क्राईम

औरंगाबादमध्ये विद्यार्थिनीची भरदिवसा हत्या, एकतर्फी प्रेमातून घडला धक्कादायक प्रकार

औरंगाबाद : औरंगाबादमध्ये एक धक्कादायक घटना घडली आहे. एका विद्यार्थिनीची कॉलेजजवळून ओढून नेत हत्या करण्यात आली आहे. भरदिवसा कॉलेजजवळ विद्यार्थिनीचा धारदार शस्त्राने गळा चिरून खून झाल्याने सर्वत्र खळबळ उडाली आहे. हा प्रकार देवगिरी महाविद्यालयाजवळ आज दुपारी घडली. आरोपी फरार असून त्याच्या मागावर पोलिसांची 3 पथके असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, ग्रंथी सुखप्रीत कौर प्रीतपाल सिंग असे मृत विद्यार्थींनीचे नाव असून ती १९ वर्षीय विद्यार्थींनी आहे. ती बीबीएच्या प्रथम वर्गात शिकत होती. कॉलेजजवळून ओढत नेत तिची हत्या करण्यात आली आहे. देवगिरी महाविद्यालयाजवळ ही घटना घडली. एकतर्फी प्रेमातून हा धक्कादायक प्रकार घडला असल्याची माहिती आहे. आरोपीने तरुणीला ओढत नेत तिची हत्या केली. भर दिवसा हा प्रकार घडल्याने नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण आहे. घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून पुढील तपास सुरू असल्याची माहिती आहे.

काय आहे प्रकरण?

मिळलेल्या माहितीनुसार, मृत विद्यार्थिनी आणि मारेकरी दोघेही उस्मानपुऱ्यातील आहेत. ते एकमेकांच्या ओळखीचेही होते. ते एका कॅफेत बसले होते, तेथे त्यांच्यात वाद झाला. त्यामुळे कॅफेचालकाने त्यांना बाहेर जाण्यास सांगितले, तेथून निघाल्यानंतर त्यांच्यात पुन्हा वाद झाला. यानंतर मारेकऱ्याने त्याच्याजवळील शस्त्र काढले तेव्हा जीवाच्या आकांताने तरुणी पळु लागली. ती ओरडत असल्याने इतर लोकही मागे पळत होते. मात्र, आरोपीने विद्यार्थिनीला 200 फूट ओढत नेले, त्यानंतर तिचा गळा कापला, यातच तिचा मृत्यू झाला.

Share this :
थोडक्यात घडामोडी टीम

कमीत कमी शब्दांमध्ये बातम्या देणारे, आजच्या घडीला थोडक्यात घडामोडी हे मराठीतलं सर्वात वेगानं वाढणारं न्यूजपोर्टल - थोडक्यात घडामोडी

Recent Posts

अमरावती विभागीय आयुक्तांकडून अमरावती विभागाच्या मान्सून पूर्वतयारी आढावा

अमरावती, दि. 18 (जिमाका) : पावसाळ्यात पुरामुळे बाधित होणाऱ्या ठिकाणी तसेच दुर्गम गावांत जलदरित्या मदत…

2 दिवस ago

उष्माघातापासून बचावासाठी नागरिकांनी सतर्क राहावे – विभागीय आयुक्त डॉ. निधी पाण्डेय

अमरावती, दि. 8 : जिल्ह्याचे तापमान 40 अंशाच्या वर असून तापमानात आणखी वाढ होण्याची शक्यता…

2 आठवडे ago

राज्य उत्पादन शुल्क विभागाची कारवाई; २३.५५ लाख किंमतीचा मुद्देमाल जप्त

मुंबई, दि. 8 : उत्पादन शुल्क विभागाच्या भरारी पथकाने ठाणे जिल्ह्यातील विविध ठिकाणी 7 मे…

2 आठवडे ago

मतदारांना पाय दाबून देण्यासाठी फूट मसाजर मशीनची सुविधा

सोलापूर : जिल्ह्यातील सोलापूर व माढा लोकसभा मतदारसंघासाठी 7 मे 2024 रोजी सकाळी सात ते…

2 आठवडे ago

आदर्श आचारसंहितेचे काटेकोरपणे पालन करून राजकीय पक्षांनी प्रशासनाला सहकार्य करावे – निवडणूक निर्णय अधिकारी

मुंबई : लोकसभा निवडणुकीसाठी आदर्श आचारसंहितेची अंमलबजावणी सुरू झाली आहे. राजकीय पक्षांनीही आदर्श आचारसंहितेचे काटेकोरपणे…

2 आठवडे ago

निवडणूक प्रचारासाठी सर्व प्रकारच्या परवानग्या घेणेकामी एक खिडकी योजना कार्यान्वित

ठाणे : भिवंडी लोकसभा मतदार संघांतर्गत निवडणुकी करता उभे राहिलेले सर्व उमेदवार अंतिम झाल्यावर सर्व…

2 आठवडे ago