जळगाव : 14 वर्षीय अल्पवयीन मुलीवर पाच ते सहा जणांनी सामूहिक बलात्कार केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. याप्रकरणी पिंपळगाव हरेश्वर पोलीस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी 3 आरोपींना अटक करण्यात आली आहे. तर इतरांचा शोध सुरू आहे. या घटनेमुळे सर्वत्र खळबळ उडाली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, जळगाव जिल्ह्यातील पाचोरा तालुक्यातील एका गावात 14 वर्षीय अल्पवयीन मुलगी आपल्या कुटुंबीयांसह राहते. ती तिच्या मैत्रीणीसोबत घराबाहेर होती. यादरम्यान, ती मुलगी गायब झाली. मुलगी उशीरापर्यंत घरी आली नाही, म्हणून कुटुंबीयांनी तिचा सर्वत्र शोध सुरू केला. गावातील 20 ते 25 जणांनी गावातील आजूबाजूच्या शेतात शोध घेतला. दरम्यान, वातावरण शांत झाल्यानंतर पहाटे 3 वाजेच्या सुमारास अज्ञात 5 ते 6 जणांनी 14 वर्षीय मुलीला उचलून नेत तिच्यावर सामूहिक अत्याचार केला. त्यानंतर गावातील महिलांच्या शौचालयाजवळ सोडून दिले.
अल्पवयीन मुलगी घरी आल्यावर तिच्या कुटुंबीयांना पीडितेने घडलेला प्रकार सांगितला. त्यानंतर पीडितेच्या कुटुबीयांनी तातडीने पोलीस स्टेशनमध्ये धाव घेतली. पीडित मुलीला पाचोरा ग्रामीण रूग्णालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले आहे. दरम्यान, या प्रकरणी पिंपळगाव पोलिसांत पोक्सो कायद्यासह 3 जणांवर सामूहिक बलात्काराचा गुन्ह्याही दाखल करण्यात आला आहे. दरम्यान, संशयित आरोपी हे गावातीलच असल्याची दाट शक्यता असून त्यांच्या शोधार्थ पोलीस पथक रवाना झाले आहे.
पुणे : स्वातंत्र्यदिनाच्या निमित्ताने पुणे महानगरपालिकेच्या वतीने आयोजित विशेष सत्कार समारंभात व्यसनमुक्ती अभ्यासक व सामाजिक…
बारामती : पुणे जिल्ह्यातील बारामती शहरात तरुणीचा अकस्मात आणि संशयास्पद मृत्यू झाल्याप्रकरणी तिच्या आईने दिलेल्या…
नाशिक : शनिवारी (दि. ८) झालेल्या महासभेत स्मार्टसिटी कंपनी आणि ‘एमएनजीएल’मुळे शहरातील रस्त्यांची झालेली दुरवस्था…
पुणे : पारी टॉवर्स सहकारी गृहरचना संस्था मर्यादित, नऱ्हेच्या संचालक मंडळाच्या पंचवार्षिक निवडणुकीत ‘उघडलेले पुस्तक’…
हिंगोली : हिंगोली जिल्ह्यात घडलेल्या एका गंभीर घटनेने सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेवरील विश्वास पुन्हा एकदा डळमळीत…
बुलढाणा : केंद्र सरकारच्या फुड स्ट्रीट योजने अंतर्गत विदर्भातील शेगांव आणि मराठवाडा विभागातील शिर्डी येथे…