क्राईम

मैत्रिणीच्या घरी येऊन तिच्याच आजीला संपवलं; अल्पवयीन मुलीचं हादरवणारं कांड

भंडारा : एक हादरवणारी घटना भंडाऱ्यातून समोर आली आहे. यात चोरीच्या उद्देशाने मैत्रिणीच्या घरी आलेल्या एका तरुणीने मैत्रिणीच्या आजीची हत्या केली. या घटनेनं एकच खळबळ उडाली आहे.

ही घटना भंडारा जिल्ह्याच्या कारधा पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या भीलेवाडा येथे घडली आहे. . यात तरुणीने 80 वर्षीय वृद्ध महिलेची हत्या केली. तुळजाबाई सुर्यभान गोस्वामी असं 80 वर्षीय मृत महिलेचं नाव आहे.

मिळालेल्या माहितीनुसार महिलेची हत्या करणारी ही आरोपी मुलगी मृत महिलेच्या नातीची मैत्रीण होती. ही मुलगी चोरी करण्याच्या उद्देशाने मैत्रिणीच्या घरी आली होती. चोरी करण्यासाठी ती लोखंडी कपाट फोडत असताना त्याचा आवाज झाला. यावेळी वृद्ध महिला तुळजाबाई यांना जाग आली. त्यांनी या मुलीला चोरी करण्यापासून अडवलं आणि विरोध केला. यावरुनच दोघींमध्ये हातापायी झाली. यातच अल्पवयीन मुलीने वृद्ध महिलेची हत्या केली. महिलेची हत्या केल्यानंतर आरोपी मुलीने घटनास्थळावरुन पळ काढला. कारधा पोलिसांनी आरोपी अल्पवयीन तरुणीला ताब्यात घेतलं असून अधिक तपास सुरू आहे.

Share this :
थोडक्यात घडामोडी टीम

कमीत कमी शब्दांमध्ये बातम्या देणारे, आजच्या घडीला थोडक्यात घडामोडी हे मराठीतलं सर्वात वेगानं वाढणारं न्यूजपोर्टल - थोडक्यात घडामोडी

Recent Posts

हिंगोलीत धक्कादायक प्रकार! डिझेलअभावी रुग्णवाहिका न मिळाल्याने गर्भातील बाळाचा दुर्दैवी मृत्यू

हिंगोली : हिंगोली जिल्ह्यात घडलेल्या एका गंभीर घटनेने सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेवरील विश्वास पुन्हा एकदा डळमळीत…

3 आठवडे ago

भाविकांसाठी आनंदाची बातमी; धार्मिक स्थळांवर मिळणार दर्जेदार आणि पौष्टिक अन्न सेवा सुविधा

बुलढाणा : केंद्र सरकारच्या फुड स्ट्रीट योजने अंतर्गत विदर्भातील शेगांव आणि मराठवाडा विभागातील शिर्डी येथे…

3 आठवडे ago

पुण्यात विषारी दारू प्यायल्याने १२ जणांचा मृत्यू, दोषींवर कठोर कारवाईचे आदेश

मुंबई : पुणे शहरातील हडपसर आणि पिंपरी-चिंचवडमधील दापोडी-फुगेवाडी परिसरात विषारी दारू प्यायल्याने १२ नागरिकांचा मृत्यू…

3 आठवडे ago

व्यसनमुक्ती क्षेत्रातील अविरत समाजकार्याची दखल; डॉ. सोमनाथ गिते यांचा मा. माधुरीताई मिसाळ यांच्या हस्ते सत्कार

पुणे : महाराष्ट्र शासनाच्या सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागामार्फत प्रदान करण्यात आलेल्या “राष्ट्रपिता महात्मा…

4 आठवडे ago

भरतीच्या बोगस जाहिरातींपासून सावध राहण्याचे आवाहन

मुंबई : ‘महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना’अंतर्गत महाराष्ट्रात विविध पदांसाठी तात्काळ भरती सुरू…

1 महिना ago

पुण्यात उष्णतेचा कहर! IMD चा यलो अलर्ट जारी; नागरिकांना काळजी घेण्याचे आवाहन

पुणे : पुणे शहर आणि जिल्ह्यात उष्णतेची तीव्रता दिवसेंदिवस वाढत असून भारतीय हवामान विभागाने (IMD)…

1 महिना ago