपाययोजनांची गरज आहे. या घटनेने महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.

Share this :
थोडक्यात घडामोडी टीम

कमीत कमी शब्दांमध्ये बातम्या देणारे, आजच्या घडीला थोडक्यात घडामोडी हे मराठीतलं सर्वात वेगानं वाढणारं न्यूजपोर्टल - थोडक्यात घडामोडी

Recent Posts

स्वातंत्र्यदिनानिमित्त डॉ. सोमनाथ गिते यांचा महापौरांच्या हस्ते गौरव

पुणे : स्वातंत्र्यदिनाच्या निमित्ताने पुणे महानगरपालिकेच्या वतीने आयोजित विशेष सत्कार समारंभात व्यसनमुक्ती अभ्यासक व सामाजिक…

6 दिवस ago

लग्न ठरलेल्या प्रियकरासोबत तरुणीचा संशयास्पद मृत्यू; आईचा गंभीर आरोप

बारामती : पुणे जिल्ह्यातील बारामती शहरात तरुणीचा अकस्मात आणि संशयास्पद मृत्यू झाल्याप्रकरणी तिच्या आईने दिलेल्या…

2 आठवडे ago

चार महिन्यांपूर्वीचा नवाकोरा रस्ता ऑप्टिकल फायबरसाठी फोडला; राष्ट्रवादी काँग्रेसच्या नगरसेविका डॉ. हेमलता पाटील यांचा संताप; काम बंद पाडून अधिकाऱ्यांना जाब

नाशिक : शनिवारी (दि. ८) झालेल्या महासभेत स्मार्टसिटी कंपनी आणि ‘एमएनजीएल’मुळे शहरातील रस्त्यांची झालेली दुरवस्था…

2 आठवडे ago

‘उघडलेले पुस्तक’ पॅनेलचा दणदणीत विजय; सर्व १५ उमेदवार विजयी; सर्व प्रवर्गांत परिवर्तन आणि सुशासन पॅनेलला यश

पुणे : पारी टॉवर्स सहकारी गृहरचना संस्था मर्यादित, नऱ्हेच्या संचालक मंडळाच्या पंचवार्षिक निवडणुकीत ‘उघडलेले पुस्तक’…

2 आठवडे ago

हिंगोलीत धक्कादायक प्रकार! डिझेलअभावी रुग्णवाहिका न मिळाल्याने गर्भातील बाळाचा दुर्दैवी मृत्यू

हिंगोली : हिंगोली जिल्ह्यात घडलेल्या एका गंभीर घटनेने सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेवरील विश्वास पुन्हा एकदा डळमळीत…

3 महिने ago

भाविकांसाठी आनंदाची बातमी; धार्मिक स्थळांवर मिळणार दर्जेदार आणि पौष्टिक अन्न सेवा सुविधा

बुलढाणा : केंद्र सरकारच्या फुड स्ट्रीट योजने अंतर्गत विदर्भातील शेगांव आणि मराठवाडा विभागातील शिर्डी येथे…

3 महिने ago