क्राईम

धक्कादायक! नात्याला काळीमा फासणारी घटना.. जन्मदात्या पित्याचे मुलीसोबत लैंगिक चाळे

पुणे : पित्यानेच चार वर्षांच्या पोटच्या मुलीसोबत लैंगिक चाळे केल्याचा अतिशय धक्कादायक प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी बापाविरोधात येरवडा पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. वर्षभरापासून पित्याकडून हा लैंगिक छळ सुरू होता. चिराग हरबन्सलाल अरोरा (वय ३७) याच्यावर बालकांचे लैंगिक अत्याचारापासून संरक्षण (पोक्सो) अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणी चार वर्षांच्या पीडित मुलीच्या आईने पोलिसांत फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पती आणि पत्नी दोघे उच्चशिक्षित असून आयटी कंपनीत कामाला आहेत. दाम्पत्याला चार वर्षांची मुलगी आहे. दोघे फरीदाबादला राहण्यास असताना आणि त्यानंतर नोकरीनिमित्त न्यू जर्सी अमेरिकेत गेल्यावर आरोपी पिता मुलीशी लैंगिक चाळे करीत होता. काही काळाने आईला मुलीच्या वागण्यात बदल दिसून आल्यावर वैद्यकीय तपासणी केल्यावर मुलीशी लैंगिक चाळे होत असल्याचे लक्षात आले. यावरून पती-पत्नीमध्ये वारंवार भांडणे होऊ लागले. अनेकदा आरोपी हा पत्नीला लाथाबुक्क्यांनी मारहाण करून शिवीगाळ करीत होता. त्यामुळे फिर्यादी आपल्या चार वर्षाच्या मुलीसोबत पुण्यात येऊन राहू लागली. त्यानंतर येरवडा पोलीस ठाण्यात अर्ज करून तक्रार केली.

येरवडा पोलिसांनी नुकताच आरोपी पित्यावर गुन्हा दाखल केला. लैंगिक अत्याचाराचा प्रकार फरीदाबाद मध्ये घडला असल्याने ‘शून्य’ क्रमांकाने गुन्हा दाखल करून तपासासाठी फरीदाबाद येथील संबंधित पोलीस ठाण्यात वर्ग करण्यात आला आहे.

Share this :
थोडक्यात घडामोडी टीम

कमीत कमी शब्दांमध्ये बातम्या देणारे, आजच्या घडीला थोडक्यात घडामोडी हे मराठीतलं सर्वात वेगानं वाढणारं न्यूजपोर्टल - थोडक्यात घडामोडी

Recent Posts

हिंगोलीत धक्कादायक प्रकार! डिझेलअभावी रुग्णवाहिका न मिळाल्याने गर्भातील बाळाचा दुर्दैवी मृत्यू

हिंगोली : हिंगोली जिल्ह्यात घडलेल्या एका गंभीर घटनेने सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेवरील विश्वास पुन्हा एकदा डळमळीत…

2 आठवडे ago

भाविकांसाठी आनंदाची बातमी; धार्मिक स्थळांवर मिळणार दर्जेदार आणि पौष्टिक अन्न सेवा सुविधा

बुलढाणा : केंद्र सरकारच्या फुड स्ट्रीट योजने अंतर्गत विदर्भातील शेगांव आणि मराठवाडा विभागातील शिर्डी येथे…

2 आठवडे ago

पुण्यात विषारी दारू प्यायल्याने १२ जणांचा मृत्यू, दोषींवर कठोर कारवाईचे आदेश

मुंबई : पुणे शहरातील हडपसर आणि पिंपरी-चिंचवडमधील दापोडी-फुगेवाडी परिसरात विषारी दारू प्यायल्याने १२ नागरिकांचा मृत्यू…

2 आठवडे ago

व्यसनमुक्ती क्षेत्रातील अविरत समाजकार्याची दखल; डॉ. सोमनाथ गिते यांचा मा. माधुरीताई मिसाळ यांच्या हस्ते सत्कार

पुणे : महाराष्ट्र शासनाच्या सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागामार्फत प्रदान करण्यात आलेल्या “राष्ट्रपिता महात्मा…

2 आठवडे ago

भरतीच्या बोगस जाहिरातींपासून सावध राहण्याचे आवाहन

मुंबई : ‘महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना’अंतर्गत महाराष्ट्रात विविध पदांसाठी तात्काळ भरती सुरू…

3 आठवडे ago

पुण्यात उष्णतेचा कहर! IMD चा यलो अलर्ट जारी; नागरिकांना काळजी घेण्याचे आवाहन

पुणे : पुणे शहर आणि जिल्ह्यात उष्णतेची तीव्रता दिवसेंदिवस वाढत असून भारतीय हवामान विभागाने (IMD)…

4 आठवडे ago