क्राईम

लिव्ह-इन पार्टनरची हत्या! महिलेला मारल्यानंतर मृतदेह सुटकेसमध्ये भरून खाडीत फेकला, पत्नीनेही दिली साथ

पालघर : पालघरमध्ये एका व्यक्तीने 28 वर्षीय लिव्ह-इन पार्टनरची हत्या केल्याची घटना समोर आली आहे. या हत्येप्रकरणी पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपीने महिलेला पाण्यात बुडवून मारले, त्यानंतर मृतदेह सुटकेसमध्ये भरून गुजरातमधील वलसाड येथील खाडीत फेकून दिला. दरम्यान, या हत्येत आरोपीच्या पत्नीनेही त्याची साथ दिली होती, तिलादेखील पोलिसांनी अटक केली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, मनोहर शुक्ला असे आरोपीचे नाव असून तो मुंबईत कॉस्च्युम डिझायनर म्हणून काम करतो. तो पाच वर्षांपासून मेकअप आर्टिस्ट नयना महतसोबत रिलेशनशिपमध्ये होता. नयना लग्नासाठी दबाव टाकत होती, मात्र मनोहर याने लग्न करण्यास नकार दिला होता. त्यानंतर तिने त्याच्याविरुद्ध पोलिसांत बलात्काराची तक्रार दाखल केली. त्याने केस मागे घेण्यास सांगितले. मात्र, नयनाने नकार दिल्याने मनोहरने तिची हत्या केली.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ही घटना 9 ते 12 ऑगस्टदरम्यान घडली. 12 ऑगस्ट रोजी नयनाला तिच्या बहिणीने बोलावले होते. अनेक फोन करूनही तिने फोन उचलला नाही, तेव्हा त्यांनी मनोहरकडे चौकशी केली. त्याने सांगितले की, नयनाचा फोन खराब झाला आहे. मात्र, तिच्या बहिणीला संशय आला. 14 ऑगस्ट रोजी पीडितेच्या बहिणीने नायगाव पोलिसात हरवल्याची तक्रार दाखल केली. पीडितेने तिच्या बहिणीला सांगितले होते की, मनोहर तिला मारेल अशी तिला भीती वाटत होती.

याप्रकरणी अटक करण्यात आलेल्या आरोपी आणि त्याच्या पत्नीला मंगळवारी स्थानिक न्यायालयात हजर करण्यात आले. त्यानंतर न्यायालयाने त्यांना 16 सप्टेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावली.

दरम्यान, गुजरातमधील वलसाड येथील एका खाडीत संबंधित महिलेचा मृतदेह सुटकेसमध्ये सापडला. वलसाडमधील पोलिसांनी अपघाती मृत्यू अहवाल दाखल केला होता आणि मृतदेह घेण्यासाठी कोणीही आले नसल्याने मृतदेहावर अंत्यसंस्कार केले होते.

Share this :
थोडक्यात घडामोडी टीम

कमीत कमी शब्दांमध्ये बातम्या देणारे, आजच्या घडीला थोडक्यात घडामोडी हे मराठीतलं सर्वात वेगानं वाढणारं न्यूजपोर्टल - थोडक्यात घडामोडी

Recent Posts

स्वातंत्र्यदिनानिमित्त डॉ. सोमनाथ गिते यांचा महापौरांच्या हस्ते गौरव

पुणे : स्वातंत्र्यदिनाच्या निमित्ताने पुणे महानगरपालिकेच्या वतीने आयोजित विशेष सत्कार समारंभात व्यसनमुक्ती अभ्यासक व सामाजिक…

2 आठवडे ago

लग्न ठरलेल्या प्रियकरासोबत तरुणीचा संशयास्पद मृत्यू; आईचा गंभीर आरोप

बारामती : पुणे जिल्ह्यातील बारामती शहरात तरुणीचा अकस्मात आणि संशयास्पद मृत्यू झाल्याप्रकरणी तिच्या आईने दिलेल्या…

2 आठवडे ago

चार महिन्यांपूर्वीचा नवाकोरा रस्ता ऑप्टिकल फायबरसाठी फोडला; राष्ट्रवादी काँग्रेसच्या नगरसेविका डॉ. हेमलता पाटील यांचा संताप; काम बंद पाडून अधिकाऱ्यांना जाब

नाशिक : शनिवारी (दि. ८) झालेल्या महासभेत स्मार्टसिटी कंपनी आणि ‘एमएनजीएल’मुळे शहरातील रस्त्यांची झालेली दुरवस्था…

3 आठवडे ago

‘उघडलेले पुस्तक’ पॅनेलचा दणदणीत विजय; सर्व १५ उमेदवार विजयी; सर्व प्रवर्गांत परिवर्तन आणि सुशासन पॅनेलला यश

पुणे : पारी टॉवर्स सहकारी गृहरचना संस्था मर्यादित, नऱ्हेच्या संचालक मंडळाच्या पंचवार्षिक निवडणुकीत ‘उघडलेले पुस्तक’…

3 आठवडे ago

हिंगोलीत धक्कादायक प्रकार! डिझेलअभावी रुग्णवाहिका न मिळाल्याने गर्भातील बाळाचा दुर्दैवी मृत्यू

हिंगोली : हिंगोली जिल्ह्यात घडलेल्या एका गंभीर घटनेने सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेवरील विश्वास पुन्हा एकदा डळमळीत…

3 महिने ago

भाविकांसाठी आनंदाची बातमी; धार्मिक स्थळांवर मिळणार दर्जेदार आणि पौष्टिक अन्न सेवा सुविधा

बुलढाणा : केंद्र सरकारच्या फुड स्ट्रीट योजने अंतर्गत विदर्भातील शेगांव आणि मराठवाडा विभागातील शिर्डी येथे…

3 महिने ago