क्राईम

धक्कादायक घटना! शिक्षक आणि विद्यार्थ्यांच्या त्रासाला कंटाळून १३ वर्षीय विद्यार्थ्याची आत्महत्या, चिठ्ठी लिहून शिक्षिकेवर गंभीर आरोप

कल्याण: कल्याण पूर्वेतील आयडियल शाळेत शिकणाऱ्या 13 वर्षांच्या मुलाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. शाळेतील शिक्षक आणि विद्यार्थ्यांच्या त्रासाला कंटाळून या विद्यार्थ्याने आत्महत्या केल्याची माहिती प्राथमिक तपासातून उघड झाली आहे. विघ्नेश प्रमोदकुमार पात्रो असे या मुलाचे नाव असून तो आयडियल या शाळेत इयत्ता आठवीत शिकत होता. मृत्यूपर्वी त्याने लिहलेल्या चिठ्ठीत शाळेच्या शिक्षिकेवर गंभीर आरोप केले आहेत. त्यामुळे आता या शिक्षिकेवर कारवाई होण्याची शक्यता आहे. कोळसेवाडी पोलीस ठाण्यात या घटनेची नोंद करण्यात असून पुढील तपास पोलिसांकडून सुरु आहे.

विघ्नेश प्रमोदकुमार पात्रो हा आपल्या कुटुंबासह कल्याणमधील चिकणीपाडा या परिसरात वास्तव्याला होता. विघ्नेशचे वडील प्रमोदकुमार पात्रो हे रविवारी कामावर गेले होते. त्यांची पत्नी आणि मुलगी या दोघीही काही कामासाठी घराबाहेर गेल्या होत्या. त्यावेळी विघ्नेशने घरात गळफास लावून आयुष्य संपवले. वडील घरी आल्यानंतर त्याचा मृतदेह गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळला. घराचा दरवाजा आतून बंद होता.वडिलांनी आवाज दिला मात्र काहीच आतून प्रतिसाद मिळाला नाही. घराची खिडकी उचकटून पाहिली असता लोखंडी गजाला लाल ओढणीला लटकलेला विघ्नेशचा मृतदेह दिसल्यानंतर वडिलांनी टाहो फोडला. परिसरातील नागरिक जमले घराचा दरवाजा तोडून विघ्नेशला खाली उतरून रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले.  मात्र रुग्णालयाने विघ्नेशला मृत घोषित केले. त्याच्या मृतदेहाशेजारी एक चिठ्ठी सापडली.

विघ्नेशने आत्महत्येपूर्वी लिहलेल्या चिठ्ठीत शाळेतील एका शिक्षिकेचा आणि मुलाचा उल्लेख केला आहे. यामध्ये त्याने म्हटले होते की, पप्पा माझ्या जाण्याने तुमचा खर्च कमी होईल. बहिणीवर रागावू नका. शिक्षिका आणि मुलाने चिडविल्याने मी आत्महत्या करत आहे, असे विघ्नेशने चिठ्ठीत लिहून ठेवले होते. आता विघ्नेशच्या पालकांनी तक्रार केल्यास आयडियल शाळेतील शिक्षिकेवर तक्रार दाखल होण्याची शक्यता आहे. काँग्रेसच्या स्थानिक नेत्या कांचन कुलकर्णी यांनी याप्रकरणात उडी घेत पोलिसांना एक निवेदन दिले आहे. या निवेदनात त्यांनी विघ्नेशच्या मृत्यूला कारणीभूत असणाऱ्या शिक्षिकेवर कारवाई करण्याची मागणी केली आहे. त्यादृष्टीने आता पोलीस तपास करत आहेत. संबंधित शिक्षिकेमुळे शाळेतील अन्य कोणत्या विद्यार्थ्याला त्रास होत आहे का, याचाही तपास होण्याची शक्यता आहे.

Share this :
थोडक्यात घडामोडी टीम

कमीत कमी शब्दांमध्ये बातम्या देणारे, आजच्या घडीला थोडक्यात घडामोडी हे मराठीतलं सर्वात वेगानं वाढणारं न्यूजपोर्टल - थोडक्यात घडामोडी

Recent Posts

स्वातंत्र्यदिनानिमित्त डॉ. सोमनाथ गिते यांचा महापौरांच्या हस्ते गौरव

पुणे : स्वातंत्र्यदिनाच्या निमित्ताने पुणे महानगरपालिकेच्या वतीने आयोजित विशेष सत्कार समारंभात व्यसनमुक्ती अभ्यासक व सामाजिक…

2 आठवडे ago

लग्न ठरलेल्या प्रियकरासोबत तरुणीचा संशयास्पद मृत्यू; आईचा गंभीर आरोप

बारामती : पुणे जिल्ह्यातील बारामती शहरात तरुणीचा अकस्मात आणि संशयास्पद मृत्यू झाल्याप्रकरणी तिच्या आईने दिलेल्या…

3 आठवडे ago

चार महिन्यांपूर्वीचा नवाकोरा रस्ता ऑप्टिकल फायबरसाठी फोडला; राष्ट्रवादी काँग्रेसच्या नगरसेविका डॉ. हेमलता पाटील यांचा संताप; काम बंद पाडून अधिकाऱ्यांना जाब

नाशिक : शनिवारी (दि. ८) झालेल्या महासभेत स्मार्टसिटी कंपनी आणि ‘एमएनजीएल’मुळे शहरातील रस्त्यांची झालेली दुरवस्था…

3 आठवडे ago

‘उघडलेले पुस्तक’ पॅनेलचा दणदणीत विजय; सर्व १५ उमेदवार विजयी; सर्व प्रवर्गांत परिवर्तन आणि सुशासन पॅनेलला यश

पुणे : पारी टॉवर्स सहकारी गृहरचना संस्था मर्यादित, नऱ्हेच्या संचालक मंडळाच्या पंचवार्षिक निवडणुकीत ‘उघडलेले पुस्तक’…

3 आठवडे ago

हिंगोलीत धक्कादायक प्रकार! डिझेलअभावी रुग्णवाहिका न मिळाल्याने गर्भातील बाळाचा दुर्दैवी मृत्यू

हिंगोली : हिंगोली जिल्ह्यात घडलेल्या एका गंभीर घटनेने सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेवरील विश्वास पुन्हा एकदा डळमळीत…

3 महिने ago

भाविकांसाठी आनंदाची बातमी; धार्मिक स्थळांवर मिळणार दर्जेदार आणि पौष्टिक अन्न सेवा सुविधा

बुलढाणा : केंद्र सरकारच्या फुड स्ट्रीट योजने अंतर्गत विदर्भातील शेगांव आणि मराठवाडा विभागातील शिर्डी येथे…

3 महिने ago